26 February 2021

News Flash

करिअर मंत्र

झ्यासाठी खरे तर थेट नोकरी नक्की उपलब्ध आहे

 || डॉ. श्रीराम गीत

मी ७५ टक्के मार्क मिळवून बी.कॉम. झालो. काय करावे कळत नाही म्हणून आता सिव्हिल सव्‍‌र्हिसची तयारी करत आहे. बँकांच्या परीक्षांची पण तयारी करत आहे. कृपया नेमके मार्गदर्शन करावे.

– प्रमोद साळुंखे

तुझ्यासाठी खरे तर थेट नोकरी नक्की उपलब्ध आहे. पण ७५ टक्के मिळवलेला बी.कॉम.चा विद्यार्थी काम न शोधता काय करावे म्हणतो आहे हेच आधी थांबवले पाहिजे. कॉमर्सच्या अभ्यासक्रमातील प्रत्येक विषयाद्वारे तुझ्यासाठी काम, नोकरी, व्यवसाय उपलब्ध आहे हे समजून घ्यावेस. बँकेतील कायमस्वरूपाची नोकरी वा राज्यसेवा परीक्षाद्वारे मिळणारे पद यामागे जावेसे वाटत असल्यास प्रयत्न जरूर करू शकतोस. दोन्हीसाठी तीव्र स्पर्धा व अनिश्चितता भरपूर आहे. अन्य वाचकांसाठी मुद्दाम या स्पर्धेची पुन्हा एकदा उल्लेख आकडय़ांतून करत आहे. सहसा बँक परीक्षेसाठी १८ ते २० लाख विद्यार्थी भारतीय स्तरावर बसतात. त्यातून दरवर्षी जास्तीत जास्त ५ ते ७ हजारांची निवड होत असते. राज्यसेवेसाठी चार एक लाखांतून जास्तीत जास्त ६००-७०० पदांना उमेदवार निवडले जातात. म्हणून खरे तर प्रथम नोकरी व ती करताना परीक्षांचा रोज एक-दोन तास अभ्यास ही सुरुवात नेहमीच उपयुक्त ठरते. कृपया नेमके मार्गदर्शन करावे असे विचारल्याने सांगत आहे.

मी यंदा कॉम्प्युटर इंजिनीअर होईन. आजवर माझा सीजीपीए ७.५६ आहे. नोकरीसाठी कँपससाठी अ‍ॅप्टिटय़ूट टेस्ट घेतात. ती उत्तीर्ण होता येईल की नाही अशी भीती मला वाटते. इंडियन आर्मी वा नेव्हीतसुद्धा जावे वाटते. मात्र उंची कमी पडत आहे. नेटवर्किंगमध्ये जाण्यासाठी काय करता येईल?

– वैष्णवी

अ‍ॅप्टिटय़ूट टेस्टसाठी वारंवार मॉक टेस्ट देणे हा एक उपाय आहे. भीती जाऊ शकते हे नक्की. कॉम्प्युटर शाखेतील विद्यार्थी नेटवर्किंगमधील परीक्षा दिल्यासच त्या क्षेत्रात जाऊ शकतो असे माझी माहिती सांगते. त्यासाठीच्या विविध सर्टिफिकेशन्स आहेत. सिस्को, रेड हॅट, मायक्रोसॉफ्ट, सीसीएनए याची माहिती घ्यावी. मात्र मुळात तो रस्ता तुझ्यासाठी उपयुक्त आहे का? याची माहिती त्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला प्रत्यक्ष भेटून घ्यावी.

आपले प्रश्न पाठवा career.mantra@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2019 5:30 am

Web Title: career vrutant news career mantra akp 94
Next Stories
1 विद्यापीठ विश्व : गुणवंतांचे विद्यापीठ
2 प्रश्नवेध एमपीएससी : वनसेवा मुख्य परीक्षा सराव प्रश्न
3 एमपीएससी मंत्र : वनसेवा मुख्य परीक्षा मृदा घटकाची तयारी
Just Now!
X