Startup Valuation: गेल्या काही वर्षांत भारतात स्टार्टअपची लाट दिसून आली आहे. शार्क टँक इंडिया यांसारख्या शोमुळे लोकांचा स्टार्टअप्सकडे कल वाढला आहे. साधारणपणे जेव्हा जेव्हा स्टार्टअपची चर्चा होते, तेव्हा युनिकॉर्न स्टार्टअपचे नाव सर्वाधिक घेतले जाते. हा एक प्रकारचा स्टार्टअप आहे, ज्याचे मूल्य १ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त म्हणजे ८,३१९ कोटी रुपये आहे. ही संज्ञा काऊबॉय व्हेंचरचे संस्थापक एलिन ली यांनी २०१३ मध्ये प्रथम वापरली होती.
भारतात अनेक युनिकॉर्न स्टार्टअप्स
जेव्हा जेव्हा नवीन स्टार्टअप सुरू होते, तेव्हा त्याचा पहिला प्रयत्न युनिकॉर्न स्टार्टअप्सच्या क्लबमध्ये सामील होण्याचा असतो. भारतातील युनिकॉर्न स्टार्टअप्सची सर्वाधिक संख्या डिजिटल आधारित आहे, कारण ते तंत्रज्ञानावर अवलंबून असतात आणि वेगाने व्हायरल होतात. अशा परिस्थितीत अशा कंपन्यांचे मूल्यांकन झपाट्याने वाढते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, देशभरात युनिकॉर्न स्टार्टअपची संख्या १०८ आहे. २०२५ पर्यंत त्यांची संख्या १५० पर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
युनिकॉर्न व्यतिरिक्त अनेक प्रकारचे स्टार्टअप
मिनीकॉर्न स्टार्टअप
ज्या स्टार्टअप्सचे मूल्य १० लाख डॉलर्सपेक्षा जास्त म्हणजेच ८.३ कोटी रुपये आहे, त्यांना मिनीकॉर्न स्टार्टअप म्हणतात. साधारणपणे सर्व प्रारंभिक टप्प्यातील स्टार्टअप्सचे मूल्य सारखेच असते आणि स्टार्टअप्सच्या या क्लबमध्ये सामील होणे खूप सोपे असते.
हेही वाचाः भारताची ‘ही’ दारू संपूर्ण जगात पहिल्या क्रमांकावर, काय आहे किंमत?
सनीकॉर्न स्टार्टअप
ज्या स्टार्टअप्सचे मूल्य ८.३ कोटी रुपयांपर्यंत म्हणजेच लवकरच १० लाख डॉलर्सपर्यंत पोहोचून युनिकॉर्न बनण्याच्या तयारीत आहेत, अशा स्टार्टअप्सना सनीकॉर्न स्टार्टअप म्हणतात. सध्या भारतात असे एकूण ५० स्टार्टअप्स आहेत जे युनिकॉर्न स्टार्टअप बनण्याच्या शर्यतीत आहेत.
हेही वाचाः Money Mantra : बँक लॉकरमध्ये ठेवलेल्या रोख रकमेवर किती फायदा मिळतो? RBI चे नियम काय? जाणून घ्या
डेकाकॉर्न स्टार्टअप
ज्या स्टार्टअप्सचे मूल्यांकन १० बिलियन डॉलरपेक्षा जास्त आहे, त्यांना डेकाकॉर्न स्टार्टअप म्हणतात. जगात अशा स्टार्टअपची संख्या खूपच कमी आहे. Crunchbase Unicorn Board च्या जानेवारी २०२३ च्या आकडेवारीनुसार, जगभरात अशा फक्त ४७ कंपन्या आहेत, ज्या युनिकॉर्न स्टार्टअपच्या श्रेणीत येतात.
हेक्टोकॉर्न स्टार्टअप
‘Hocto’ हा एक ग्रीक शब्द आहे, ज्याचा अर्थ शंभर म्हणजे ज्या कंपन्यांचे मूल्य १०० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे, म्हणजेच ८.३२ लाख कोटी रुपये आहे, त्यांना हेक्टोकॉर्न स्टार्टअप कंपन्या म्हणतात. त्याला ‘सुपर युनिकॉर्न’ असेही म्हणतात. एलॉन मस्कची SpaceX ऑक्टोबर २०२१ मध्ये हेक्टोकॉर्न स्टार्टअप श्रेणीमध्ये सामील होणारी पहिली कंपनी ठरली. गुगल, अॅपल यांसारख्या कंपन्यांचीही नावे या श्रेणीत आहेत. या श्रेणीत कोणत्याही भारतीय कंपनीचा समावेश नाही.