वैद्यकशास्त्र किंवा औषधनिर्माणशास्त्र यांसारख्या अभ्यासक्रमांत अधिकृतरीत्या जशी इंटर्नशिप असते तशी एलएल.बी. अभ्यासक्रमात नसते. एलएल.बी. अथवा एलएल.एम. नंतर नामांकित वकिलाच्या हाताखाली अथवा एखाद्या सल्लागार कंपनीमध्ये काही महिने अथवा काही वष्रे इंटर्नशिप केल्यास ती तुमच्या करिअरसाठी नक्कीच उपयोगी ठरेल. त्यामुळे कामाचे स्वरूप, व्यावसायिकता समजून घेता येते तसेच श्रवणकौशल्य आत्मसात करता येते. एखादे प्रकरण समजून घेतल्यानंतर कायद्याच्या भाषेत त्याचे चांगले ड्रािफ्टग करणे, केससाठी आवश्यक असलेला पुरावा गोळा करणे, एखाद्या केससंबंधी वेगवेगळ्या कोर्टात निर्णय दिलेले असतात, त्याचा योग्य त्या ठिकाणी संदर्भ लावत उपयोग करणे, कायद्याविषयक ग्रंथालयात खटल्याच्या अभ्यासाविषयी माहिती गोळा करणे, काही महत्त्वाची प्रकरणे ऐकण्यासाठी प्रत्यक्षात कोर्टात हजर राहणे व घरी आल्यानंतर त्यावर आपल्या भाषेत टिपण तयार करणे, वेगवेगळ्या कोर्टातील केस फायिलग करण्याच्या पद्धती समजून घेणे, कोर्टात न्यायाधीशासमोर आपली केस चांगल्या प्रकारे मांडणे या साऱ्या गोष्टींची माहिती मिळते आणि त्या करण्याचा अनुभवही मिळतो. हे काम करताना प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष आपला संबंध पोलीस स्थानक, रुग्णालये, फोरेन्सिक सायन्स प्रयोगशाळा तसेच इतर शासकीय व स्वयंसेवी घटकांशी येत असतो. या संस्थांच्या कार्यपद्धतींबद्दल माहिती घेणे तसेच या क्षेत्रांत चांगला जनसंपर्क राखणे, वक्तशीरपणा, स्वत:च्या व्यवसायाचे मार्केर्टिग अशा गोष्टींवरही लक्ष ठेवणे आवश्यक असते.
हल्ली संगणक व टाइप करायला शिकणे महत्त्वाचे ठरत आहे. त्यामुळे इतरांवर अवलंबून राहण्याची वेळ येत नाही. अनेक न्यायालयांचे काम संगणकावर होत असते. आपला केस क्रमांक, दिवस, वेळ या संबंधी एसएमएस अथवा ई-मेलद्वारे आपल्याला माहिती मिळू शकते. त्यामुळे वकिलाला कॉम्प्युटर शिकणे अनिवार्य आहे. मराठी, िहदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणे या व्यवसायाकरता आवश्यक आहे. त्याने संवादकौशल्यही आत्मसात
करायला हवे.
बार कौन्सिलकडे नोंदणी
एलएल.बी. अथवा एलएल.एम. नंतर स्टेट बार कौन्सिलकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. अलीकडे नोंदणी करण्यापूर्वी संबंधित पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असते. त्यानंतर बार कौन्सिलच्या नियमानुसार योग्य ती कागदपत्रे, योग्य त्या वेळेत सादर करून आणि रीतसर शुल्क भरून नोंदणी करता येते. त्यानंतर आपण वकील (अॅडव्होकेट) म्हणून प्रॅक्टिस करू शकतो.
वैयक्तिक स्वरूपात काम करणाऱ्या वकिलांना एकत्रित स्वरूपात आणि विविध गरजांनुसार सल्ला व मार्गदर्शन देण्यासाठी संघटित संस्था वा प्रतिष्ठाने
कार्यरत असतात.
आपल्या देशात सध्या परदेशी कायदे कंपन्या कार्यरत आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोग आणि विविध स्तरांवर न्यायाधीश निवड पात्रता परीक्षांसारख्या परीक्षा देता येतात. अशा प्रकारे कायदा विषयातील अभ्यासक्रम पूर्ण करून विद्यार्थ्यांना मोठय़ा करिअर संधी प्राप्त करता येतात.
करिअरची दिशा ठरवताना कामाच्या संधींचा विचार केला जातो. तेव्हा सरकारी किंवा खासगी नोकरी, स्वतंत्र व्यवसाय आणि स्वयंसेवी संस्था हे चार मुख्य पर्याय समोर असतात. प्रत्येक पर्यायाची बलस्थाने आणि मर्यादांचा विचार करून योग्य त्या करिअर पर्यायाची निवड करता येईल. (उत्तरार्ध)

आनंदराव शेडगे
anand_shedge@hotmail.com

design courses at iit bombay
डिझाईन रंग- अंतरंग : डिझाईन शिक्षण: विद्यार्थी, पालकांमधील सर्जनशीलता वाढवणारा दुवा
mpsc mantra study current affairs State National International Level Events
mpsc मंत्र: चालू घडामोडी अभ्यासाचा ‘आधार’
Professor arrested for taking bribe to accept PhD thesis
विद्येच्या माहेर घरात शिक्षणाचा बाजार! पीएचडीचा प्रबंध मान्य करण्यासाठी लाच घेणारी प्राध्यापिका अटकेत
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!