वैद्यक पदवी अभ्यासक्रमाचा प्रवेश हा प्रवेशपरीक्षेच्या गुणांवर निश्चित करण्यात येतो. या लेखात प्रमुख प्रवेशपरीक्षांची तोंडओळख करून देतानाच या प्रवेशपरीक्षांची तयारी करताना कुठल्या गोष्टी ध्यानात घ्याव्यात, याविषयी सविस्तर माहिती देत आहोत..कुठल्याही देशातील वैद्यकीय क्षेत्रावर मोठा प्रभाव टाकू शकणारे- महत्त्वाचे, मात्र बहुतांश दुर्लक्षित राहिलेले कारण म्हणजे वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या निवडीचे निकष! भारतात एमबीबीएस/ बीएचएमएस/ बीएएमएस/ बीडीएस या वैद्यक पदवी अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांची निवड ही बारावीनंतर घेण्यात येणाऱ्या प्रवेशपरीक्षांद्वारे निश्चित केली जाते. जगातील इतर कुठल्याही देशापेक्षा भारतात अधिक म्हणजेच ३८१ वैद्यकीय महाविद्यालये आहेत. त्यांमध्ये ६४ हजार वैद्यकीय प्रवेश जागा उपलब्ध आहेत. त्यातील २५ हजार जागा या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांत उपलब्ध आहेत. वैद्यकीय शाखेत पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणारे सुमारे आठ लाख विद्यार्थी या ६४ हजार जागांसाठी प्रवेशपरीक्षा देतात. अशा तऱ्हेने प्रवेशासाठी वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या उपलब्ध जागा आणि प्रवेशेच्छु विद्यार्थी यांचे प्रमाण १ : १३ असे आहे.

विविध राज्य सरकार, खासगी महाविद्यालये आणि वेगवेगळ्या संस्था यांच्यामार्फत या ३८१ वैद्यकीय महाविद्यालयांमधील पदवी प्रवेशासाठी सुमारे ५० वैद्यकीय प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. भारंभार परीक्षा द्याव्या लागत असल्याने विद्यार्थी-पालकांचा संभ्रम वाढतो आणि एक प्रकारे त्यांची छळवणूकच होते. असेही दिसून येते की, एकाच तारखेला वेगवेगळ्या परीक्षा ठेवल्याने किंवा भौगोलिक अंतरामुळे तसेच खर्च लक्षात घेता वैद्यकीय शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या कुठल्याही विद्यार्थ्यांला जास्तीतजास्त ९ परीक्षा देता येतात. म्हणूनच, या सर्व ५० प्रवेशपरीक्षा बासनात गुंडाळून देशस्तरावर ‘नीट’ (ठएएळ) ही एकमेव राष्ट्रीय स्तरावरील प्रवेशपरीक्षा त्वरित पुनस्र्थापित करण्याची नितांत आवश्यकता आहे. ‘नीट’ (ठएएळ) ही परीक्षा २०१३ मध्ये यशस्वीरीत्या घेण्यात आली, मात्र जून २०१३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या विभाजित झालेल्या निर्णयामुळे (२:१) ‘एमसीआय’ला ‘नीट’ चाचणी घेण्याचे अधिकार उपलब्ध झाले नाहीत. मात्र, तीनही न्यायमूर्तीनी ‘नीट’ चाचणी घेण्यामागच्या समाजहिताच्या उद्दिष्टाचे कौतुक केले.

Even after eight months engineering students are still waiting for mark sheets
मुंबई : आठ महिन्यांनंतरही अभियांत्रिकीचे विद्यार्थी गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेत
Ragging on two postgraduate students at BJ Medical College in Pune print news
धक्कादायक! पुण्यातील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तरच्या दोन विद्यार्थिनींवर ‘रॅगिंग’
Suicide student
जळगावात परिचारिका महाविद्यालयातील विद्यार्थिनीची आत्महत्या
Nursing student commits suicide in hostel
नागपूर : धक्कादायक! नर्सिंगच्या विद्यार्थिनीची वसतिगृहातच आत्महत्या

केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि भारतीय वैद्यकीय परिषदेतर्फे (एमसीआय) २०१७ अथवा २०१८ या वर्षी ‘नीट’ चाचणी पुनस्र्थापित करण्याची योजना मंजूर झाली आहे. मात्र, ‘एमसीआय’च्या कायद्यामध्ये सुधारणा करण्यासाठी संसदेत हा कायदा मंजूर होणे अत्यावश्यक ठरते. जर असे लवकरात लवकर घडले तर ‘नीट’ परीक्षा हे वास्तव ठरेल आणि वैद्यकीय प्रवेशाच्या उदासवाण्या क्षेत्रात नवी पहाट उजाडेल. ‘नीट’मुळे व्यवस्थेत एकसारखेपणा येईल आणि हुशार विद्यार्थ्यांना देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणे सुकर होईल. यामुळे श्रम, पैसा आणि बहुविध प्रवेशपरीक्षा देण्यात होणारी विद्यार्थ्यांची तारांबळ वाचेल. ‘नीट’ची पुनस्र्थापना झाल्यास वैद्यकीय प्रवेशप्रक्रिया पारदर्शी होईल आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांतर्फे देशभरात भरमसाठ कॅपिटेशन फी आकारण्याच्या वाममार्गाना आळा बसेल.

