Reliance Intelligence Launched By Mukesh Ambani: रिलायन्स इंडस्ट्रीजने शुक्रवारी भारतात आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) ला प्रोत्साहन आणि चालणा देण्यासाठी ‘रिलायन्स इंटेलिजेंस’ नावाची एक नवीन कंपनी सुरू केली आहे. ही कंपनी पूर्णपणे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मालकीची असणार आहे. भारताला एआय क्षेत्रात आघाडीवर बनवण्याचे उद्दिष्ट असल्याचे म्हणत, कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी रिलायन्सला टेलिकॉम, रिटेल आणि ऊर्जा व्यवसायासह “डीप-टेक एंटरप्राइझ” मध्ये रूपांतरित करण्याचे स्वप्न बोलून दाखवले.
ही घोषणा करताना मुकेश अंबानी म्हणाले की, “मला अभिमान आहे की, आर्टिफिशियल इंटेलिजेंस आधीच रिलायन्सचा डीप-टेक व्यवसाय बनण्याच्या मार्गावर आहे. यावर आणखी लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि याला गती देण्यासाठी, आज मला रिलायन्स इंटेलिजेंस नावाची एक नवीन पूर्ण मालकीची उपकंपनी स्थापन करण्याची घोषणा करताना आनंद होत आहे.
ही महत्वाकांक्षी योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी, रिलायन्सने गुगल आणि मेटा सारख्या सिलिकॉन व्हॅलीतील दिग्गज कंपन्यांशी हातमिळवणी केली आहे.
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई म्हणाले की, “गुगल आणि रिलायन्स एकत्रितपणे रिलायन्सच्या व्यवसायात जेमिनी एआय मॉडेल्सचा समावेश करतील, जामनगरमध्ये हरित ऊर्जेवर चालणारे क्लाउड क्षेत्र स्थापित करतील आणि संयुक्तपणे एआय स्मार्टफोन आणि उपकरणे विकसित करतील.” पिचाई यांनी पुढे स्पष्ट केले की, गुगल क्लाउड आता रिलायन्सचा सर्वात मोठा सार्वजनिक क्लाउड भागीदार असेल.
यावेळी, रिलायन्सने मेटासोबतही एक संयुक्त उपक्रम जाहीर केला आहे. या उपक्रमाचा उद्देश भारतीय व्यवसाय आणि सरकारी संस्थांना सुरक्षित आणि स्थानिक पातळीवर अनुकूल एआय प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणे आहे. मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग म्हणाले, “आम्हाला भारतातील प्रत्येक व्यक्तीला एआय आणि त्यापलीकडे सुपरइंटेलिजन्सची सुविधा द्यायची आहे. ही भागीदारी ओपन-सोर्स एआयला राष्ट्रीय स्तरावर सुरक्षित पद्धतीने कसे वाढवता येते हे दाखवेल.”
चार प्रमुख प्रकल्पांवर रिलायन्स इंटेलिजेंस करणार काम
- जामनगरमध्ये गिगावॅट-स्केल, एआय-रेडी डेटा सेंटरची निर्मिती
- जागतिक तंत्रज्ञान कंपन्या आणि ओपन-सोर्स क्षेत्रातील लोकांशी धोरणात्मक भागीदारी
- शिक्षण, आरोग्य, शेती आणि लघु व्यवसाय यासारख्या क्षेत्रात एआय सेवांचा विस्तार करणे