कल्पना वटकर

तुमचा सिबिल स्कोअर चांगला नाही, म्हणून बँका कर्ज नाकारत असतील तर आमच्याकडे या. आम्ही सिबिल स्कोअर पाहत नाही, अशा आशयाची एक जाहिरात तुम्ही रेडिओवर नक्की ऐकली असेल. आजच्या या लेखाद्वारे आपण सिबिल स्कोअर म्हणजे काय आणि सिबिल स्कोअर चांगला असण्याचे महत्त्व जाणून घेऊ.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

‘क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो ऑफ इंडिया लिमिटेड’ अर्थात सिबिल, ही भारतातील पत मानांकन कंपनी आहे असे म्हणता येईल. एखाद्या व्यक्तीच्या आणि संस्थेच्या कर्ज परतफेड आणि क्रेडिट कार्ड यांसारख्या कर्जासंबंधित व्यवहारांचा दस्तऐवजाचा संग्रह आणि देखरेख करण्याचे काम ही कंपनी करते. हा दस्तऐवज कंपनीला पुरविण्याचे काम सर्व वित्त पुरवठादार करतात. या माहितीचे संख्यात्मक विश्लेषण करून त्या व्यक्तीचा ‘क्रेडिट इन्फॉर्मेशन रिपोर्ट’ (सीआयआर) आणि सिबिल स्कोअर विकसित केला जातो.

हेही वाचा >>>ह्युंदाईच काय, ॲमेझॉन, सॅमसंगला भारतीय बाजारात सूचिबद्धतेचे आकर्षण… बाजार भांडवलात २०३० पर्यंत दुपटीहून अधिक वाढीचा आशावाद व्यक्त करणारा अहवाल 

क्रेडिट कार्ड हे एक प्रकारचे मर्यादेसह मंजूर केलेले आवर्ती कर्ज घेण्याचे भौतिक साधन आहे. क्रेडिट कार्डचा वापर वस्तू आणि सेवा खरेदी करण्यासाठी विहित अटी आणि शर्तींच्या अधीन केला जातो. जर क्रेडिट कार्डचा वापर व्यवस्थित केला तर तुमचा उत्तम कर्ज परतफेडीचा इतिहास (क्रेडिट रेकॉर्ड) तयार होऊ शकतो.

आजच्या लेखातून बँकेच्या चुकीमुळे आणि कर्जदाराच्या अज्ञानामुळे ‘सिबिल रेकोर्ड’ कसा खराब झाला, हे एका सत्य घटनेच्या आधारे पाहू. कर्जदाराची ओळख लपविण्यासाठी अर्थात कर्जदाराचे नाव बदलले आहे.

अजय, वय ३५ वर्षे, हे नियमित क्रेडिट कार्ड वापरत होते. देय तारखांच्या आधी देय रक्कम बँकेला देत असत. दहा वर्षांपूर्वी काही आर्थिक समस्या निर्माण झाल्याने काही काळ ते देय तारखांना बँकांना देय रकमेची परतफेड करू शकले नाहीत. परिस्थिती अधिक बिकट झाल्याने त्यांना क्रेडिट कार्डच्या रकमेची उशिरादेखील परतफेड करणे शक्य झाले नाही. परंतु अजय पैसे देण्यास इच्छुक असल्याने त्यांनी बँकेशी संपर्क साधला आणि सुरुवातीच्या वाटाघाटीनंतर औपचारिक पत्राद्वारे समझोत्यासाठी अर्ज केला. या अर्जात त्यांनी त्याच्यासमोरील आव्हाने तपशीलवार नमूद केली. बँकेने ‘ओटीएस’ (एकरकमी समझोता) रकमेसाठी सहमती दर्शवली आणि अजय यांनी ठरलेल्या निश्चित झालेल्या अटींनुसार रक्कम दिली.

हेही वाचा >>>Money Mantra: शेअर बाजारात आता पुढे काय?

