केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयांतर्गत कार्यरत असणाऱ्या पुणे येथील ‘डीआरडीओ’ म्हणजेच संरक्षण संशोधन व विकास विभागात संशोधनपर संधी उपलब्ध आहेत.
संशोधनपर फेलोशिपचा  तपशील: उपलब्ध असणाऱ्या संशोधनपर संधींची संख्या ४ असून त्यामध्ये मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स वा इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशन, कॉम्प्युटर इंजिनीअरिंग वा कॉम्प्युटर सायन्स व केमिस्ट्री/ केमिकल टेक्नॉलॉजी यांसारख्या विषयांमधील प्रत्येकी एका फेलोशिपचा समावेश आहे.
आवश्यक शैक्षणिक अर्हता : अर्जदारांनी संबंधित विषयातील इंजिनीयरिंगची पदवी अथवा पदव्युत्तर पात्रता किमान प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण केलेली असावी. त्याशिवाय त्यांनी एनईटी/ जीएटीई यासारखी प्रवेश पात्रता परीक्षा दिलेली असावी.
वयोमर्यादा : अर्जदारांचे वय १८ ते २८ वर्षांच्या दरम्यान असायला हवे.
निवड पद्धती : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्यानुसार त्यांची अंतिम निवड करण्यात येईल.
फेलोशिपचा तपशील : योजनेंतर्गत निवड झालेल्या संशोधक उमेदवारांना सर्वसाधारणपणे दोन वर्षांसाठी संशोधनपर फेलोशिप देण्यात येईल. हा कालावधी विशिष्ट परिस्थितीत वाढवता येईल.
या संशोधन कालावधीच्या दरम्यान संशोधक-उमेदवारांना दरमहा २५ हजार रु.ची संशोधनपर फेलोशिप व नियमांनुसार घरभाडे भत्ता देण्यात येईल.
अर्जासह पाठवायचे शुल्क अर्जासह पाठवायचे शुल्क म्हणून अर्जदारांनी १० रुपयांची पोस्टल ऑर्डर ‘डायरेक्टर, आरडीई (इंजिनीअर्स), पोस्ट ऑफिस- दिघी- पुणे’ यांच्या नावे पाठवणे आवश्यक आहे.
अर्जाचा तपशील : अर्जाच्या तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रांत प्रकाशित झालेली ‘डीआरडीओ, पुणे’ची जाहिरात पाहावी.
अर्ज पाठविण्याची मुदत : विहित नमुन्यातील संपूर्ण भरलेले अर्ज आवश्यक ती कागदपत्रे आणि पोस्टल ऑर्डरसह  डायरेक्टर, रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट (इंजिनीअर्स), डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ), आळंदी रोड, कळस, पुणे- ४११०१५ या पत्त्यावर १० जुलै २०१५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.

Nashik, Teams inspection, auction,
नाशिक : खासगी जागेवर कृषिमाल लिलावामुळे तपासणीसाठी पथके नियुक्त
Kamathipura Redevelopment
कामाठीपुरा पुनर्विकासासाठी सल्लागाराची नियुक्ती
pimpri chinchwad, drain cleaning work
पिंपरी: नालेसफाई अद्याप कागदावर!
wheat, farmers
केंद्राचा ‘हा’ निर्णय गहू उत्पादक शेतकऱ्यांच्या मुळावर?