कौस्तुभ जोशी

·      फंड घराणे –  निपॉन इंडिया  म्युच्युअल फंड

Why Are performing satisfactorily mutual funds Rates So Low A Performance Analysis
समाधानकारक कामगिरी करणाऱ्या म्युच्युअल फंडांची संख्या इतकी कमी कशी?
pm narendra modi interview marathi (1)
Video: तपास यंत्रणांच्या गैरवापराबाबत नरेंद्र मोदींना थेट प्रश्न; उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले…
Mumbai Women Buys 19 Flats Worth 118 Crores In Malbar Hill
“बंगल्यासमोर बिल्डिंग बांधली, समुद्र कसा बघू?”, म्हणत दक्षिण मुंबईत १९ फ्लॅट्स विकत घेणारी ‘ती’ आहे तरी कोण?
priya bapat reacts on not having baby
लग्नाला १३ वर्षे होऊनही बाळ नाही, प्रिया बापट म्हणाली, “ज्यांना मुलं नकोयत…”

·      फंडाचा प्रकार – मिड कॅप इक्विटी फंड

·      एन. ए. व्ही. (२७ मार्च २०२४  रोजी) ग्रोथ पर्याय – ३२४१ रुपये प्रति युनिट

·      फंड मालमत्ता (२८ फेब्रुवारी २०२४ रोजी )  – २४४८० कोटी रुपये.

·      फंड मॅनेजर – रुपेश पटेल, संजय दोषी.

फंडाची स्थिरता ( २८ फेब्रुवारी २०२४ )

·        पोर्टफोलिओ टर्नओव्हर ०. १५ (times)

·        स्टॅंडर्ड डिव्हिएशन  ४. ०३  %

·        बीटा रेशो ०. ८८ %

पोर्टफोलिओ टर्नओव्हर म्हणजे एखाद्या फंड मॅनेजरने फंड योजनेमध्ये शेअरची सतत खरेदी विक्री खरेदी सुरू ठेवणे. जेवढे जास्त खरेदी विक्री व्यवहार घडतील तेवढाच फंडाचा खर्च वाढतो. पोर्टफोलिओ टर्नओव्हर जास्त असणे फारसे चांगले मानले जात नाही.

स्टॅंडर्ड डिव्हिएशन म्हणजेच एखाद्या फंडाचा परतावा गेल्या तीन वर्षात किती स्थिर राहिला आहे त्याचे निर्दशक आहे. म्हणजेच दोन फंडाची तुलना करता ज्या फंडाचा हा आकडा कमी आहे तो फंड साधारणतः पुढील काळात दुसऱ्या फंडा पेक्षा तसेच परतावे देण्याची शक्यता आहे उदाहरण घेऊया फंड X आणि फंड Y यांनी 12% परतावा मागच्या पाच वर्षात दिला आहे. जर स्टॅंडर्ड डिव्हिएशन चा फंड X चा आकडा Y पेक्षा कमी असेल तर फंड X पुढील काळात तसाच सर्वसाधारण परतावा देऊ शकतो तर, फंड Y मधून मिळणारा परतावा बदलू शकतो.

बीटा म्हणजेच गेल्या तीन वर्षात फंडाने दिलेल्या परताव्यावरून भविष्यात तो फंड किती वर किंवा खाली जाईल याचा अंदाज लावणे, जेवढी बीटा व्हॅल्यू कमी असेल तेवढाच फंड भरवशाचा.

शार्प रेश्यो म्हणजे अधिक रिटर्न्स मिळवण्यासाठी फंडाने किती जोखीम घेतली आहे, अधिकाधिक रिटर्न मिळवण्यासाठी फंड मॅनेजरने घेतलेली जोखीम अधिक असेल तर त्याचे प्रतिबिंब यामध्ये उमटते.

हेही वाचा >>>Health Special: मिरची खाल्ल्याने खरंच वजन कमी होतं?

तुमच्यासाठी हा फंड महत्त्वाचा का  ?

· या फंडाचे वैशिष्ट्य म्हणजे पोर्टफोलिओमध्ये जास्त शेअर्सची गर्दी न ठेवता ५० ते ७० शेअर्स ठेवले जातात, मात्र गेल्या काही महिन्यात यात बदल झालेला दिसून येत आहे व पोर्टफोलिओत ताज्या उपलब्ध आकडेवारीनुसार ९५ शेअर्सचा समावेश केला गेलेला दिसतो.

