खाद्यपदार्थ घरपोच देणाऱ्या कंपन्यात आघाडीचे नाव म्हणजे ‘झोमॅटो’ या कंपनीचा २०२३-२४ या वर्षाच्या पहिल्या तिमाहीचा निकाल ‘फूड डिलिव्हरी सेगमेंट’ मध्ये होणाऱ्या बदलांची नांदीच ठरणार आहे. कंपनीने या तीन महिन्यात दीड कोटी ऑर्डरची डिलिव्हरी केली. त्याचबरोबर यातून कंपनीला ७३१८ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले . आपल्याला झोमॅटो ही कंपनी फक्त आपल्या घरी ऑर्डर पोहोचवणारी कंपनी म्हणून माहिती असते. पण या कंपनीचे तीन प्रमुख व्यवसाय आहेत. झोमॅटो या नावाखाली ग्राहकांना घरपोच अन्नपदार्थ पोहोचवणे हा व्यवसाय केला जातो. देशभरातील रेस्टॉरंट आणि खाद्यपदार्थ विकणाऱ्या कंपन्यांशी कंपनीने करार केले आहेत. क्विक कॉमर्स या क्षेत्रात ‘ब्लिंक ईट’ या नावाने कंपनी कार्यरत आहे. खाद्यपदार्थ आणि व्यतिरिक्त दररोजच्या जीवनात लागणाऱ्या असंख्य वस्तू ऑनलाइन ऑर्डर करून ग्राहकांना मागवता येतात. या ब्रँड अंतर्गत कंपनीने या तिमाहीत २१४० कोटी रुपयाचा व्यवसाय केला, महिन्याला सरासरी ३९ लाख व्यवहार या कंपनीमार्फत पूर्ण केले गेले. बिझनेस टू बिझनेस (B2B) या अंतर्गत ‘हायपर प्युअर’ या ब्रँड नावाने कंपनी खाद्यपदार्थ बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल आणि अन्य पदार्थ व्यवसायांना/ व्यावसायिकांना पुरवते. गेल्या तीन महिन्यात भारतातील एकूण आठ शहरांमध्ये या ब्रँड अंतर्गत ६१७ कोटी रुपये एवढा व्यवसाय कंपनीने नोंदवला.

ग्रॉस ऑर्डर व्हॅल्यूचे (Gross Order Value) गणित

gudi padwa in Nagpur
नागपुरात गुढीपाडव्याला सुमारे १५० बालकांचा जन्म, मुलींचा टक्का अधिक
Onion auction closed for 11 days in nashik
कांदा लिलाव ११ दिवसांपासून बंद; नाशिकमध्ये एक लाख क्विंटलची खरेदी-विक्री ठप्प
Xiaomi SU7 EV Launch
बाकी कंपन्यांची उडाली झोप, २४ तासांत धडाधड विकली गेली ‘ही’ इलेक्ट्रिक कार, किंमत…
loksatta analysis midcap and smallcap stocks surged
विश्लेषण: सरत्या वर्षात शेअर बाजारात तेजीच तेजी… ‘स्मॉल कॅप’ ठरले छोटे उस्ताद! तेजीचे आणखी कोण भागीदार?

झोमॅटोचा मुख्य व्यवसाय घरपोच सेवा देणे हा असल्यामुळे दर महिन्याला, दर दिवसाला वेगवेगळ्या शहरांमध्ये किती रुपयाच्या आणि एकूण किती ऑर्डर्स येतात यावर कंपनीचा नफा अवलंबून असतो. म्हणजे एखादा ग्राहक झोमॅटोच्या ॲपवरून एखाद्या रेस्टॉरंट मधून जेवण घरपोच मागवतो तेव्हा त्या बिलामध्ये खाद्यपदार्थाचे बिल, घरपोच वस्तू पुरवण्याचा चार्ज आणि जीएसटी यांचा समावेश असतो. या एकंदरीत रकमेला ‘ग्रॉस ऑर्डर व्हॅल्यू’ असे म्हणतात. एखाद्या कंपनीच्या नफ्यामध्ये या ग्रॉस ऑर्डर व्हॅल्यूचे महत्व सर्वाधिक आहे.

मागच्या वर्षी तोट्यात यावर्षी नफ्यात

कंपनीचे उत्पन्न वाढत असले तरीही कंपनी नफ्यात नव्हती. मागच्या वर्षीच्या याच तिमाहीच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास आपल्याला असे दिसून येईल की कंपनीला एकूण १८६ कोटी रुपयांचा तोटा झाला होता, तर यावर्षी याच काळात दोन कोटी रुपयांचा नफा कंपनीने कमावला आहे. वर्षभरापूर्वीच्या आकडेवारी मधून असेही स्पष्ट होते की विक्रीतील वाढ ७१% एवढी घसघशीत नोंदवली गेली आहे. एबीटा मार्जिन (EBITA = Earnings Before Interest, Taxes, and Amortization)नऊ टक्के वाढून ०.४ टक्के एवढे झाले आहे.
कंपनी नफ्यात आल्यावर आता नव्या व्यवसायात पदार्पण करणार अथवा नाही याविषयी व्यवस्थापनाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भारतामध्ये डिलिव्हरी ॲप ही संकल्पनाच मुळात झोमॅटोने ग्राहकांमध्ये रुजवली. २००८ यावर्षी रेस्टॉरंटची साखळी तयार करणे इथून या उद्योगाचा जन्म झाला आणि २०१८ या वर्षात ‘हायपर प्युअर’ ही कंपनी विकत घेऊन झोमॅटोने आपला पहिला व्यवसाय विस्तार नोंदवला. सध्या अल्पकाळात कोणत्याही प्रकारचा नवा व्यवसाय सुरू करण्याचा कंपनीचा मानस नसला तरीही कंपनीकडे उपलब्ध असलेले भांडवल योग्य पद्धतीने राबवण्याकडे वापरण्याकडे कंपनीचा कायम कटाक्ष राहील असे व्यवस्थापनाने म्हटले आहे.

इ.एस.जी. (Environmental, Social, and Governance) आणि झोमॅटो

देशपातळीवर सगळीकडेच पर्यावरण स्नेही उद्योग ही संकल्पना जोर धरू लागली आहे. आपल्या व्यवसायातून कमीत कमी प्रदूषण व्हावे, पर्यावरणाची हानी टाळावी यासाठी कंपन्या प्रयत्नशील असतात. झोमॅटो ही कंपनी कुठल्या वस्तूंचे उत्पादन करत नसली तरीही कंपनीला पर्यावरण स्नेही व्यवसाय करायचा आहे. या वित्त वर्षापासून कंपनीने यासाठी पावले टाकायला सुरुवात केली आहे. झोमॅटोच्या ऑफिसेस आणि व्यवसायाच्या ठिकाणी पर्यावरण पूरक उपकरणे आणि ऊर्जा वापराला कंपनीने सुरुवात केली आहे. तसेच वस्तू घरपोच देताना जैविक इंधनाचा वापर न करता ‘इलेक्ट्रिक व्हेईकल’च्या माध्यमातून डिलिव्हरी करता येईल का? याबद्दल प्रयोगाला सुरुवात केली आहे. शुक्रवारी बाजार बंद होताना कंपनीचा बाजार भाव १०.२३.% वाढून ९५.४० रुपये एवढा होता.