सुधाकर कुलकर्णी

प्रश्न१: क्रेडिट कार्डांचे किती प्रकार आहेत?

स्टँडर्ड क्रेडिट कार्ड आणि स्पेशलाईज्ड क्रेडिट कार्डाचे असे दोन प्रकार असून यातील स्टँडर्ड क्रेडिट कार्ड हे मूलभूत क्रेडिट कार्ड असून यात अन्य कुठल्याही सुविधा नसतात व यासाठी वार्षिक फी लागू होत नाही. स्पेशलाईज्ड क्रेडिट कार्ड कार्डधारकास काही विशिष्ट सवलती (उदा: लाउंज, डायनिंग, इंधन यासारख्या ठिकाणी ) दिल्या जातात. या कार्डासाठी वार्षिक फी आकारली जाते. याशिवाय रिवॉर्ड पॉईंट क्रेडिट कार्ड व कॅश बॅक क्रेडिट कार्ड अशी दोन कार्ड देऊ केली जातात.

pm Narendra modi, health sector
आरोग्यावर अडीच टक्के तरतुदीची पंतप्रधान मोदींची २०१७ ची घोषणा हवेतच! आरोग्यावरील तरतूद निराशाजनक…
Beetroot Juice Benefits
बीटाचा रस पिण्याचे फायदे वाचलेत का? ‘या’ वयोगटातील महिलांना होऊ शकतो मोठा लाभ; अभ्यासात सांगितले आहे ‘हे’ योग्य प्रमाण
Narendra Modi Foreign Direct Investment investors
लेख: मोदी असूनही थेट परकीय गुंतवणूक नाही?
Loksatta kutuhal Watch out for malpractices in the stock market
कुतूहल: शेअर बाजारातील गैरव्यवहारांवर नजर
NEET exam scam University Admission exam National Testing Agency
लेख: अविश्वासाच्या राजकारणातून परीक्षांचे केंद्रीकरण..
car insurance
पावसाच्या पाण्यामुळे कारचे नुकसान झाल्यास कोणत्या प्रकारचा विमा तुमचे पैसे वाचवेल माहितीये? घ्या जाणून…
Man Lost 13kgs In 21 Days With Water Diet
२१ दिवसांत १३ किलो वजन घटवणारा ‘मिलर’ आला चर्चेत! वजन कमी करण्यासाठी वापरलेला ‘हा’ फंडा तुम्हाला साजेसा आहे का?
Loksatta kutuhal Artificial Intelligence for Anomaly Detection in Financial Transactions
कुतूहल: वित्तव्यवहारांत विसंगती शोधक कृत्रिम बुद्धिमत्ता

प्रश्न२: क्रेडिट कार्डावरील फॉरेन एक्स्चेंज मार्क अप फी म्हणजे काय?

जेव्हा कार्ड धारक क्रेडिट कार्ड वापरून सेवा अथवा वस्तूचे पेमेंट करीत असतो (उदा: विदेशी मासिकाची वार्षिक वर्गणी, विदेशी ऑन लाईन कोर्स फी) अशा वेळी क्रेडिट कार्ड देऊ करणारी बँक व मास्टर कार्ड व व्हिसा , रूपे यासारख्या नेटवर्क कंपन्या करन्सी कन्व्हर्जन १% ते २.५% मार्क अप चार्गेस आकारीत असतात .

हेही वाचा >>>Money Mantra: DICGC- तुमच्या ठेवी आणि गुंतवणूक सुरक्षित ठेवणारी व्यवस्था

प्रश्न३: रिवॉर्ड पॉईंट क्रे़डिट कार्ड व कॅश बॅक क्रेडिट कार्ड यातील कोणते कार्ड घेणे फायदेशीर असते?

रिवॉर्ड पॉईंट क्रेडिट कार्डामध्ये एका ठरविक रकमेच्या खरेदीवर एक पॉईंट कार्डधारकाच्या खात्यावर जमा केला जातो व तो क्रेडिट कार्डाच्या स्टेटमेंट जमा केला जातो. उदा: रु.१०० च्या प्रत्येक खरेदीवर एक पॉईंट दिला जातो , समजा आपण कार्डावर रु.४३०० खर्च केला असेल तर आपल्याला ४३ पॉईंट दिले जातील व असे एका ठराविक तारखेपर्यंत जमा झालेले पॉईंट आपण रिडीम करू शकता या उलट जर आपण कॅश बॅक क्रेडिट कार्ड वापरत असाल तर एका ठरविक रकमेच्या खरेदीवर रकमेच्या काही टक्के कॅश बॅक क्रेडिट कार्ड खात्यावर जमा केला जातो. उदा: रु.५००० च्या पुढील खरेदीवर ५% कॅश बॅक असेल आणि आपण जर १०००० रुपयांची खरेदी केली असेल तर आपल्या खात्यावर ५०० रुपये कॅश बॅक जमा केला जातो. अशा सर्व कॅश बॅकची रक्कम आपल्या सबंधित महिन्याच्या क्रेडिट कार्ड बिलातून वळती केली जाते. कॅश बॅक कार्डामध्ये आपल्याला एका ठरविक रकमेपर्यंत खरेदी करण्यास प्रवृत्त केले जाते तर क्रेडिट पॉईंट आपल्या प्रत्येक खरेदीवर जमा होत असतात . आपल्या कार्डाच्या वापरानुसार आपल्याला योग्य तो पर्याय निवडावा.

प्रश्न४: क्रेडिट कार्डाची एकूण देय रक्कम व किमान देय रक्कम म्हणजे काय?

आपल्या बिलाची एकूण रक्कम म्हणजे एकूण देय रक्कम जी देय तारखेच्या आत भरली असता व्याज आकारणी होत नाही. या उलट किमान देय रक्कम म्हणजे एकूण देय रकमेच्या किमान काही % रक्कम देय तारखेच्या आत भरली असता डीफॉल्ट समजला जात नाही मात्र उर्वरित रकमेवर व्याज आकारले जाते. सर्वसाधारणपणे ५% इतकी किमान देय रक्कम किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम भरता येते. जरी डीफॉल्ट होत नसला तरी शक्य तोवर ही सुविधा वापरू नये.