अलीकडेच एका कार्यक्रमात श्री शरदराव यांचा परिचय झाला. त्याना माझी ओळख करून देताच ते म्हणाले,

” लोकसत्ता ऑनलाईन मध्ये इन्शुरन्स वर लिहितात, ते दिलीप बार्शीकर तुम्हीच का?”

Hanuman Jayanti Baby Boy unique Name and its meaning inspired by Lord Hanuman
Hanuman Jayanti : हनुमानाच्या नावावरून ठेवा आपल्या मुलांची नावे, पाहा एकापेक्षा एक सुंदर अन् अर्थपूर्ण नावांची लिस्ट
Ram Navami 2024 Wishes Messages Status in Marathi
Ram Navami 2024 Wishes : रामनवमीच्या द्या प्रियजनांना हटके शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक सुंदर मेसेज
A dream come true Man kneels on the ground and takes a selfie with a rickshaw watch the heartwarming VIDEO
स्वप्नपूर्ती! कष्टाच्या कमाईतून घेतली रिक्षा; व्यक्तीने गुडघे जमिनीवर टेकून रिक्षाबरोबर घेतला सेल्फी, पाहा हृदयस्पर्शी VIDEO
video captured unexpected sight of an elephant Visite foodgrain godown storage and extracting rice using trunk
अन्न-पाण्याच्या शोधात हत्तीची मानवी वस्तीकडे धाव, VIDEO पाहून नेटकऱ्यांनी व्यक्त केली चिंता

मी म्हटले “हो. तुम्ही वाचलात का त्यातला एखादा लेख?”

शरदराव: एखादा? अहो, सर्व लेख वाचलेत तुमचे. खूप सोपं करून लिहीता तुम्ही.

मी: धन्यवाद

शरदराव: पण त्या whole life insurance policy विषयी माहिती देणार होता तुम्ही, त्याचं काय झालं?

मी: खरंय .१०/१२ दिवस मी जरा सुटीवर होतो.

शरदराव: तुमची हरकत नसेल तर whole life insurance policy वर बोलू या का आपण?

मी: जरूर. पण मला सांगा, आधीचे तीन पॉलिसी प्रकार समजले का तुम्हाला?

शरदराव: सोप्पं आहे. विमेदार पॉलिसी काळात मेला तरच.. सॉरी हं..‌ त्याचा मृत्यु झाला तरच विमारक्कम मिळते, तो टर्म इन्शुरन्स. मुदत संपण्यापूर्वी विमेदाराचा मृत्यु झाला तर त्या वेळी नॉमिनीला किंवा मुदत संपताना मॅच्युरिटीच्या वेळी विमेदार जिवंत असेल तर त्याला रक्कम देणारी ती एंडौंमेंट पॉलिसी. मनी बॅक मध्ये एंडौंमेंट प्रमाणेच मृत्यु झाल्यास आधी नाहीतर मॅच्युरिटीच्या वेळी रक्कम मिळते. पण फरक असा आहे…मनी बॅक मध्ये विमा रकमेचा काही भाग पॉलिसी सुरू झाल्यानंतर ठराविक काळाने टप्प्याटप्प्याने मिळत राहतो आणि उरलेली रक्कम मॅच्युरिटीला मिळते. परंतु मधल्या काळात ही रक्कम देऊनही इन्शुरन्सचे संरक्षण मात्र पूर्ण विमा रकमेसाठी मुदतपूर्तीच्या अखेरच्या दिवसापर्यंत चालू राहते.

हेही वाचा… Money Mantra: ज्येष्ठ नागरिकांसाठी ठोस आधार

मी: वाह, शरदराव, अभिनंदन. तुम्ही अगदी मोजक्या शब्दात तिन्ही पॉलिसी प्रकार सांगितलेत. आता होल लाइफ पॉलिसी बद्दल मी सांगतो.

मी: whole life insurance policy या नावावरूनच तुमच्या लक्षात येईल की ही विमेदाराच्या आयुष्यभर चालणारी पॉलिसी आहे.

शरदराव: अरे बापरे. आयुष्यभर? मग ही पॉलिसी संपणार तरी कधी?

मी: आयुष्य संपल्यावर. म्हणजे विमेदाराचा मृत्यु झाल्यावर. त्याचवेळी नॉमिनीला क्लेम मिळेल.

शरदराव: अहो, मग ही तर टर्म इन्शुरन्स पॉलिसीच झाली की.

मी: सांगतो. दोन्ही मधला फरक तुम्हाला सांगतो. टर्म इन्शुरन्स पॉलिसी १५ वर्षे , २० वर्षे अशा एखाद्या ठराविक मुदतीसाठी घेतली जाते. त्या काळात विमेदाराचा मृत्यु झाला तरच नॉमिनीला विमा रक्कम मिळते. मुदत संपण्याच्या दिवशी विमेदार हयात असेल तर त्याला कोणतीही रक्कम मिळत नाही. मान्य?

शरदराव: हो सर. एकदम मान्य. इथं मॅच्युरिटी क्लेम नाहीच. असलाच तर डेथ क्लेम.

मी: बरोबर. आता मघाशी म्हटल्याप्रमाणे whole life insurance policy ही विमेदाराच्या आयुष्यभर चालणारी आणि आयुष्य संपले की म्हणजेच मृत्यु झाल्यावर नॉमिनीला विमा रक्कम मिळणार. त्यामुळे या पॉलिसीसाठी ठराविक टर्म/मुदत नाही. केव्हा ना केव्हा विमेदाराचा मृत्यु होणार आणि नॉमिनीला रक्कम मिळणार हे नक्की आहे. आलं का लक्षात?

