News Flash

सशस्त्र सीमा पोलीस दल: वैद्यकीय अधिकारी परीक्षा

डिकल ऑफिसर- उमेदवार वैद्यक शास्त्र या विषयातील पदवीधर असावेत.

अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना सशस्त्र सेना दल निवड मंडळातर्फे मुलाखत व वैद्यकीय तपासणीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांची निवड करण्यात येईल.

सशस्त्र सीमा पोलीस दलामध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून निवड करण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे घेण्यात येणाऱ्या मेडिकल ऑफिसर सिलेक्शन बोर्ड निवड परीक्षा : २०१५ साठी अर्हताप्राप्त उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
उपलब्ध जागा- या निवड परीक्षेअंतर्गत उपलब्ध जागांची संख्या ५९२ असून यामध्ये मेडिकल ऑफिसर (असिस्टंट कमांडंट) च्या ३६२ तर स्पेशालिस्ट मेडिकल ऑफिसर (डेप्युटी कमांडंट) च्या २२० जागांचा
समावेश आहे.
आवश्यक अर्हता- उमेदवार खालीलप्रमाणे अर्हताप्राप्त असावेत-
० मेडिकल ऑफिसर- उमेदवार वैद्यक शास्त्र या विषयातील पदवीधर असावेत. त्यांनी निर्धारित उमेदवारी पूर्ण केलेली असावी.
वयोमर्यादा- अर्जदारांचे वय ३० वर्षांहून अधिक नसावे.
० स्पेशालिस्ट मेडिकल ऑफिसर- अर्जदार वैद्यकशास्त्र विषयातील पदवीधर असावेत. त्यांनी निर्धारित उमेदवारी पूर्ण केलेली असावी. त्याशिवाय त्यांनी वैद्यकशास्त्र अथवा संबंधित विषयातील पदविका प्राप्त केलेली असावी.
वयोमर्यादा- अर्जदारांचे वय ४० वर्षांहून अधिक नसावे.
वरील पात्रतेशिवाय उमेदवार शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत.
वेतनश्रेणी, भत्ते व फायदे- निवड झालेल्या उमेदवारांना सशस्त्र सीमा दलात खालील वेतनश्रेणी मिळेल-
० मेडिकल ऑफिसर (असिस्टंट कमांडंट)- दरमहा १५,६००- ३९,१०० वेतनश्रेणी व रु. ५४०० श्रेणी भत्ता.
० स्पेशालिस्ट मेडिकल ऑफिसर- (डेप्युटी कमांडंट)- दरमहा १५,६००- ३९,१०० वेतनश्रेणी व रु. ६,६०० श्रेणी भत्ता.
वरील वेतनश्रेणीशिवाय उमेदवारांना सशस्त्र सैन्य दलाच्या नियमांनुसार इतर भत्ते, लाभ व भविष्यकालीन बढतीच्या संधीही उपलब्ध असतील.
अर्जासह पाठवायचे शुल्क- उमेदवारांनी आपल्या अर्जासह पाठवायचे शुल्क म्हणून ‘कमांडंट, २५ बटालियन एसएसबी, चितोरनी’ यांच्या नावाने असणारा व स्टेट बँक ऑफ इंडिया, सुलतानपूर, नवी दिल्ली कोड नं. ०६८३७ येथे देय असणारा १०० रु. चा डिमांड ड्राफ्ट पाठवणे आवश्यक आहे.
अर्जाचा नमुना व तपशील- अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १४ ते २० नोव्हेंबर २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली ‘सशस्त्र सीमा दल- मेडिकल ऑफिसर सिलेक्शन बोर्ड २०१५’ ची जाहिरात पाहावी.
अर्ज पाठविण्याची मुदत- विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील, कागदपत्र आणि डिमांड ड्राफ्टसह असणारे अर्ज दि कमांडंट, २५ बटालियन- एसएसबी, चितोरानी पोस्ट ऑफिस अर्जुनगड, नवी दिल्ली ११००४७ या पत्त्यावर १३ डिसेंबर २०१५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.

निवड प्रक्रिया
अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना सशस्त्र सेना दल निवड मंडळातर्फे मुलाखत व वैद्यकीय तपासणीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांची निवड करण्यात येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2015 12:13 am

Web Title: article on medical officer exam
Next Stories
1 ‘कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट’विषयक अभ्यासक्रम
2 कृषी विस्तार व्यवस्थापन अभ्यासक्रम
3 पटकथालेखनाकडे वळताना..
Just Now!
X