सानिया भालेराव – saniya.bhalerao@gmail.com

मागील लेखात आपण बायोइन्फॉर्मेटिक्सविषयी जाणून घेतले.  आज आपण या विषयामध्ये शिक्षण घेण्यासाठी उपलब्ध असलेले पर्याय जाणून घेणार आहोत. बारावीनंतर बायोइन्फॉर्मेटिक्स या विषयामध्ये शिक्षण घेण्यासाठीचे दोन मार्ग आहेत. एक म्हणजे नेहमीप्रमाणे बायोटेक्नॉलॉजी म्हणजे जैवतंत्रज्ञान या विषयामध्ये पदवी घेतल्यानंतर मग पदव्युत्तर पदवीसाठी बायोइन्फॉर्मेटिक्स निवडणे.  इंटरडिसिप्लिनरी विषय शिकताना खूपदा असे होते की ज्या विषयांत आपल्याला स्पेशलायझेशन करायचे असते त्या विषयातील पाया पदवीदरम्यानच पक्का के ला की विषयाची मूलभूत तत्त्वे पक्की होतात. त्यात बायोइन्फॉर्मेटिक्स हा विषय जेनेटिक्स, प्रोटिओमिक्स यांसारख्या विषयांवर आधारित असल्याने बायटेक्नॉलॉजीमध्ये बीटेक किंवा बीएस्सी करून मग एमटेक किंवा एमएस्सी बायोइन्फॉर्मेटिक्समध्ये करणे हा एक पर्याय असू शकतो. तसेच दुसरा पर्याय म्हणजे बारावीनंतर  बीटेक किंवा बीएस्सी बायोइन्फॉर्मेटिक्स या विषयात करायचे आणि मग त्यानंतर  एमटेक किंवा एमएस्सी या विषयात पूर्ण करायचे.

iiser marathi news, iiser admission marathi news
‘आयसर’च्या प्रवेश प्रक्रियेत बदल… आता कशी होणार प्रवेश परीक्षा?
employee in nagpur get bomb threat call to nse bse buildings
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज, नॅशनल स्टॉक एक्स्चेंज बॉम्बने उडवण्याची धमकी; नागपुरातील कर्मचाऱ्याला फोन
Mega block on Central Harbour and Trans Harbour route
मुंबई : मध्य, हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
Job Opportunity Recruitment of Junior Engineer
नोकरीची संधी: ज्युनियर इंजिनीअरची भरती

बारावीनंतर  जेईई परीक्षा देऊन आयआयटी खरकपूर, मुंबई, चेन्नई, दिल्ली, कानपूर इथे बीटेक बायोइन्फॉर्मेटिक्ससाठी  प्रवेश घेता येऊ शकतो.  तसेच इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सेस बेंगळूरु इथेसुद्धा या विषयात पदवी घेता येऊ शकते. सावित्रीबाई फुले विद्यापीठातील बायोइन्फॉर्मेटिक्स डिपार्टमेंटसुद्धा बीएस्सी आणि एमएस्सीसाठी उत्तम आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील स्कूल ऑफ कॉम्प्युटेशनल अँड इंटिग्रेटीव्ह सायन्सेसमध्ये एमएस्सीसाठी कम्प्युटेशनल बायोलॉजी ही बायोइन्फॉर्मेटिक्सच्या एका सब टॉपिकमध्ये एमएस्सी आणि पुढे पीएचडीसुद्धा करता येऊ शकते. जीआरईसारख्या परीक्षा देऊन भारताबाहेरदेखील बायोइन्फॉर्मेटिक्समध्ये  एम एस किंवा पीएचडी करता येऊ शकते.

