News Flash

अनुभवाधारीत शिक्षण हवे!

देशभरातील महाविद्यालयांतून दरवर्षी लाखो मुले पदवीधर होत असली तरी त्यापकी केवळ २५ टक्के जणांना नोकऱ्या उपलब्ध होतात, असे यासंबंधातील आकडेवारी सांगते. उर्वरित मुलांमध्ये

| July 8, 2013 08:03 am

देशभरातील महाविद्यालयांतून दरवर्षी लाखो मुले पदवीधर होत असली तरी त्यापकी केवळ २५ टक्के जणांना   नोकऱ्या उपलब्ध होतात, असे यासंबंधातील आकडेवारी सांगते. उर्वरित मुलांमध्ये नोकरीसाठी आवश्यक असलेले कौशल्य कमी असते आणि त्यामुळेच मनुष्यबळाची बाजारात गरज असली तरी ही मुले बेरोजगार राहतात. आज देशातील उद्योगांसमोर रोजगारक्षम कौशल्य असलेल्या व्यक्ती शोधणे हे आव्हान ठरते, तर लाखो विद्यार्थी शिक्षण पूर्ण केल्यावर रोजगार मिळवण्यासाठी झगडताना दिसतात.
गेल्या दशकात भारताने आर्थिक वाढ अनुभवली. ही वाढ बव्हंशी वाढलेली क्रयशक्ती आणि स्वस्त, कुशल मनुष्यबळाची मोठय़ा प्रमाणावर उपलब्धता यावर अवलंबून होती. अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, वाढीमध्ये सातत्य राखण्यासाठी आणि भविष्यात आर्थिक महासत्ता होण्यासाठी भारताला युवावर्गाची मदत येईल. मात्र, या युवावर्गाला उत्तम नोकरी उपलब्ध झाली नाही, तर परिस्थिती विदारक होईल.
देशात कुशल मनुष्यबळाची मागणी आणि उपलब्धता यातील विसंगतीचे आणखी एक प्रमुख कारण म्हणजे आपली पारंपरिक शिक्षणपद्धती. नोकरी करताना उद्भवणारी आव्हाने पेलण्यासाठी विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्यात घोकंपट्टीवर आधारित असलेल्या सद्य शिक्षणपद्धतीला साफ अपयश आले आहे. सध्याचे पुस्तकी शिक्षण त्यांना सर्जनशील वृत्तीचा वापर करण्यास शिकवण्यासाठी अपुरे पडते आणि त्यामुळे त्यांच्या आकलन व नावीन्याच्या क्षमतेवर र्निबध येत आहेत.  याची परिणती रोजगारक्षम नसलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढण्यात होते.
त्यावर उपाय म्हणजे विद्यार्थ्यांना अनुभवावर आधारित शिक्षण पुरवतील अशी शिक्षणपद्धती अवलंबण्याची गरज आहे. शिक्षणक्रम, पुस्तके, शिकवण्याची पद्धत या सर्व बाबतीत प्रत्यक्ष अनुभवावर आधारित शिक्षण देण्यावर भर राहायला हवा. यामुळे उच्च शिक्षण घेताना तसेच नोकरी करतेवेळी त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील. यामुळे उच्च शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्यांची रोजगारक्षमता वाढेल. प्रत्येक विद्यार्थ्यांत काहीतरी विशेष असते. त्यामुळे ऑडिओ, व्हिज्युअल व केनेस्थेटिक अध्ययनपद्धतीचा मेळ प्रत्येकासाठी उपयुक्त ठरतो. शिक्षण संवादात्मक आणि मौजेचे बनावे, यासाठी प्रत्येक घटकाचा योग्य मेळ घालून मनाचे कुलूप उघडायला हवे, याला अनुभवावर आधारित शिक्षण म्हणतात. अनुभवावर आधारित शिक्षणाचे मॉडेल विद्यार्थ्यांना विचार करण्यास, शोध घेण्यास आणि शिकण्यास व उत्तरे मिळवण्यास प्रोत्साहित करते; शिकणाऱ्यांना प्रश्न विचारण्यास प्रोत्साहित करते आणि या महत्त्वाच्या मूल्यमापनाचा देशातील प्रत्येक शैक्षणिक संस्थेने विचार करायला हवा. अलीकडच्या काळात शैक्षणिक संस्थांना अनुभवावर आधारित शिक्षणाचे महत्त्व उमगले आहे आणि पालक अशा शिक्षणपद्धतीची मागणी करू लागले आहेत.
