16 January 2021

News Flash

कंबाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे संरक्षण दलाच्या विविध विभागांमध्ये अधिकारी पदावर निवड करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या कंबाइंड डिफेन्स सव्‍‌र्हिसेस एक्झामिनेशन- २०१३ साठी पात्रताधारक उमेदवारांकडून खालीलप्रमाणे अर्ज मागविण्यात येत

| June 10, 2013 12:07 pm

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे संरक्षण दलाच्या विविध विभागांमध्ये अधिकारी पदावर निवड करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या कंबाइंड डिफेन्स सव्‍‌र्हिसेस एक्झामिनेशन- २०१३ साठी पात्रताधारक उमेदवारांकडून खालीलप्रमाणे अर्ज मागविण्यात येत आहेत.
जागांची संख्या व तपशील : या स्पर्धा परीक्षेद्वारा भरावयाच्या एकूण जागांची संख्या ५०० असून त्यामध्ये भारतीय सैन्यदल अकादमी, देहराडून २५०, भारतीय नौदल अकादमी, इझीमाला- ४०, वायुदल अकादमी, हैदरबाद ३२ व अधिकारी प्रशिक्षण अकादमी, चेन्नई १८७ याप्रमाणे जागांचा समावेश आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्जदार खालीलप्रमाणे पात्रताधारक असायला हवेत-
* भारतीय सैन्यदल अकादमी व अधिकारी प्रशिक्षण अकादमी : अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर असायला हवेत.
* भारतीय नौदल अकादमी : अर्जदार इंजिनीअरिंगमधील पदवीधर असावेत.
* वायुदल अकादमी : अर्जदारांनी बारावीची परीक्षा भौतिकशास्त्र व गणित विषयांसह उत्तीर्ण करून त्यानंतर इंजिनीअरिंगमधील पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
विशेष सूचना : वरील शैक्षणिक पात्रतेशिवाय अर्जदार शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत.
जे विद्यार्थी यंदा वरील शैक्षणिक पात्रतेच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेला बसले असतील तेसुद्धा या स्पर्धा परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.
वयोमर्यादा : अर्जदारांचे वय १८ ते २३ वर्षांच्या दरम्यान असावे.
निवड प्रक्रिया : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. ही निवड परीक्षा देशांतर्गत विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात येईल. त्यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई व नागपूर या परीक्षा केंद्रांचा समावेश असेल.
लेखी निवड परीक्षेत निर्धारित गुणांक मिळविणाऱ्या उमेदवारांना सैन्य निवड मंडळातर्फे शारीरिक क्षमता चाचणी व मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांची अंतिम निवड करण्यात येईल.
अर्जासह भरावयाचे शुल्क : अर्जासह भरावयाचे शुल्क म्हणून २०० रु. रोखीने स्टेट बँक ऑफ इंडिया अथवा सहयोगी बँकेच्या कुठल्याही शाखेत भरावेत.
अधिक माहिती व तपशील : यासंदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २५ ते ३१ मे २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय लोकसेवा आयोगाची जाहिरात पाहावी अथवा आयोगाच्या www.upsconline.nic.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख : संगणकीय पद्धतीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या www.upsc.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ जून २०१३.
ज्या पदवीधर विद्यार्थ्यांना सैन्यदलात अधिकारीपदावर आपले करिअर करायचे असेल त्यांना या स्पर्धा परीक्षेला जरूर बसता येईल.                                

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2013 12:07 pm

Web Title: combined defence services examination 2
टॅग Indian Army,Upsc
Next Stories
1 फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिटय़ूट, डेहराडून येथील संधी
2 जीवनकेंद्री शिक्षण
3 सेंद्रिय रसायनशास्त्राचा जनक
Just Now!
X