scorecardresearch

Premium

Money Mantra : म्युच्युअल फंड एसआयपी आता २५० रुपयांपासून सुरू करता येणार, सेबी प्रमुखांनी सांगितली योजना

सेबीला म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीची मर्यादा २५० रुपये करायची आहे. असे झाल्यास अगदी लहान गुंतवणूकदारही दरमहा SIP (Systematic Investment Plans) द्वारे आपला गुंतवणुकीचा प्रवास सहज सुरू करू शकतो.

SEBI chief Madhabi Puri Buch
म्युच्युअल फंड एसआयपी आता २५० रुपयांपासून सुरू करता येणार, सेबी प्रमुखांनी सांगितली योजना (फोटो क्रेडिट- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Mutual Funds SIP: बाजार नियामक सेबीला म्युच्युअल फंडां (Mutual Funds)मध्ये गुंतवणूक करण्यासाठी सर्वसामान्यांमध्ये उत्साह निर्माण करायचा आहे. यासाठी सेबीला म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीची मर्यादा २५० रुपये करायची आहे. असे झाल्यास अगदी लहान गुंतवणूकदारही दरमहा SIP (Systematic Investment Plans) द्वारे आपला गुंतवणुकीचा प्रवास सहज सुरू करू शकतो. सेबीच्या अध्यक्षा माधबी पुरी बुच यांनी एका कार्यक्रमादरम्यान या योजनेचा खुलासा केला.

म्युच्युअल फंड उद्योग आता ५० ट्रिलियन रुपयांचा

सेबी प्रमुख पुरी यांचे हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा म्युच्युअल फंड उद्योग ५० ट्रिलियन रुपयांचा झाला आहे. ते म्हणाले की, म्युच्युअल फंडातील छोट्या गुंतवणुकीच्या योजना प्रत्येक व्यक्तीला आर्थिक व्यवस्थेशी जोडण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतील. यामुळे भारतीय शेअर बाजाराचाही विकास होईल. त्यामुळे सेबी म्युच्युअल फंड चालवणाऱ्या कंपन्यांसह २५० रुपयांच्या एसआयपीची शक्यता तपासत आहे. ही SIP अस्तित्वात आणण्यासाठी सेबी सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे.

Investing for tax benefit including SIP or Lump Sum Investment Multi asset fund filed by Mahindra Manulife print eco news
SIP अथवा एकरकमी गुंतवणुकीसह कर लाभासाठी गुंतवणूक; महिंद्रा मनुलाइफकडून ‘मल्टी ॲसेट फंड’ दाखल
4 Crore Fraud with Axis Bank in Kalyan
कल्याणमधील ॲक्सिस बँकेची घरखरेदी-विक्रीत चार कोटींची फसवणूक
investments under 80c marathi news, 80c investments marathi news
Money Mantra : ८०सी अंतर्गत गुंतवणूक करताना
unit linked insurance plan money mantra investment profit
Money Mantra : युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन म्हणजे नेमकं काय?

सध्या त्याची किंमत ५०० रुपयांपासून सुरू होते

सध्या काही म्युच्युअल फंडांमध्ये १०० रुपयेही गुंतवण्याची संधी आहे. पण त्यात इतके कमी पर्याय आहेत की ते लोकप्रिय होऊ शकले नाहीत. सध्या सर्वात लहान एसआयपी ५०० रुपये आहे. याशिवाय सेबी एक नवीन मालमत्ता वर्ग तयार करणार आहे, ज्यामध्ये उच्च जोखमीच्या गुंतवणूकदारांना संधी मिळेल.

नोव्हेंबरमध्ये एसआयपी गुंतवणुकीने विक्रमी उच्चांक गाठला

नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टनुसार, SIP द्वारे गुंतवणुकीने नोव्हेंबर २०२३ मध्ये विक्रमी उच्चांक गाठला आहे. प्रथमच म्युच्युअल फंडांमध्ये एसआयपीद्वारे १७ हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करण्यात आली आहे. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची ही पद्धत गुंतवणूकदारांना पसंत पडत आहे. नोव्हेंबरमध्ये उघडलेल्या १४.१ लाख नवीन खात्यांमुळे SIP खात्यांची संख्या ७.४४ कोटी झाली आहे, जी ऐतिहासिकदृष्ट्या उच्च पातळी आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mutual fund sip can now be started from rs 250 says sebi chief madhabi puri buch vrd

First published on: 09-12-2023 at 17:28 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×