हे प्रकरण बंद झाल्याची अजय यांची समजूत होती. त्याने पुन्हा एकदा गृहकर्ज मिळवण्यासाठी बँकेशी संपर्क साधला. बँकेने त्याच्या ‘सिबिल’ रेकॉर्डमध्ये क्रेडिट कार्ड खात्यात ‘राइटऑफ’ (निर्लेखित) म्हणून नोंद असल्याचे सांगून त्यांना कर्ज देण्यास नकार दिला. अजय, यांना त्यांच्या ‘क्रेडिट रिपोर्ट’मधील ही नोंद पाहून धक्का बसला. ही घटना ते २५ वर्षांचे असताना १० वर्षांपूर्वी घडली होती आणि त्यांनी औपचारिकरीत्या देय रक्कम बँकेला दिली होती. त्यांनी पुन्हा एकदा संबंधित बँकेशी संपर्क साधला आणि तक्रार केली की बँकेने समझोता केलेल्या क्रेडिट कार्ड रकमेची ‘सिबिल रेकॉर्ड’मध्ये अद्ययावत नोंद न करता ‘सिबिल रेकॉर्ड’मध्ये ‘राइटऑफ’ म्हणून नोंद करणे चुकीचे असून बँकेने या दस्तऐवजात सुधारणा करावी अशी विनंती केली. दोन प्रतिसादांमध्ये बँक अधिकाऱ्याने त्यांना ‘क्रेडिट रेकॉर्ड’ अद्ययावत करण्यास थकीत रक्कम भरण्याचा सल्ला दिला. बँकेच्या अधिकाऱ्याने प्रकरणाचा तपास न करता हे प्रकरण हाताळले आणि स्पष्ट उत्तरे दिली नाहीत. वारंवार विनंती करूनही बँकेने सुधारणा न केल्याने, अजय यांनी बँकिंग लोकपालकडे तक्रार केली. बँकिंग लोकपालांनी अजय यांनी दावा केलेल्या तथ्यांची पुष्टी करण्यास बँकेला सांगितले. बँकांनी ग्राहकांशी झालेले लिखित संप्रेषण सामायिक करण्यास सांगितले. बँकेने मान्य केले की, तांत्रिक समस्येमुळे पूर्वीचा दस्तऐवज उपलब्ध नाही, ही बाब खूप जुनी असल्याने बँक संबंधित कागदपत्रेही सादर करू शकली नाही. बँकिंग लोकपालांनी बँकेला सल्ला दिला की, बँकेने ‘सिबिल’ नोंद अद्ययावत करून बँकेने पुरविलेल्या सेवांमध्ये उणीव राहिल्याने अजय यांना झालेल्या मानसिक त्रासाबद्दल भरपाई द्यावी.

हेही वाचा >>>Money Mantra:‘विकसित भारताचा’ लाभार्थी

अजय यांनी बँकेशी झालेला पत्रव्यवहार सादर केल्याने निकाल अजय यांच्या बाजूने दिला गेला. वाचकांनी या गोष्टीतून दोन धडे घेणे आवश्यक आहे. पहिली गोष्ट क्रेडिट कार्ड देय रक्कम दिल्यावर त्याची नोंद सिबिल दस्तऐवजात झाली किंवा नाही याची खात्री करणे आवश्यक होते. अजय नियमितपणे त्यांचा ‘सिबिल स्कोर’ तपासून बँकिंग लोकपालांकडे तक्रार करणे टाळू शकले असते.

आता ‘सिबिल’बद्दल अधिक माहिती घेऊ.

‘सिबिल स्कोअर’ हा एखाद्या व्यक्तीच्या कर्ज फेडीचा तीन अंकी सारांश असतो. ‘सिबिल’ अहवालाला ‘क्रेडिट इन्फॉर्मेशन रिपोर्ट’ असेही म्हणतात. ‘सिबिल स्कोअर’ जितका जास्त तितके तुमचे कर्ज मंजूर होण्याची शक्यता जास्त असते. कर्ज देण्याचा निर्णय पूर्णपणे बँकेवर अवलंबून असतो. कर्ज आणि क्रेडिट कार्ड मंजूर करावे की नाही हे बँक ठरवत असते. ‘सिबिल’ कोणत्याही प्रकारे कर्ज मंजूर करायचे की नाही हे ठरवत नसतो. ‘सीआयआर’मध्ये तुम्ही घेतलेल्या आणि परतफेड सुरू असलेल्या आणि परतफेड पूर्ण केलेल्या कर्जांची तपशीलवार माहिती असते. जसे की, गृह कर्ज, वाहन कर्ज, क्रेडिट कार्ड, वैयक्तिक कर्ज, ओव्हरड्राफ्ट (ओडी) सुविधा इत्यादी. ‘सिबिल स्कोअर ३०० ते ९०० दरम्यान असतो. तुमचा ‘सिबिल स्कोअर ७०० किंवा त्यापेक्षा अधिक असेल तर तुम्ही बँकांच्या पसंतीचे कर्ज इच्छुक समजले जाता.