·निफ्टी मिडकॅप १५० इंडेक्समध्ये एका क्षेत्रातील किती कंपन्या आहेत त्या डोळ्यासमोर ठेवून किती टक्के एका सेक्टरमधील गुंतवणूक असावी याचा निर्णय घेतला जातो. मिडकॅप कंपन्या लार्ज कॅप पेक्षा जास्त वेगाने वाढत असल्यामुळे त्यावर फंड मॅनेजरचे कायम लक्ष असते.

· आंतरराष्ट्रीय पातळीवरील तेलाच्या किमती, व्याजदर, जागतिक घटनांचे भारतीय शेअर बाजारावर होणारे परिणाम याचा अंदाज बांधून पोर्टफोलिओबद्दलचे निर्णय घेतले जातात. वित्तपुरवठा, औषध आणि आरोग्य क्षेत्र, रिअल इस्टेट, वित्त क्षेत्र, एफएमसीजी या क्षेत्रात फंडाची गुंतवणूक सतत कायम टिकलेली आहे.

· निम्मी गुंतवणूक मिडकॅप प्रकाराच्या शेअर्समध्ये तर १३ % गुंतवणूक स्मॉल कॅप आणि १३% गुंतवणूक लार्ज कॅप प्रकारात केली गेली आहे.

रिस्को मिटरचा विचार करायचा झाल्यास ‘Very High’ म्हणजेच सर्वाधिक जोखीम असलेल्या श्रेणीमध्ये हा फंड मोडतो.

२७ मार्च २०२४  रोजी फंडाचा परतावा (CAGR पद्धतीने)

·        एक वर्ष –  ५९. ४१  %

·        दोन वर्षे –  २७. ५५  %

·        तीन वर्षे –  २८. १६ %

·        पाच वर्षे – २४. १९  %

·        दहा वर्षे –  २०. ४७  %

·        फंड सुरु झाल्यापासून –  २२. ५० %

हेही वाचा >>>तुम्हाला जंक फूड खाण्याचे व्यसन आहे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कशी सोडावी ही वाईट सवय

फंडाने गुंतवणूक कुठे केली आहे ?

सर्वाधिक गुंतवणूक फार्मा क्षेत्रात असून त्या खालोखाल वाहन निर्मिती, वाहनाचे सुटे भाग निर्मिती, वित्तपुरवठा कंपन्या, सॉफ्टवेअर, हॉस्पिटल, प्लास्टिक उत्पादने, रिटेल व्यवसाय, खाजगी बँक या क्षेत्रात गुंतवणूक केलेली आहे.

पावर फायनान्स कॉर्पोरेशन ३.४४%, चोलामंडलम फायनान्शिअल २.६३%, पर्सिस्टंट सिस्टीम २.४३%, वरुण  बेवरेजेस २.३०%, फोर्टिस हेल्थ केअर २.२०%, एनटीपीसी २.०८%, सुप्रीम इंडस्ट्रीज २.०४ मॅक्स फायनान्शिअल २.० %, फेडरल बँक १.८४% हे आघाडीचे शेअर्स आहेत.

गेल्या महिन्याभराच्या काळात पोर्टफोलिओमध्ये कोणत्याही नव्या शेअर्सचा समावेश करण्यात आलेला नाही. मात्र स्टील ऑथॉरिटी, इमामी आणि ओरिएंट इलेक्ट्रिक या कंपन्यांमध्ये असलेली गुंतवणूक काढून घेण्यात आलेली आहे.

 ‘एस.आय.पी.’तील दीर्घकालीन परतावे

तुम्ही या फंडात दरमहा एक हजार रुपयांची गुंतवणूक केली असती तर

·        एक वर्षापासून एसआयपी केली असती तर  ४६. २९  %

·        दोन वर्षे  ३६. ८१ %

·        तीन वर्षे    २९. ३५ %

·        पाच वर्षे       २९. ६५ %

·        सलग दहा वर्ष    २०. ४  %

असा स्थिर परतावा मिळालेला दिसतो.

 * एका निर्णयाद्वारे फंड घराण्यांनी जाहिरात करताना दहा वर्षाच्या सरासरी रिटर्नचा (CAGR) समावेश त्यात करावा अशी मार्गदर्शक सूचना करण्यात आली. त्यानुसार निवडक फंडांचे विश्लेषण या लेखमालिकेतून केले जात आहे. फंड योजनेत गुंतवणूक करावी असा सल्ला देणे हा या लेखमालिकेचा उद्देश नाही. या फंडात गुंतवणूक करताना सर्व जोखीम विषयक माहिती वाचून आपल्या जबाबदारीवरच गुंतवणूक करावी.