अनेक शैक्षणिक संस्था अनुभवावर आधारित शिक्षणपद्धती अवलंबत असल्याचा दावा करत असल्या तरी त्यातील अनेकांमध्ये उणिवा आहेत. या संस्थांमध्ये अनुभवावर आधारित शिक्षणातील ‘५ आय’ मॉडेल या मुख्य घटकाची कमतरता आहे. विद्यार्थ्यांना ‘इनोव्हेटिव्ह’ होण्यास मदत करणारी अतिशय प्रभावी शिक्षण पद्धती, संकल्पना ‘इंटरेिस्टग’ करणे, ‘इंडिव्हिज्युअल’मध्ये ‘इन्व्हेन्टिव्हनेस’ विकसित करणे, कण्टेण्ट ‘इंटरॅक्टिव्ह’ करणे आणि कण्टेण्ट व्यक्तिगत गरजांनुसार तयार करणे. अशा प्रत्यक्ष अनुभवामार्फत विद्यार्थ्यांना विषयाचे सखोल ज्ञान मिळते आणि पुस्तकी शिक्षण प्रत्यक्षात आणण्याची क्षमता विकसित होते.   
अनुभवावर आधारित शिक्षणाचा पुरस्कार करणाऱ्या शैक्षणिक संस्थांना वर्गातील विद्यार्थ्यांच्या अध्ययनात मोठय़ा सुधारणा दिसून येतात. अनुभवावर आधारित शिक्षणाचा सर्वात महत्त्वाचा पलू म्हणजे हे शिक्षण विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना शिकण्यासाठी प्रोत्साहित करते, सहभागी करून घेते आणि जोडते. विद्यार्थ्यांचे लक्ष टिकवून ठेवण्यासाठी व वाढविण्यासाठी डिजिटायझेशनने मोठी मदत केली आहे. उदा. प्रशिक्षित शिक्षकांच्या थोडक्यात सूचनांसोबत संकल्पना व्हिज्युअल पद्धतीने सादर केल्याने वेळेचा प्रभावी वापर शक्य होतो. वाचलेला वेळ उत्तम शिकवण्यासाठी, तसेच विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता निर्माण करण्यासाठी वापरता येतो. सिनेमे, अ‍ॅनिमेशन आणि अन्य रंजक फॉरमॅटमुळे शिक्षकांना शिक्षण अधिक रंजक करून विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला चालना देणे शक्य झाले आहे.
अनेक शैक्षणिक संस्था अनुभवावर आधारित उपक्रमांमार्फत अ‍ॅॅक्टिव्हिटी लॅब सेशन्स आयोजित करतात, ज्यामुळे विद्यार्थ्यांना विविध विषयांवर सखोल व प्रत्यक्ष अनुभवातून आकलन करण्यास मदत होते. या उपक्रमांमध्ये त्याच विषयांवर पाठ असतात आणि वर्गाचे वेळापत्रक न कोलमडता ते उपक्रम घेतले जातात. हे उपक्रम शिकवलेल्या संकल्पनांवर आधारित असतात आणि त्यानंतर कदाचित शिकलेल्या धडय़ांवर चर्चा केली जाते. ही संपूर्ण प्रक्रिया विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण होऊ शकणाऱ्या शंका दूर करण्यासाठी, विषयांचे महत्त्व दैनंदिन आयुष्यात निर्माण करण्यासाठी आणि त्या संकल्पना पक्क्या रुजवण्यासाठी महत्त्वाची असते. हे धडे रंजक पद्धतीनेही शिकता येतील.
विद्यार्थ्यांना योग्य दिशेने विचार करीत योग्य उत्तर शोधण्यास प्रवृत्त करण्यासाठी अनुभवावर आधारित शिक्षणपद्धती महत्त्वाची भूमिका बजावू शकते आणि हे विद्यार्थी भविष्यातही उच्च शिक्षणाचे आव्हान लीलया पेलू शकतात.  
– अनिल गोयल
संचालक, मेक्सस एज्युकेशन प्रा. लि.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 8, 2013 8:03 am

Web Title: education should be baised on experience
टॅग : Loksatta
Next Stories
1 कृषी तंत्रज्ञान पदविका
2 अनुसूचित जाती- नवबौद्ध विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती
3 रॉबर्ट हूक : शापित यक्ष!
Just Now!
X