19 February 2020

News Flash

करिअर : मंत्र

मराठी माध्यमातून युपीएस्सी देता येते

|| डॉ. श्रीराम गीत

सर, मला दहावीला ७२ टक्के, बी.ए.ला मराठी स्पेशलसाठी ६० टक्के मिळाले. माझे इंग्रजी चांगले नाही. त्यामुळे युपीएस्सी देण्याची इच्छा असून मी राज्यसेवा परीक्षा देत आहे. मला एक लहान मुलगा आहे. माझे वय सध्या २५ आहे. घरची परिस्थिती बेताची आहे. मराठी माध्यमाचे विद्यार्थी युपीएस्सी देऊ शकतात काय? राज्यसेवा परीक्षा २०१८ मध्ये मला प्रथम प्रयत्नात १५० मार्क होते. काय करावे?

– रूपाली गमणे, पास्ते सिन्नर, नाशिक

मराठी माध्यमातून युपीएस्सी देता येते. मात्र सध्या तो विचार कृपया दूर ठेवावा असे वाटते. आपली घरची परिस्थिती, आपल्यावर असलेली संसाराची जबाबदारी सांभाळताना यूपीएससीऐवजी एमपीएससीचा अभ्यास आपणाला योग्य राहील.  त्यामुळे त्यातील सर्व पदांसाठी आधी परीक्षा द्याव्यात. त्यामध्ये जे काही पद मिळेल ते स्वीकारून त्यानंतर थोडेसे स्थिरस्थावर झाल्यानंतर यूपीएससी देण्याचा विचार करावा, असे वाटते. तसेच आपले दहावीचे आणि पदवीचे गुण यूपीएससीसाठी फारच कमी आहेत. इंगर्जीला मात्र पर्याय नाहीच. इंग्रजीचा किमान अभ्यास त्या परीक्षेतील दोन पेपरमध्ये अपेक्षित असतो. तसेच पेपर इंग्रजी वा हिंदीत असतात व उत्तरे भारतीय भाषात दिली तरी चालतात म्हणून तो रस्ता नको, असे सुचवित आहे. राज्यसेवेचा जरूर विचार करावा परंतु कष्ट करण्याची तयारी हवी. भरपूर अभ्यासाला पर्याय नाही.

First Published on September 6, 2019 6:21 am

Web Title: career vrutant news akp 94
Next Stories
1 एमपीएससी मंत्र : वनसेवा मुख्य परीक्षा पर्यावरण आणि वनविषयक घटक
2 दारिद्रय़ एक गंभीर सामाजिक समस्या
3 करिअर मंत्र
Just Now!
X