आरएफसी अकाऊंट म्हणजे रेसिडंट फॉरेन करंसी अकाऊंट. अनिवासी भारतीय किंवा भारतीय वंशाचा नागरिक म्हणजे पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन (पीआयओ) जो आता भारतात कायमस्वरूपी वास्तव्यास आला आहे असी व्यक्ती हे आरएफसी अकांऊट उघडू शकते. हे बचत खाते (सेव्हिंग अकौंट), चालू खाते(करंट अकौंट किंवा ठेव खाते( फीक्स्ड डिपॉझिट) पद्धतीने उघडता येते.

खाते उघडण्यासाठीचे नियम काय आहेत?

सदरची व्यक्ती अनिवासी भारतीय (एनआरआय ) असणे आवश्यक असते तसेच ती व्यक्ती १८ एप्रिल १९९२ किंवा त्यानंतर भारतात परत आली असली पाहिजे.
सदरची व्यक्ती भारतात परत येण्यापूर्वी किमान एक वर्ष तरी भारताबाहेर सलग असली पाहिजे. परत आल्यावर भारतात कायमची राहत असली पाहिजे.

हे खाते कसे उघडता येते?

असे खाते उघडण्याची सुविधा देऊ करणाऱ्या बँकेचा अकाऊंट ओपनिंग फॉर्म भरून सबंधित बँकेला सबमिट करावा व खालील कागदपत्रं बरोबर जोडावीत.
-पासपोर्ट फोटो कॉपीज
-पॅन वआधार कार्डची कॉपी
-सलग किमान एक वर्ष भारता बाहेर असल्याचा पुरावा म्हणून विसा व इमिग्रेशनचा शिक्का असलेल्या व्हिसाची कॉपी
-पासपोर्ट साईज फोटोग्राफ
-आर आफ सी डिक्लरेशन फॉर्म

हे खाते संयुक्त नावाने उघडता येते का ?

होय हे खाते संयुक्त नावाने निवासी भारतीय व्यक्ती सोबत उघडता येते मात्र पहिले नाव अनिवासी भारतीय किंवा पर्सन ऑफ इंडियन ओरिजिनचे (पीआयओ) असावे लागते व ही व्यक्ती हयात असेपर्यंत संयुक्त नाव असलेल्या दुसऱ्या व्यक्तीस खात्यावर व्यवहार करता येत नाहीत. तसेच या खात्यास निवासी तसेच अनिवासी व्यक्तीस नॉमिनी म्हणून देता येते.(फॉर्मर ऑर सर्व्ह्यावर)

हे खाते कोणत्या करन्सी (चलनात) उघडता येते ?

हे खाते अमेरिकन डॉलर, ब्रिटीश पौंड, जापनीज येन , इयुरो , ऑस्ट्रलियन डॉलर, कॅनडियन डॉलर व बँकेच्या धोरणानुसार अन्य विदेशी चलनात उघडता येते. प्रत्येक करन्सीसाठी वेगळे खाते उघडता येते. खातेदारचे विदेशी चलनातील उत्पन्न जसे की पेन्शन, विदेशी मालमत्तेतून मिळणारे उत्पन्न , रॉयल्टी यासारख्या उत्पन्नातून मिळणारी रक्कम या खात्यात जमा करत येते. तसेच या खात्यातील विदेशी चलन अन्य विदेशी चलनात रुपांतरित करता येते.