मुळात बायोइन्फॉर्मेटिक्स हा विषय कम्प्युटेशनल टेक्निक्सशी जोडल्या गेला असल्याने या विषयामध्ये जावा, पर्ल, पायथॉनसारख्या कोडिंगच्या भाषा शिकणं, प्रोग्रामिंग करणे हे अभियांत्रिकीच्या पदवीदरम्यानच शिकवले जाते.  त्यामुळे या विषयात पदव्युत्तर पदवी घेतल्यावर बऱ्याचशा आयटी कंपन्यांमध्ये नोकरी मिळण्याची संधी असते. एखादा विषय शिकल्यावर रोजगार  मिळण्याच्या संधी नेमक्या किती असा ठोस आकडा देता येऊ शकत नाही. पण आजच्या घडीला बायोइन्फॉर्मेटिक्स हे चलनी नाणे आहे हे मात्र खरे! जर विषय शिकत असतानाच त्यातले बारकावे जाणून घेऊन अभ्यास केला तर डेटा मायनिंग, डेटा अ‍ॅनालिसिससारख्या बायोलॉजिकल सायन्सेसमध्ये नव्याने विस्तारत जाणाऱ्या क्षेत्रामध्ये उत्तम करिअर करता येऊ शकते.

खूपदा काय होते की, विद्यार्थी हा विषय निवडतात खरा पण अभ्यास करताना अभ्यासाच्या ठोकळेबाज पद्धतीत, साच्यात अडकू न पडतात. मग के वळ पाठांतर किं वा गुणांसाठीची घोकं पट्टी अशा अ‍ॅप्लिेके शन आधारित विषयांत कामी येत नाही. त्यामुळेच बायोइन्फॉर्मेटिक्स या विषयाचा आवाका समजावून घेणे फार गरजेचे आहे. जो विषय आपण शिकत आहोत, त्याचा विस्तार कसा होणार आहे, याची माहिती करून घेणे अत्यंत गरजेचे आहे.

उदा. तुम्ही एखादे अल्गोरिदम शिकला किंवा जीनोम सिक्वे न्सिंगची एखादी मेथड शिकलात तरी ती पद्धत शिकल्यानंतर  आपण ती कु ठे अप्लाय करू शकतो, वापरू शकतो हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. विषय शिकवणाऱ्या शिक्षकाने जरी या गोष्टी समजावून सांगितल्या नसतील तरीही विद्यार्थ्यांनी आपणहून हे अ‍ॅप्लिकेशन शोधून काढले पाहिजे. वेगवेगळे सॉफ्टवेअर टूल्स शिकत असताना याचे प्रोग्रामिंग कसे झाले असेल, अमुक एक कमांड दिल्यावर हे कसे शोधून काढते वगैरे बारकावे आपणहून शोधून शिकायला हवेत. जेव्हा विद्यार्थी अभ्यासक्रमाच्या चौकटी मोडून विषयाचा अभ्यास करतील तेव्हा उत्तम नोकरी मिळणे, संशोधनातील करिअर या गोष्टी नक्कीच शक्य होतील.

बायोइन्फॉर्मेटिक्स या विषयात शिक्षण घेतल्यानंतर प्रोटीन सिक्वे न्स, अनॅलिसिस, डेटा रिट्रिव्हल, कं पॅरिटिव्ह जिनोमिक्स, कॉम्पलेक्स सिस्टीम अनॅलिसि, मेटाबोलिक कम्प्युटिंग, इव्होल्यूशनरी मॉडेल बिल्डिंग, फायलोजेनेटिक अनॅलिसिस आणि यांसारख्या कित्येक क्षेत्रांमध्ये काम करता येऊ शकते. या विषयांची नावे जरी वाचायला अवघड वाटली तरी, त्यांचा पाया मात्र बायोइन्फॉर्मेटिक्सचे शिक्षण घेतानाच पक्का करता येऊ शकतो.  आणि म्हणूनच मी आधीच्या लेखांत म्हटल्याप्रमाणे अगदी पदवीपासूनच आपण कोणता विषय निवडतो ते फार महत्त्वाचे असते. बारावीनंतर शिक्षणाची दिशा ठरवत असताना या सर्व बाबींचा विचार करून शिक्षण घेतल्यास पुढचा मार्ग अधिक सुकर होऊ शकतो.

(लेखिका बायोलॉजिकल सायन्सेसच्या अभ्यासक असून गेली १२ वर्षे या क्षेत्रात संशोधन-अध्यापनाचे कार्य करत आहेत.)