जर तुम्हाला अद्याप प्राप्तिकर परतावा मिळाला नसेल, तर प्राप्तिकर विभागाला दिलेली बँकेची माहिती नक्कीच तपासून घ्या. प्राप्तिकर विभागाचे म्हणणे आहे की, ३५ लाख आयटीआरशी संबंधित प्रकरणात टॅक्स भरताना बँकेशी संबंधित माहितीमध्ये त्रुटी किंवा विसंगती असल्यामुळे प्राप्तिकर परतावे अडकले आहेत.

आतापर्यंत किती परतावा मिळाला?

चालू आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये यंदा ९ ऑक्टोबरपर्यंत १.५० लाख कोटी रुपयांचा परतावा जारी करण्यात आला आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) चे अध्यक्ष नितीन गुप्ता यांनी सांगितले की, अनेकांनी त्यांच्या आयटीआरमध्ये त्यांची जुनी बँक खाती दिलेली आहेत, तर अनेकांची बँक खाती अजूनही पडताळलेली नाहीत, परंतु शाखा स्थलांतरित झाल्यामुळे शाखेचा IFSC कोड बदलला आहे. बँकेशी संबंधित अशा अनेक गोष्टी आहेत.

switching your exercise routine have several benefits
काही ठराविक महिन्यानंतर व्यायामामध्ये बदल करणे आवश्यक आहे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
Can eggs help diabetic patient to control blood sugar
मधुमेही व्यक्तींनी अंडी खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते का? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
Vipreet Rajyog
विपरीत राजयोगामुळे या राशींना मिळेल छप्परफाड पैसा! उघडेल नशिबाचे दार
msrtc buses, Scrapped msrtc buses, Maharashtra ST Corporation, Scrapped buses, no data msrtc, good buses, bad buses, out of order buses, rti, maharashtra st, maharshtra buses, marathi news, maharashtra news,
धक्कादायक! ‘एसटी’कडे चांगल्या, नादुरुस्त बसेसची माहितीच नाही!

हेही वाचाः Money Mantra : Axis Bank ने लॉन्च केले नंबर नसलेले क्रेडिट कार्ड, कसे वापरता येणार? जाणून घ्या

तुमच्या बँक खात्याची पडताळणी करा

ते म्हणाले की, ज्यांना परतावा मिळत नाही त्यांनी त्यांचे बँक खाते एकदा तपासून पाहावे. ज्यांच्याकडे जुनी करदायित्व आहे, त्यांचेही परतावे अडकले आहेत. गुप्ता म्हणाले की, ५ हजार रुपयांपेक्षा जास्त देय असलेल्या करदात्यांना त्यांची जुनी खाती अद्ययावत करण्यास सांगितले जात आहे, जेणेकरून त्यांना त्यांचा परतावा मिळू शकेल. ते म्हणाले की, अशा रिफंडच्या सेटलमेंटला गती देण्यासाठी विभागाने मागणी व्यवस्थापन योजना सुरू केली आहे, ज्या अंतर्गत करदात्यांना प्रथम ईमेल पाठविला जातो आणि नंतर तीन दिवसांनी कॉल केला जातो.

हेही वाचाः आनंद महिंद्रा यांना मागे टाकत सोशल मीडियावर रतन टाटा बनले नंबर वन, X वर इतके फॉलोअर्स मिळाले

आतापर्यंत किती रिटर्न भरले आहेत?

गुप्ता म्हणाले की, चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत ७.२७ कोटी आयटीआर दाखल करण्यात आले आहेत, तर गेल्या आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या एप्रिल ते मार्च या कालावधीत ७.५ कोटी आयटीआर दाखल करण्यात आले होते. त्यामुळे मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षात निश्चितच जास्त रिटर्न भरले जातील. यावेळी ५३ लाख पूर्णपणे नवीन रिटर्न भरले आहेत. विभागाच्या आकडेवारीनुसार, चालू आर्थिक वर्षात ९ ऑक्टोबरपर्यंत निव्वळ प्राप्तिकर संकलन (परताव्यानंतर) ९.५७ लाख कोटी रुपये होते, जे मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत केलेल्या संकलनापेक्षा २१.८२ टक्के अधिक आहे. चालू आर्थिक वर्षासाठी प्रत्यक्ष कर संकलनाच्या उद्दिष्टापैकी ५२.५० टक्के आतापर्यंत जमा झाले आहे. प्राप्तिकर विभागाचे लोकांच्या उत्पन्नावर आणि त्यांच्या आयटीआरवर बारीक लक्ष असल्यामुळे अद्ययावत परताव्यांची संख्याही वाढत आहे. चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत १६.८ लाख अद्ययावत रिटर्न भरले गेले आहेत, ज्यातून सरकारला १३०० कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.