आनंद म्हाप्रळकर

मला आज हे पैसे गरजेचे नाहीत किंवा आज माझ्याकडे जे पैसे आहेत, ते मी भविष्यात कसे पुरवेन किंवा मला एखादी मोठी गोष्ट घ्यायची आहे पण; त्यासाठी आज माझ्याकडे पुरेसे पैसे नाहीत म्हणून मी थोडे-थोडे पैसे बाजूला काढले आणि मला हवे तेवढे पैसे जमा झाले की, ती गोष्ट घेतली असे होऊ शकते. म्हणजेच त्या पैशांचा मला हवा तसा वापर मी केला. यासाठी पैशांची बचत गरजेची असते. ज्या पैशांची मी बचत करू इच्छितो त्याची व्यवस्थित आणि पद्धतशीर गुंतवणूक केली तर त्याच पैशांवर आपल्याला चांगलं व्याज मिळतं आणि तुमचा निधी वाढतो. मग ते पैसे आपण वापरू शकतो, हे आपण मुलांपर्यंत पोचवायला हवं!

rte marathi news, rte latest marathi news
आरटीई अंतर्गत बदलांमुळे विद्यार्थ्यांच्या चौथी, सातवीनंतरच्या शिक्षणाचे काय होणार?
Concession for students to attend school due to highest temperature in state
विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्याबाबत सवलत… काय आहे शालेय शिक्षण विभागाचा निर्णय?
Career MPSC exam Guidance UPSC job
प्रवेशाची तयारी: व्यवस्थापन शिक्षणासाठी राज्यस्तरीय सीईटी
Nursing Student s Suicide Prompts Summer Vacation
नागपुरात विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर वसतिगृह रिकामे, महाविद्यालय प्रशासनाने मग…

आणखी वाचा : Money Mantra: लहान मुलांना पैशांचे व्यवस्थापन कसे शिकवाल? (भाग १)

कॉलेज जीवन आणि वाढता पॉकेट मनी

मुलं जेव्हा कॉलेजला जाऊ लागतात तेव्हा त्यांना एक ठराविक पॉकेट मनी दिला जातो. या वयापर्यंत त्यांना पैशाचे महत्त्व आणि पैसा कसा खर्च केला पाहिजे, याची पुरती समज असणे खूपच महत्त्वाचे ठरेल. पॉकेट मनी देताना पालक त्यांच्या पगारातील काही भाग देत असतात. तो पैसा त्यांनी मेहनत करून, दिवसाचे काही तास देऊन नोकरीतून कमावलेल्या पगारातील असतो. मुलं जर शिक्षणासाठी बाहेरगावी असतील, तर त्यांना जो राहण्या-खाण्या-पिण्याचा खर्च येतो त्यासाठी पालकांना अधिक पैसे पाठवावे लागतात. इथे मुलांना बजेटचं महत्त्व ठाऊक असलं पाहिजे. मुलांनी जर आपलं बजेट ठरवलं तर त्यांना ते अधिक सोपं जाईल.

आणखी वाचा : Money Mantra: कोणत्या शेअर्सचे भाव वाढले, कुणाचे कमी झाले?

मला दर महिन्याला अमुक एवढे पैसे पालकांकडून मिळतायत तर ते कसे वापरले पाहिजेत, जाण्यायेण्याचा खर्च किती आहे, खाण्यापिण्याचा खर्च किती आहे, आपत्कालीन गोष्टीसाठी किती पैसे लागतील, आपत्कालीन परिस्थिती काय असू शकते या सगळ्याचा विचार मनात ठेवायला हवा. कॉलेजला जाणाऱ्या मुलांनी अशा पद्धतीने विचार करायला हवा आणि त्याप्रमाणे खर्च करावा. मौजमजा करायला हरकत नाही. सुट्टीच्या दिवशी बाहेर फिरायला जाणे किंवा नाटक-चित्रपट पाहणे, वाढदिवस साजरा करणे या सगळ्या गोष्टी सगळ्यांनी केल्या पाहिजेत. पण त्यासाठी आधीपासूनच पैशाचं व्यवस्थापन करायला हवं. म्हणजे मुलांनी हाही विचार केला पाहिजे की, आपण अशा पद्धतीने पैशाचं व्यवस्थापन करू की सारखं-सारखं आई वडिलांकडे पैसे मागावे लागणार नाहीत. पालकांचं सुद्धा दर महिन्याचं एक ठराविक बजेट असतंच की! आता मुलं नक्कीच तेवढी मोठी झालेली आहेत की त्यांना हे कळेल, तेवढी समज त्यांना असेल!

आणखी वाचा : Money mantra: रिव्हर्स मॉर्गेज पद्धती आहे तरी कशी?

बँकिंगच्या विविध सेवा-सुविधा

पुढचा टप्पा असतो तो म्हणजे, बँकिंगच्या विविध सेवा-सुविधांचा उपयोग करणे. डेबिट कार्ड, जीपे, पेटीएम, डिजिटल वॉलेट हे सगळं मुलांना शिकवणं पालक म्हणून गरजेचं आहे. इथे क्रेडिट कार्डाचा उल्लेख मुद्दाम टाळला आहे. कारण त्यावर नियंत्रण राहू शकत नाही, खर्च हाताबाहेर जाऊ शकतो, अशी शक्यता सर्वाधिक आहे. डेबिट कार्ड म्हणजे माझ्याकडे जेवढे पैसे आहेत तेवढेच मला वापरायला मिळणार. म्हणून मुलांना डेबिट कार्ड द्यावं, क्रेडीट कार्ड देऊ नये. अगदीच तुमच्या मुलांवर तुमचा विश्वास असेल तर क्रेडिट कार्ड द्या. पण त्यावरून खर्चाची एक ‘मर्यादा’ सेट करा आणि जे ‘ॲड ऑन कार्ड’ मिळतं त्याची निवड करा. प्रत्येक विनिमयाच्या समयी त्याचा ‘ओटीपी’ हा पालकांच्याच मोबाईलवर येईल आणि पालक म्हणून तुम्ही नियंत्रण ठेऊ शकाल. या गोष्टी वापरायला दिल्यानंतर मुलांना सुद्धा त्यांची जबाबदारी कळली पाहिजे. या गोष्टी त्यांना उपलब्ध करून देताना पालकांनी त्याच्या वापराबद्दलचं शिक्षणही दिलं पाहिजे.