18 November 2017

News Flash

रहेजा कला महाविद्यालयाचा वार्षिक ‘कल्पोत्सव’ 

या कलाकृतींमधून काही निवडक कलाकृतींना पारितोषिक दिले जाते.

लोकसत्ता टीम | Updated: March 11, 2017 12:34 AM

 

वरळीतील एल. एस. रहेजा कला महाविद्यालयाचे वार्षिक कलाप्रदर्शन ३ ते ५ मार्च या कालावधीत महाविद्यालयात पार पडले. कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वर्षभरात केलेल्या कलाकृतींमधील सर्वोत्कृष्ट कलाकृती या प्रदर्शनात ठेवण्यात आल्या होत्या. या कलाकृतींमधून काही निवडक कलाकृतींना पारितोषिक दिले जाते. महाविद्यालयातील ‘व्हिज्युअल अ‍ॅण्ड कम्युनिकेशन आर्ट, डिजिटल फिल्ममेकिंग आणि डिजिटल आर्ट’ या विभागात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी वर्षभरात केलेली कामे या प्रदर्शनात पाहता येणार आहेत. रहेजा स्कूलच्या दर्शनी भागावर विद्यार्थ्यांनी विविधरंगी ग्राफिक्स लावले होते. प्रदर्शनातील प्रत्येक कलाकृती सर्जनात्मक, चिकाटी आणि सर्वापलीकडे जाऊन विद्यार्थ्यांच्या कुशाग्र बुद्धीची प्रचीती देणारी होती. ‘डिजिटल फिल्ममेकिंग’ विभागाने सादर केलेले लघुचित्रपट प्रेक्षकांची दाद मिळवून गेले. ज्यात या विषयातील सखोल अभ्यास आणि व्यावसायिकता दिसून आली. लघुचित्रपटांसाठी लागणारे दिग्दर्शन, संकलन, छायाचित्रण, कथा-पटकथा या तांत्रिक बाजू विद्यार्थ्यांनीच सांभाळल्या होत्या. ‘फॅशन टेक्नॉलॉजी’च्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कल्पक डिझाइन्सनी उपस्थितांची वाहव्वा मिळवली. ‘फोटोग्राफी’ आणि ‘डिस्प्ले डिझायिनग’मधील अद्ययावत प्रक्रिया आणि तंत्रज्ञानाची झलक तृतीय वर्ष व्हिज्युअल आणि कम्युनिकेशन आर्टच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या कलाकृतीमध्ये दिसून आली.

के सी महाविद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन

चर्चगेटच्या के सी महाविद्यालयाच्या ३७ वर्षे जुन्या ‘मराठी मंडळाचा’ वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा पार पडला. मराठी ही एक भाषा नसून ती एक संस्कृती आहे हे या मंडळात प्रामुख्याने दिसून येते, कारण इथे जवळपास निम्मे सदस्य अमराठी आहेत. या स्नेहसंमेलनाला निरोपाची एक झालर होती. गेली १७ वर्षे महाविद्यालयाच्या प्राचार्य पदाची धुरा सांभाळणाऱ्या डॉ. मंजु निचानी या सेवानिवृत्त होत असल्याने मराठी मंडळाने त्यांचा मानपत्र देऊन सत्कार केला. हे मानपत्र देण्यासाठी माजी प्राध्यापक कृष्णकांत शर्मा आणि माजी विद्यार्थी भरत जाधव हे उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना डॉ. निचानी यांनी मराठी मंडळाच्या एकजुटीला सलाम केला.

दालमिया महाविद्यालयात नोकरीमेळा

अक्षय मांडवकर

सध्या विद्यार्थ्यांना चांगले गुण असूनही सहज नोकरी मिळत नाही, कारण स्पर्धा वाढली असून नोकरी मिळविणे खूप कठीण झाले आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन मालाडमधील ‘दालमिया कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इकॉनॉमिक्स’ने ३ मार्च रोजी विद्यार्थ्यांसाठी नोकरीमेळा घेतला. आठवडाभर चाललेल्या या मेळ्यात सुमारे ८०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला, तसेच वेगवेगळ्या क्षेत्रांतील १४ स्टॉल महाविद्यालयीन आवारात उभारण्यात आले होते.

विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देणे आणि त्यांना निर्मितीक्षम बनवणे, विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रोत्साहित करण्यात महाविद्यालयाचा नेहमीच प्रयत्न सुरू असतो, असे दालमिया महाविद्यालयाच्या मुख्य समन्वयक श्रीमती सुभाषिणी नायकर यांनी सांगितले.

दालमिया महाविद्यालयाचे अध्यक्ष शरद रुईया आणि मुख्याधापक डॉ. एन. एन. पांडे आणि सेल्फ फायनान्स कोर्स, इंटर्नल क्वॉलिटी अशॉरन्स आणि स्टुडंट मॅनेजर कमिटी या सगळ्यांनी ‘दृष्यांत’ नोकरीमेळ्यात पुढाकार घेतला होता. उपाध्यक्ष नृपेंद्र चौहानच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. विविध करिअर पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी येथे वेगवेगळ्या क्षेत्रांतील १४ स्टॉल महाविद्यालय संकुलामध्ये लागले होते. ‘‘कॉलेजने आम्हा विद्यार्थ्यांबद्दल विचार करून नोकरीमेळ्याचे आयोजन केले आणि आम्हाला आमचे कौशल सिद्ध करायची संधी मिळाली यासाठी आम्ही खूप आभारी आहोत,’’ असे मत दालमियाच्या विद्यार्थ्यांनी केले.

First Published on March 11, 2017 12:34 am

Web Title: collage event