सुहास पाटील suhassitaram@yahoo.com

* गेल (इंडिया) लिमिटेड (GAIL) (भारत सरकारचा एक उपक्रम) तरुण होतकरू इंजिनीअरिंग ग्रॅज्युएट्सना एक्झिक्युटिव्ह ट्रेनीच्या २५ पदांवर GATE-2020 स्कोअरवर आधारित भरती. (जाहिरात क्र. GAIL/OPEN/ET/1A/2014) १) एक्झिक्युटिव्ह ट्रेनी (केमिकल) ग्रेड-ए-२ – एकूण १५ पदे (अजा – १, इमाव – ६, ईडब्ल्यूएस् – २, खुला – ६) या पदांसाठी अपंग ओएच (ओए, ओएल) उमेदवार पात्र आहेत.

पात्रता – केमिकल / पेट्रोकेमिकल / केमिकल टेक्नॉलॉजी / पेट्रोकेमिकल टेक्नॉलॉजी इंजिनीअरिंग पदवी किमान ६५% गुणांसह उत्तीर्ण. (अजा/अज/अपंग उमेदवारांसाठी ६०% गुण आवश्यक)

२) एक्झिक्युटिव्ह ट्रेनी (इन्स्ट्रमेंटेशन) – इन्स्ट्रमेंटेशन/इन्स्ट्रमेंटेशन अ‍ॅण्ड कंट्रोल/इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड इन्स्ट्रमेंटेशन/ इलेक्ट्रिकल अ‍ॅण्ड इन्स्ट्रमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स विषयातील इंजिनीअरिंग पदवी किमान ६५% गुणांसह उत्तीर्ण. (अजा/अज/दिव्यांग उमेदवारांसाठी ६०% गुण आवश्यक)

दोन्ही पदांसाठी पदवी परीक्षा २०१९ किंवा त्यानंतर उत्तीर्ण केलेली असावी. (२०१९-२०मध्ये अंतिम वर्षांत शिकणारे उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.)

वयोमर्यादा – दि. ३ मार्च २०२० रोजी

२८ वर्षेपर्यंत. (इमाव – ३१ वर्षेपर्यंत, अजा/अज – ३३ वर्षेपर्यंत/अपंग ३८/४१/४३ वर्षेपर्यंत)

वेतन – १ वर्षांच्या ट्रेनिंग आणि प्रोबेशन कालावधीत उमेदवारांना रु. ६०,०००- एकत्रित वेतन दिले जाईल.

ट्रेनिंग यशस्वीरीत्या पूर्ण केल्यावर उमेदवारांना मूळ पगार रु. ६०,०००/- + इतर भत्ते यावर सामावून घेतले जाईल.

निवड पद्धती – GATE-2020 च्या गुणसंख्येनुसार उमेदवारांची निवड यादी करून ग्रुप डिस्कशन आणि/किंवा मुलाखतीसाठी बोलाविले जाईल.

ऑनलाइन अर्ज http://www.gailonline.com या संकेतस्थळावर दि. १२ मार्च २०२०

(१८.०० वाजे)पर्यंत करावेत.

शंका समाधानासाठी संपर्क करा career@gail.co.in.

* भारतीय जीवन बीमा निगम (LIC) मध्ये असिस्टंट इंजिनीअर्स (५० पदे) आणि असिस्टंट अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्स (स्पेशालिस्ट) (१६८ पदे) या पदांची भरती.

(१) असिस्टंट अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर (आयटी) – ५० पदे (अजा – ७, अज – ४, इमाव – १४, ईडब्ल्यूएस – ५, खुला – २०) (अपंग उमेदवारांसाठी एलडी – १,

एचआय – १ पद राखीव).

पात्रता – कॉम्प्युटर सायन्स, आयटी किंवा इलेक्ट्रॉनिक्स विषयातील इंजिनीअरिंग पदवी किंवा एम्.सी.ए. किंवा एम.एस्सी. (कॉम्प्युटर सायन्स)

 

(२) असिस्टंट अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर (राजभाषा) – ८ पदे (अजा – १, अज – १, इमाव – २, खुला – ४) (अपंग व्हीआय, एचआयसाठी प्रत्येकी १ पद राखीव).

पात्रता – पदव्युत्तर पदवी (हिंदी विषयातील) (पदवीला इंग्रजी विषय अभ्यासलेला असावा.) किंवा पदव्युत्तर पदवी (इंग्लिश विषयातील) (पदवीला हिंदी विषय अभ्यासलेला असावा.) किंवा पदव्युत्तर पदवी (संस्कृत विषयातील) (पदवीला हिंदी आणि इंग्रजी विषय अभ्यासलेले असावे.)

(३) असिस्टंट अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर (लीगल) – ४० पदे (अजा – ७, अज – ३, इमाव – १०, ईडब्ल्यूएस- ४, खुला – १६) (अपंग कॅटेगरी एलडी – १ पद, व्हीआय- १ पद, एचआय – १ पद, एमडी – २ पदे).

पात्रता – कायदा विषयातील पदवी आणि किमान ३ वर्षांचा वकिलीचा अनुभव.

(४) असिस्टंट अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर (अ‍ॅक्च्युरियल) – ३० पदे (अजा – ४,

अज – ३, इमाव – ८, ईडब्ल्यूएस – ३,

खुला – १२) (प्रत्येकी १ पद एलडी /

एचआय / एमडीसाठी राखीव).

