कोलकात्याच्या एस. एन. बोस नॅशनल सेंटर फॉर बेसिक सायन्सेस या संस्थेतील एमएस्सी- पीएचडी  अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे.
संशोधनपर पीएचडी
२०१५ अर्जदारांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, अप्लाइड मॅथेमॅटिक्स, बायो-फिजिक्स अथवा बायोकेमिस्ट्री यांसारख्या विषयातील एमएस्सी पात्रता किमान ६० टक्केगुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. त्यांना संशोधनपर कामाची आवड असावी.
पदव्युत्तर एमएस्सी- पीएचडी  
अर्जदारांनी बीएस्सी पदवी गणित व भौतिकशास्त्र हे विषय घेऊन किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. त्याशिवाय त्यांनी जेईएसटी अथवा एनजीपीई यांसारखी पात्रता परीक्षा दिलेली असावी.
वर नमूद केलेल्या पात्रता परीक्षेतील गुणांची टक्केवारी राखीव गटातील उमेदवारांसाठी ५५ टक्क्यांपर्यंत शिथिलक्षम आहे. अर्जदारांनी संबंधित पात्रता परीक्षा २०१३ च्या आधी दिलेली नसावी.
निवड प्रक्रिया
अर्जदारांची संबंधित पात्रता परीक्षेतील गुणांची टक्केवारी व प्रवेश पात्रता परीक्षेतील गुणांकाच्या आधारे त्यांना मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे संबंधित अभ्यासक्रमाला प्रवेश देण्यात येईल.
पाठय़वेतन
योजनेअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना संशोधनपर पीएच.डी करण्यासाठी नियमानुसार पाठय़वेतन देण्यात येईल.
एमएस्सी- पीएचडी संयुक्त अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या एमएस्सी अभ्यासक्रमाच्या दोन वर्षे कालावधीसाठी दरमहा १२ हजार रुपये व त्यानंतर त्यांची पीएच.डीसाठी नोंदणी झाल्यावर उर्वरित कालावधीसाठी नियमानुसार संशोधनपर पाठय़वृत्ती देण्यात येईल.
अधिक माहिती
अभ्यासक्रमांच्या संदर्भात अधिक तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रांत प्रकाशित झालेली एस. एन. बोस नॅशनल सेंटर फॉर बेसिक सायन्सेस, कोलकाताची जाहिरात पाहावी अथवा सेंटरच्या  http://www.base.res.in  या वेबसाइटला भेट द्यावी.
अर्ज करण्याची मुदत
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर १३ मे २०१५ पर्यंत अर्ज करावेत.