फेडरल-मोगल गोए (इंडिया) लिमिटेड भारतीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दुचाकी/तीन/चारचाकी वाहनांना पिस्टन, पिस्टन रिंग इत्यादी ऑटोमोटिव्ह घटकांचे उत्पादन, पुरवठा आणि वितरण करते. जर्मनीच्या गोए-वेर्के यांच्या संयुक्त उपक्रमात १९५४ मध्ये त्याची स्थापना झाली. गोए-वेर्के हे फेडरल-मोगलच्या मालकीचे आहे. टेंनेकोने फेडरल-मोगलचे अधिग्रहण केल्यानंतर फेडरल मोगल टेंनेको इंकची उपकंपनी झाली आहे. फेडरल-मोगल गोए ही भारतातील पिस्टन आणि पिस्टन रिंगच्या संघटित बाजारपेठेतील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी कंपनी असून तिचा भारतीय बाजारपेठेतील हिस्सा सुमारे २९ टक्के आहे.
ही कंपनीचे प्रवासी वाहनांच्या ऑटोमोबाइलसाठी स्टील रिंग्ज तयार करण्यासाठी जपानमधील तेकोकू पिस्टन रिंग कंपनी लिमिटेड आणि अमेरिकेतील टेनेको इंकची समूह कंपनी फेडरल-मोगल यूके इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड यांच्याशी तांत्रिक सहकार्य आहे. फेडरल-मोगल हा बहुराष्ट्रीय समूह भारतीय कंपनीला तांत्रिक आणि व्यवस्थापकीय कौशल्य आणि आर्थिक सहाय्य प्रदान करतो.
उत्पादन पोर्टफोलिओ
कंपनी ३० मिमी ते ३०० मिमी व्यासाचे पिस्टन आणि पिस्टन रिंग्ज, सिंटर्ड पार्ट्स आणि सिलेंडर लाइनर्स तयार करते. जे दुचाकी/तीन चाकी वाहने, प्रवासी वाहने, एसयूव्ही, उच्च-आउटपुट लोकोमोटिव्ह डिझेल इंजिन इत्यादींसाठी वापरले जातात.
उत्पादन आणि वितरण सुविधा
१) पटियाला: पिस्टन, पिन आणि रिंग्ज
२) बंगळूरु: पिस्टन, पिन आणि रिंग्ज
३) भिवाडी: व्हॉल्व्ह सीट्स आणि व्हॉल्व्ह मार्गदर्शक
कंपनीच्या प्रमुख ग्राहकात महिंद्र अँड महिंद्र, बजाज ऑटो, मारुती सुझुकी इंडिया, टाटा मोटर्स, हिरो मोटोकॉर्प, अशोक लेलँड, इ. मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे.
विभागानुसार महसूल मिश्रण
हलकी वाहने: ४५-५० टक्के
२ आणि ३ चाकी वाहने: १५-२० टक्के
व्यावसायिक वाहने: १५-२० टक्के
इतर: १०-१५ टक्के
कंपनीचे यंदाच्या तिमाहीचे आर्थिक निकाल अजून जाहीर व्हायचे आहेत. मात्र गेल्या आर्थिक वर्षांत मार्च २०२५ अखेर सरलेल्या आर्थिक वर्षात कंपनीने १,८०० कोटी रुपयांच्या उत्पन्नावर १६२ कोटींचा नक्त नफा कमावला आहे. जो गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत २८ टक्क्यांनी अधिक आहे. जून २०२५ साठीचे तिमाही आर्थिक निकाल लवकरच जाहीर होतील. सध्या ५५० रुपयांच्या आसपास असलेला हा शेअर एक दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून फायद्याचा ठरेल.
सध्याची शेअरबाजारातील अनिश्चितता पाहता सुचवलेले समभाग कमी बाजारभावात मिळू शकतात, त्यामुळे प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.
फेडरल-मोगल गोए (इंडिया) लिमिटेड ( (बीएसई कोड: ५०५७४४)
संकेतस्थळ: www.federalmogulgoetzeindia.net
प्रवर्तक: फेडरल मोगल कार्पोरेशन
बाजारभाव: रु. ५६०/-
प्रमुख उत्पादन/ व्यवसाय : पिस्टन आणि पिस्टन रिंग्स
भरणा झालेले भाग भांडवल: रु. ५५.६३ कोटी
शेअर होल्डिंग पॅटर्न (%)
प्रवर्तक ७४.९८
परदेशी गुंतवणूकदार ०.४४
बँक/ म्युच्युअल फंड/ सरकार ०.३४
इतर/ जनता २४.२४
पुस्तकी मूल्य: रु. २२८
दर्शनी मूल्य: रु. १०/-
गतवर्षीचा लाभांश: — %
प्रति समभाग उत्पन्न: रु. २९.१
किंमत उत्पन्न गुणोत्तर: १९.२
समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: २९.५
डेट इक्विटी गुणोत्तर: ००
इंट्रेस्ट कवरेज गुणोत्तर: ४०.९
रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लोइड (आरओसीई): १९%
बीटा : ०.८
बाजार भांडवल: रु. ३११३ कोटी (स्मॉल कॅप)
वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: ६२२/३०८
गुंतवणूक कालावधी : ३६ महिने
stocksandwealth@gmail.com
• प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या १% पेक्षा कमी आहे. तसेच सुचवलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेट वस्तू घेतलेली नाही.
• हा गुंतवणूक सल्ला नाही. • लेखात सुचवलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.