काही कारणांनी तुमचा कर्जाचे हप्ते थकले आणि तुमचा ‘सिबिल स्कोअर’ खराब झाला तर ‘सिबिल स्कोअर सुधारायचा कसा हा प्रश्न अनेकांना पडला असेल. ‘सिबिल स्कोअर’ विविध घटकांवर अवलंबून असतो. तुमच्या कर्जाचे हप्ते, क्रेडिट कार्डाचे हप्ते वेळेवर भरा. तुमच्या कर्जाचे हप्ते देण्याच्या तारखेची नोंद करा. नवीन क्रेडिट कार्ड घेण्याऐवजी जुन्या क्रेडिट कार्डांवर व्यवहार करा. नेहमी उपलब्ध मर्यादेपेक्षा कमी रक्कम क्रेडिटवर खर्च करा. तारण कर्जे (जसे की गृह कर्ज, वाहन कर्ज) आणि विनातारण कर्ज (जसे की वैयक्तिक कर्ज, क्रेडिट कार्ड) दोन्हीचा योग्य वापर करा. तुम्ही तुमच्या पत्नी मुलांना ‘ॲड ऑन’ कार्ड दिले असेल तर अशा कार्डांचे हप्ते वेळेवर भरले जात आहेत याची दक्षता घ्या. स्वीकार्य ‘क्रेडिट स्कोअर’ राखण्यासाठी तुमच्या क्रेडिट कार्ड वापरावर नियंत्रण ठेवा. एक कर्ज फेडल्यानंतर दुसरे कर्ज घ्या. एकाच वेळी खूप कर्जे घेऊ नका. तुमच्या क्रेडिट रिपोर्टचे वार्षिक पुनरावलोकन करा. तुमच्या क्रेडिट रिपोर्ट कोणी काढला तर तुम्हाला त्या बाबतीत अवगत केले जाते. जेव्हा तुम्ही तुमचा स्वतःचा क्रेडिट स्कोअर किंवा क्रेडिट रिपोर्ट तपासता तेव्हा ते ‘सॉफ्ट इन्क्वायरी’ म्हणून गणले जाते. तुम्ही तुमचा क्रेडिट स्कोअर कितीही वेळा तपासला तरीही तुमचा सिबिल स्कोअर प्रभावित होत नाही. तथापि, नवीन क्रेडिट कार्ड किंवा कर्ज अर्जाच्या वेळी बँका किंवा वित्तीय संस्थांनी तुमचा क्रेडिट अहवाल तपासला तर ती ‘हार्ड इनक्वायरी’ मानली जाते आणि त्याचा तुमच्या स्कोअरवर परिणाम होतो. एकाहून अधिक ‘हार्ड इनक्वायरी’ वारंवार केल्या गेल्यास, त्या व्यक्तीचे आर्थिक वर्तन ‘क्रेडिट हंग्री बिव्हेयीअर’ या सदरात मोडते, असे आर्थिक वर्तन आणि तुमच्या ‘क्रेडिट स्कोअर’ला हानी पोहोचवू शकते.

‘क्रेडिट इन्फॉरमेशन ब्युरो’चा ‘रिझर्व्ह बँक- इंटिग्रेटेड ओम्बड्समन स्कीम २०२१’मध्ये समावेश आहे. तुम्ही क्रेडिट स्कोअरबाबत समाधानी नसल्यास, क्रेडिट ब्युरोविरुद्ध तक्रार नोंदवू शकता. जर एखाद्या व्यक्तीने पूर्वी कधीही कर्ज किंवा क्रेडिट कार्ड घेतले नसेल आणि तुमची ‘क्रेडिट हिस्ट्री’ उपलब्ध नसेल तर वित्त पुरवठादारांना तुमची पत आणि तुम्हाला कर्ज देण्यात असलेली जोखीम ठरवणे कठीण होते. तुमचा क्रेडिट स्कोअर तयार करण्यासाठी ‘एंट्री लेव्हल क्रेडिट कार्ड’ मिळवा. या क्रेडिट कार्डचा वारंवार वापर करा आणि मुदतीच्या कालावधीत सकारात्मक क्रेडिट इतिहास तयार करण्यासाठी वेळेवर पेमेंट करण्याची खात्री करा. तुमच्या बँक मुदत ठेवीवर तुम्ही तारण कर्ज घेऊन तुम्ही तुमची क्रेडिट हिस्ट्री’ तयार करू शकता. हप्त्यावर फोन घेतल्याने ‘क्रेडिट हिस्ट्री’ तयार होते. गृहउपयोगी वस्तूसाठी कर्ज घेतल्यास या कर्जाची मुदत साधारण वर्षभर असते. या कर्जाची वेळेवर परतफेड केल्याने तुमची ‘क्रेडिट हिस्ट्री’ आणि क्रेडिट स्कोअर तयार करण्यात मदत होऊ शकते.

– लेखिका निवृत्त बँक अधिकारी आणि वकील आहेत.

Story img Loader