मधुरा आणि गौतम, उच्चशिक्षित आणि चांगल्या कंपनीमध्ये नोकरीला होते. साहजिकच, अनेक खासगी कंपन्यांमध्ये दिल्या जाणाऱ्या इतर सुविधांबरोबरच त्यांना त्यांचा ‘ वैयक्तिक ग्रुप मेडिकल इन्शुरन्स ‘ मिळाला होता. तरुण वय आणि उत्तम आरोग्य यांमुळे त्यांना कंपनीतर्फे मिळणारे इन्शुरन्स कव्हर ‘ योग्य आणि पुरेसे ‘ आहे असे वाटत होते.

एक दिवस अचानक गौतमला पोटदुखी सुरू झाली. अनेक औषधे, डॉक्टरी उपाय करूनही काही केल्या गुण येत नव्हता. अखेर एका तज्ज्ञ डॉक्टरांनी पूर्ण तपासणी अंती पोटाचे एक ऑपरेशन करायला लागणार असल्याचे सांगितले. वेळीच ऑपरेशन निर्विघ्नपणे पार पडले पण यासाठी हॉस्पिटलचे bill मात्र इन्शुरन्स रकमेपेक्षा जास्त आले. साहजिकच वरची रक्कम गौरव आणि मधुराला स्वतः भरावी लागली.

This is what happens when you chew cloves everyday
रोज एक-दोन लवंग चघळल्या तर शरीरावर काय परिणाम होईल? तज्ज्ञांकडून जाणून घ्या उत्तर…
Is Beetroot Really Vegetable Viagra How Eating Beet Helps For Sex Drive
बीट हे भाजीच्या रूपातील Viagra आहे का? सेक्स लाइफशिवाय बीट खाल्ल्याने काय फायदा होऊ शकतो?
Do not come to ask for votes placards from onion growers in Malwadi
मत मागण्यासाठी येऊ नये, माळवाडीत कांदा उत्पादकांकडून फलक
Kidnapping for not opening a bank account for stock market trading
मुंबई : शेअर बाजारातील व्यवसायासाठी बँक खाते उघडून न दिल्याने अपहरण

हेही वाचा : NPS withdrawal rules : १ फेब्रुवारीपासून खात्यातून पैसे काढण्याचे नियम बदलणार, सामान्यांवर काय परिणाम होणार?

मधुरा आणि गौतम सारखेच अनेकजण आज या विचार द्वंद्वात असतात की खरंच कंपनीचा ग्रुप मेडिकल इन्शुरन्स असताना, अजून एक खासगी स्वरूपाचा इन्शुरन्स घेऊन ‘ खर्च ‘ का वाढवावा?

खरंतर, खासगी हेल्थ इन्शुरन्स असणे केव्हाही चांगले.. कसे ते पाहू?

१. बदलत जाणारे नोकरीचे स्वरूप

आजकाल अनेक जण खासगी क्षेत्रात काम करतात. बहुतांश कंपन्या ‘ ग्रुप मेडिकल इन्शुरन्स ‘ देतात पण अजूनही काही लहान स्वरूपाच्या कंपन्यांमध्ये ही सुविधा असेलच असे नाही. शिवाय प्रत्येक कंपनीच्या नियम आणि अटींमध्ये फरक असतो, अंतर्गत होणारे आजार आणि सुविधा, इन्शुरन्स कव्हर, इत्यादींच्या तरतुदी वेगवेगळ्या असू शकतात.

बरेचजण चांगला पगार , पद आणि काम यांसाठी नोकऱ्या बदलत राहतात आणि त्या प्रत्येक नवीन कंपनीनुसार हे नियम त्यांना लागू होतात. इन्शुरन्स पॉलिसी पोर्ट करता येऊ शकते पण अनेकदा हे माहिती असतेच असे नाही.

आपला खासगी इन्शुरन्स मात्र आपल्याबरोबर कायम राहू शकतो. त्यात काही कालावधी नंतर आपल्याला no claim बोनस इत्यादीचा फायदा ही मिळतो.

हेही वाचा : Money Mantra : सतर्क राहा : भुर्दंड….

२. करिअर मधले बदल आणि हेल्थ इन्शुरन्स

आजकाल अनेक जण काही वर्षे नोकरी केल्यावर स्वतः चा व्यवसाय सुरू करतात. उत्पन्नाच्या अनिश्चिततेबरोबर व्यवसायामुळे त्यांचे ‘ कॉर्पोरेट ग्रुप मेडिकल इन्शुरन्स कव्हर ‘ सुद्धा जाते. अशावेळी मात्र त्यांना त्यांचा ‘ वैयक्तिक हेल्थ इन्शुरन्स ‘ बरोबर राहतो.

३. वाढत्या वयानुसार बदलत जाणारे नियम आणि अटी

वैयक्तिक हेल्थ इन्शुरन्स घेताना आपले वय, आधीपासून असणारे आजार आणि शारीरिक व्याधी, इत्यादी वर आपल्याला लागू होणारे premium ठरते. याच बरोबर Co-Pay, no claim bonus, Waiting Period इत्यादी ठरते. याचा विचार करून वेळीच आपला ‘ वैयक्तिक हेल्थ insufance’ घेतलेला चांगला!

हेही वाचा : Money Mantra : ‘कर्त्यां’चा त्रैमासिक आढावा

४. सर्व कुटुंबाचा समावेश एकाच पॉलिसीमध्ये

वैयक्तिक हेल्थ इन्शुरन्स घेताना आपण आपल्याबरोबरच आपल्या कुटुंबातील इतर व्यक्ती जसं की पत्नी/ पती, मुले, आई वडील यांचा समावेश करून एक ‘ family floater’ पॉलिसी घेऊ शकतो. कॉर्पोरेट इन्शुरन्स कव्हर नेहमीच सर्वसमावेशक असेलच असे नाही.

‘ हेल्थ इन्शुरन्स ‘ मुळे आपल्यावर येणारा वैद्यकीय खर्चांचा अतिरिक्त भार हलका होण्यासाठी मदतच होते. त्यामुळे याकडे निव्वळ ‘ खर्च ‘ म्हणून न बघता ‘ खर्चाला हातभार ‘ या दृष्टीने पाहावे!