पात्रता – पदवी (कोणत्याही शाखेतील) उत्तीर्ण आणि इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅक्च्युरिज ऑफ इंडिया / इन्स्टिटय़ूट अ‍ॅण्ड फॅकल्टी ऑफ अ‍ॅक्च्युरिज,

यू. के. यांचेकडील दि. १ फेब्रुवारी २०२० रोजी किमान ६ विषयांचे पेपर सोडविले असावेत.

(५) असिस्टंट अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर (चार्टर्ड अकाऊंटंट) – ४० पदे (अजा – ६,

अज – ३, इमाव – ११, ईडब्ल्यूएस – ४,

खुला – १६) (प्रत्येकी १ पद एलडी / एचआय / एमडीसाठी राखीव).

पात्रता – पदवी (कोणत्याही शाखेतील) उत्तीर्ण आणि इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट यांची फायनल परीक्षा उत्तीर्ण.

(६) असिस्टंट इंजिनीअर्स –

(i) AE (सिव्हिल) – २९ पदे (अजा – ३,

इमाव – ६, ईडब्ल्यूएस् – २, खुला – १८)

(अपंग एलडी – १ पद व एमडी – १ पद राखीव)

(ii) AE (इलेक्ट्रिकल) – १० पदे (अजा – १, इमाव – ३, ईडब्ल्यूएस – १, खुला – ५).

(iii) AE (स्ट्रक्चरल) – ४ पदे (अजा – १, इमाव – १, खुला – २).

(iv) AE (इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल) – MEP इंजिनीअर्स – ३ पदे (इमाव – १, ईडब्ल्यूएस – १, खुला – १).

(v) असिस्टंट आर्किटेक्ट – ४ पदे

(अजा – १, अज – १, इमाव – १, ईडब्ल्यूएस् – १).

पात्रता – बी.आर्च. आणि ३ वर्षांचा अनुभव.

पात्रता – पद क्र. ६ (i), (ii) आणि (iv) साठी संबंधित विषयातील इंजिनीअरिंग पदवी आणि संबंधित कामाचा तीन वर्षांचा अनुभव.

पात्रता – पद क्र. ६ (iii) AE (स्ट्रक्चरल) – एम.टेक्./एम.ई. (स्ट्रक्चरल) आणि

१ वर्षांचा अनुभव.

वयोमर्यादा सर्व पदांसाठी – दि. १ फेब्रुवारी २०२० रोजी २१ ते ३० वर्षे. (इमाव – ३३ वर्षेपर्यंत, अजा/अज – ३५ वर्षेपर्यंत, अपंग – ४० / ४३ / ४५ वर्षेपर्यंत.)

वेतन – अंदाजे रु. ५७,०००/- दरमहा वेतन दिले जाईल.

प्रोबेशनचा कालावधी १ वर्षांचा असेल, जो २ वर्षेपर्यंत वाढविला जाऊ शकतो.

अर्जाचे शुल्क – अजा / अज / अपंग – रु. ८५/- + ट्रान्झॅक्शन चार्जेस + जीएसटी. इतरांसाठी – रु. ७००/- + ट्रान्झॅक्शन  चार्जेस + जीएसटी.

निवड पद्धती – नोकरीपूर्व वैद्यकीय परीक्षेआधी उमेदवारांना ३ स्तरांवर परीक्षा द्यावी लागेल.

(१) फेज-१ – पूर्व परीक्षा – रिझिनग अ‍ॅबिलिटी ३५ प्रश्न; इंग्लिश लँग्वेज (ग्रामर, व्होकॅब्युलरी आणि कॉम्प्रिहेन्शन) – ३० प्रश्न; क्वांटिटेटिव्ह अ‍ॅप्टिटय़ूड – ३५ प्रश्न. प्रत्येक प्रश्नाला १ गुण असेल व प्रत्येक सेक्शनला वेळ असेल.

२० मिनिटांचा एकूण १०० प्रश्न, वेळ १ तास. (इंग्लिश भाषा चाचणी फक्त पात्रता स्वरूपाची असेल. मुख्य परीक्षेसाठी रिक्त पदांच्या २० पट उमेदवार पूर्व परीक्षेतील ७० गुणांच्या आधारे निवडले जातील.

फेज-२ मुख्य परीक्षा आणि फेज-३ मुलाखत (६० गुण) मुख्य परीक्षा व मुलाखतीमधील एकत्रित गुणवत्तेनुसार अंतिम निवड केली जाईल. (मुख्य परीक्षेतील २५ गुणांची इंग्लिश भाषा चाचणी विस्तृत स्वरूपातील असेल, जी फक्त पात्रता स्वरूपाची असेल.)

परीक्षापूर्व प्रशिक्षण – इमाव/अजा/अज/

अपंग उमेदवारांना परीक्षापूर्व प्रशिक्षण एलआयसीच्या विभागीय कार्यालयाकडून

दिले जाईल. त्यासाठी इच्छुक उमेदवारांनी विभागीय कार्यालयाकडे आपले नाव नोंदणे आवश्यक.

ऑनलाइन अर्ज http://www.licindia.in या संकेतस्थळावर दि. १५ मार्च २०२० पर्यंत करावेत. (careers – recruitment of ae/aa/aao (specialist) – new registration)