शरदराव: हो. म्हणजे टर्म इन्शुरन्स मध्ये क्लेम रक्कम मिळेलच असे नाही, पण होल लाइफ मध्ये नक्की तारीख सांगता येणार नाही, पण जेव्हा केव्हा मृत्यु होईल तेव्हा रक्कम मिळणारच.

मी: बिल्कुल सही. अगदी थोडक्यात सांगायचं तर जर(पॉलिसी काळात) मृत्यु झाला तरच क्लेम मिळेल. ही झाली टर्म इन्शुरन्स पॉलिसी.

आणि

जेव्हा केव्हा मृत्यु होईल तेव्हा क्लेम मिळेल. ही आहे whole life insurance policy.

शरदराव: सर, याचा प्रिमियम मग टर्म इन्शुरन्स पेक्षा जास्त असणार हे उघड आहे. पण तो आयुष्यभर भरणं अवघड नाही का?

मी: वाह. योग्य प्रश्न विचारलात. यामध्ये पॉलिसी टर्म निवडता येत नसली तरी प्रीमियम भरण्याची मुदत मात्र निवडता येते.

उदाहरणार्थ, ही पॉलिसी घेणाऱ्या व्यक्तीचे वय सध्या ४० वर्षं आहे. तो म्हणेल की मी फक्त २० वर्षे प्रीमियम भरेन. म्हणजेच या व्यक्तीची प्रीमियम भरण्याची जबाबदारी ६० व्या वर्षी संपेल. तिथून पुढे त्याला प्रीमियम भरावा लागणार नाही. पण पॉलिसी चालूच राहील, बोनस दरवर्षी जमा होतच राहील आणि ज्या वेळेस विमेदाराचा मृत्यू होईल त्यावेळेस नॉमिनीला क्लेम रक्कम मिळेल. अर्थात ४० वर्षीय दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला असे वाटले की मी आयुष्यभर प्रीमियम भरू शकेन, मला काहीच अडचण नाही. तर तसा पर्यायही तो निवडू शकतो. आता या दोघांपैकी साठ वर्षापर्यंतच प्रीमियम भरणाऱ्या व्यक्तीपेक्षा आयुष्यभर प्रीमियम भरायला तयार असणाऱ्या व्यक्तीचा प्रीमियमचा हप्ता अर्थातच कमी असेल. प्रत्येक विमा कंपनी whole life insurance policyमध्ये असे प्रीमियम भरण्यासाठी वेगवेगळे पर्याय देत असते. त्यातील आपणाला योग्य तो पर्याय निवडता येतो.

हेही वाचा… Money Mantra: गुंतवणूक करण्याआधी हे वाचाच

मी: आता शेवटचा एक मुद्दा सांगतो. या पॉलिसीमध्ये फक्त डेथ क्लेम असला, मॅच्युरिटी क्लेमचा प्रश्न उद्भवत नसला तरी सुद्धा काही विशिष्ट परिस्थितीमध्ये या पॉलिसी मध्ये सुद्धा मॅच्युरिटी क्लेम विमेदाराला मिळू शकतो.

उदाहरणार्थ ,कोणत्याही विमेदाराने वयाची शंभरी पूर्ण केली तर मॅच्युरिटी क्लेम रक्कम त्या विमेदाराला देऊन करार संपुष्टात आणला जातो.

पुण्याचे भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांची whole life insurance policy एलआयसी कडे होती. ज्यावेळेस महर्षी कर्वे यांनी वयाची शंभर वर्षे पूर्ण केली, त्यावेळेस त्यांना सन्मानपूर्वक त्यांच्या पॉलिसीचा मॅच्युरिटी क्लेमचा चेक प्रदान करण्यात आला होता.

आता या नियमात आणखी बदल होऊन एलआयसी आणि इतर कंपन्या सुद्धा विमेदाराने वयाची ८०/८५ अशी वर्षे पूर्ण केल्यानंतर whole life insurance policy मध्ये मॅच्युरिटी क्लेम म्हणजेच मूळ विमा रक्कम अधिक बोनस अशी रक्कम खुद्द विमेदाराला प्रदान करत असतात. या संदर्भातील माहिती त्या त्या कंपनीकडे माहिती पत्रात मिळू शकते.

जाता जाता आपण एक छोटंसं उदाहरण पाहू. समजा क्ष या ४० वर्षाच्या व्यक्तीने ५ लाखाची २० वर्षे मुदतीची टर्म इन्शुरन्स पॉलिसी आणि त्याचबरोबर ५ लाखाची whole life insurance policy घेतलीय,ज्यासाठी तो २० वर्षे प्रीमियम भरणार आहे.

शक्यता १) क्ष चा वयाच्या ५५ व्या वर्षी मृत्य झाला.
शक्यता २) क्ष चा ६५ व्याज वर्षी मृत्यु झाला

यामध्ये नॉमिनीला

१) मध्ये
टर्म इन्शुरन्स चे ५ लाख आणि whole life insurance policyचे ५ लाख+ १५ वर्षांचा बोनस इतकी रक्कम मिळेल.

२) मध्ये
टर्म इन्शुरन्स करार ६० व्या वर्षी संपला. कारण त्यादिवशी विमेदार हयात होता. कोणतीही रक्कम मिळणार नाही.

whole life insurance policyमध्ये ५ लाख विमा रक्कम+ २५ वर्षांचा बोनस इतकी रक्कम मिळेल.

शरदराव: कन्सेप्ट एकदम क्लिअर. धन्यवाद सर.

मी: वेलकम. बाय.