जागतिक बाजारातील अस्थिरता आणि कंपन्यांच्या जाहीर झालेल्या निकालांमध्ये दिसलेली अनिश्चितता याचा परिणाम या आठवड्याच्या बाजारांवर स्पष्टपणे दिसून आला. आयटीसी, हिंदुस्तान युनिलिव्हर या दोन आघाडीच्या एफएमसीजी कंपन्यांनी जाहीर केलेले दुसऱ्या तिमाहीचे निकाल अपेक्षे प्रमाणे न आल्याने त्याचे पडसाद कंपन्यांच्या शेअर्समध्ये उमटले. गेल्या पाच सत्रांमध्ये हिंदुस्तान युनिवरचा शेअर जवळपास तीन टक्क्यांनी पडला तर आयटीसी दीड टक्क्यांनी घसरला.

गुरुवारी १९ ऑक्टोबरला बाजारामध्ये जो चढ-उतार झाला त्याची आकडेवारी बघितल्यास पैसे कसे आणि कुठून गुंतवले जातात याचा अंदाज येईल. परदेशी गुंतवणूकदारांनी १०९३ कोटी रुपयांचे शेअर्स विकले तर भारतीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी जवळपास ७५० कोटी रुपयांची खरेदी केली. ज्यावेळी बाजार खालच्या दिशेने जातात आणि परदेशी गुंतवणूकदार; विशेषतः संस्थात्मक गुंतवणूकदार विक्रीचा सपाटा लावतात त्यावेळी भारतीय संस्थात्मक गुंतवणूकदार खरेदी करताना दिसून येत आहेत.

In Vidarbha thousands of hectares of orchards and crops were destroyed due to unseasonal rains
विदर्भात हजारो हेक्टरवरील फळबागा, पिकांची नासाडी; तिसऱ्या दिवशीही अवकाळीचे तांडव
Retail inflation hit a five month low of 4.85 percent in March
किरकोळ महागाई दर ४.८५ टक्के; पाच महिन्यांच्या नीचांकी घसरण
Gold price bounced in four hours on Gudi Padwa 2024
गुढी पाडव्याच्या दिवशीच चार तासात सोन्याच्या दरात उसळी; ‘हे’ आहे आजचे विक्रमी दर…
jalgaon gold price marathi news
जळगाव सुवर्णनगरीत सोन्याची ७५ हजारांकडे वाटचाल

हेही वाचा… Money Mantra: एक आकर्षक पण दुर्लक्षित विमा योजना- Whole Life Insurance Policy

रिझर्व बँकेच्या जाहीर झालेल्या अहवालानुसार सप्टेंबर महिनाअखेरीस महागाई दरामध्ये थोडासा दिलासा मिळाला आहे व महागाईचा आकडा तीन महिन्याच्या नीचांक स्तरावर पोहोचला आहे. फळभाज्या, पालेभाज्या, पेट्रोल डिझेल या किमती नियंत्रणात राहिल्यामुळे रिझर्व बँकेला महागाईच्या आकड्याची ताबडतोब चिंता करण्याची गरज नाही असे रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी एका खाजगी अर्थ परिषदेमध्ये बोलताना म्हटले आहे.

महागाई नियंत्रण करण्यासाठी मे २०२० या महिन्यापासून रिझर्व बँकेने रेपो दर अडीच टक्क्याने वाढवला व त्यानंतर आपल्या पॉलिसी दरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही.

आठवडा घसरणीचा

आठवड्याअखेरीस निफ्टी०.४२% घसरून १९५४२ वर स्थिरावला, सेन्सेक्स ६५३९७ या पातळीवर स्थिरावला. मिडकॅप आणि स्मॉल कॅप मधील घोडदौडीला लगाम बसलेला दिसला. या आठवड्यात निफ्टी स्मॉल कॅप १०० ने ०.७९%, निफ्टी मिडकॅप १००ने १.१३% आणि NSE ५०० १.३०% ने घसरला.

या आठवड्यातील आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण घटना म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे समभाग घसरलेले दिसले. बँक निफ्टी तर खाली उतरलाच पण पीएसयु बँक निफ्टी या निर्देशांकात १.५७% एवढी घट नोंदवली गेली. निफ्टी मेटल, निफ्टी रियल इस्टेट, निफ्टी एफएमसीजी एक टक्क्यापेक्षा अधिक खालच्या पातळीवर बंद झाले. निफ्टी मध्ये कोटक महिंद्रा बँक, इंडसइंड बँक, स्टेट बँक लाइफ इन्शुरन्स या कंपन्यांचे समभाग घसरणीच्या काळातही दोन टक्क्यांनी वाढलेले दिसले. टाटा स्टील, भारत पेट्रोलियम, सिप्ला या कंपन्यांचे शेअर्स घसरले तर आयटीसी सर्वाधिक घसरण झालेला शेअर ठरला.

नेस्लेची स्प्लिटची घोषणा

नेस्ले या बहुराष्ट्रीय कंपनीने एका शेअरचे दहा शेअर मध्ये विभाजन करण्याची योजना जाहीर केली. या आठवड्यात आपले तिमाही निकाल जाहीर करताना कठीण आर्थिक परिस्थितीमध्ये सुद्धा नफ्यामध्ये कंपनीने नफ्यात ३७% इतकी घवघवीत वाढ दर्शवली आहे. संचालक मंडळाने १४० रुपये/ समभाग इतका घसघशीत लाभांश घोषित केला आहे.

बजाज ऑटो या कंपनीचा समभाग गुरुवारच्या सत्रात ५२ आठवड्याच्या उच्चांकाला पोहोचला. कंपनीने तिमाही निकालामध्ये वार्षिक सहा टक्के वाढ दर्शवल्यावर बाजाराकडून त्याचे स्वागत केले गेले. बाजारात अनेक दलाली पेढ्यांनी बजाज ऑटो या कंपनीचे शेअर्स विकत घेण्याविषयी आपली पसंती जाहीर केली आहे. या आठवड्यामध्ये १११ कंपन्यांचे समभाग ५२ आठवड्यातील उच्चांक पातळीवर पोहोचले. येत्या आठवड्यामध्ये अमेरिकन शेअर बाजारामध्ये घडून येणाऱ्या घडामोडी आणि मध्यपूर्वेतील अशांतता याचे पडसाद उमटत राहतील.

भारतीय कंपन्यांच्या व्यवसायावर जोपर्यंत थेट परिणाम होत नाही तोपर्यंत उत्तम दीर्घकालीन व्यवसाय वृद्धी असणारे शेअर्स मार्केट पडल्यानंतर विकत घेणे गुंतवणूकदारांसाठी हिताचे असेल.