हेही नमूद करायला हवे की, जे विद्यार्थी अवाच्या सव्वा शुल्क भरून वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेतात, त्यांच्यात डॉक्टर झाल्यानंतर लवकरात लवकर हे शुल्क वसूल करण्याची प्रवृत्ती दिसून येते. त्याची झळ  वर्षांनुवर्षे देशाच्या सामान्य नागरिकाला सहन करावी लागत आहे. हे दुष्टचक्र थांबण्यासाठी आणि वैद्यकीय प्रवेशप्रक्रियेत एकसमानता आणण्यासाठी २०१७ अथवा २०१८ पासून ‘नीट’ परीक्षा पुन्हा एकवार सुरू होणे अत्यावश्यक ठरते.

मात्र, २०१६ सालासाठी ‘नीट’ परीक्षा उपलब्ध नाही आणि त्यामुळे वैद्यकीय शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना वैद्यक प्रवेश परीक्षा देणे आवश्यक ठरते. महत्त्वाच्या प्रवेशपरीक्षांची यादी पुढीलप्रमाणे आहे-

१. एमएच-सीइटी :

राज्याच्या ३० वैद्यकीय महाविद्यालयांच्या प्रवेशासाठी ही परीक्षा राज्याच्या वैद्यकीय शिक्षण संचालनालयातर्फे घेतली जाते. येत्या ५ मे रोजी ही परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी केवळ बारावीचे पदार्थविज्ञानशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयांचा अभ्यासक्रम आहे. या परीक्षेत ‘निगेटिव्ह मार्किंग’ नसून २०० गुणांची एकूण प्रश्नपत्रिका तीन तासांत सोडवावी लागते. एखाद्या वैद्यक महाविद्यालयात एमबीबीएसच्या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळण्यासाठी या प्रवेशचाचणीत किमान १७५ गुण मिळणे आवश्यक ठरतात. अधिक माहितीसाठी  www.dmer.org या वेबसाइटला भेट द्या.

२. एआयपीएमटी :

ही प्रवेश परीक्षा ‘सीबीएसई’तर्फे घेतली जाते आणि याद्वारे अखिल भारतीय स्तरावर ३०० हून अधिक वैद्यकीय महाविद्यालयांचे प्रवेश हे १५ टक्के कोटय़ाद्वारे होतात. ही परीक्षा ७२० गुणांची असून यात ‘सीबीएसई’च्या अकरावी आणि बारावीचा पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्राचा अभ्यासक्रम अंतर्भूत आहे. ‘एआयपीएमटी’ परीक्षेत ‘निगेटिव्ह मार्किंग’ आहे. याद्वारे वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळण्यासाठी या परीक्षेत किमान ४८० गुण प्राप्त होणे आवश्यक ठरते. अधिक माहितीसाठी www.aipmt.nic.in या वेबसाइटला भेट द्या.

३. एआयआयएमएस :

ही प्रवेश परीक्षा दिल्लीच्या ‘एआयआयएमएस’तर्फे घेतली जाते. याद्वारे देशभरातील  ७ ‘एआयआयएमएस’ महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळतो. ही परीक्षा जगभरातील सर्वात कठीण वैद्यकीय प्रवेश परीक्षा मानली जाते. अधिक माहितीसाठी www.aiimsexams.org या वेबसाइटला भेट द्या.

४. जेआयपीएमईआर :

ही प्रवेश परीक्षा पाँडेचरीच्या ‘जेआयपीएमईआर’तर्फे घेतली जाते. अधिक माहितीसाठी www.jipmer.edu.in या वेबसाइटला भेट द्या.

५. सीएमसी- वेल्लूर :

ही प्रवेश परीक्षा परीक्षा  वेल्लूरच्या ख्रिश्चन मेडिकल कॉलेजमधील प्रवेशासाठी घेतली जाते. अधिक माहितीसाठी www.cmch-vellor.edu.in या वेबसाइटला भेट द्या.

६. मणिपाल :

ही प्रवेश परीक्षा मणिपालच्या कस्तुरबा मेडिकल कॉलेजमधील प्रवेशासाठी घेतली जाते. अधिक माहितीसाठी  www.manipal.edu.in या वेबसाइटला भेट द्या.

७. वर्धा :

ही प्रवेश परीक्षा वध्र्याच्या महात्मा गांधी इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये प्रवेश मिळण्याकरता घेतली जाते. अधिक माहितीसाठी www.mgims.ac.in या वेबसाइटला भेट द्या.

८. सीओएमईडी-के :

ही प्रवेश परीक्षा कनाईटकच्या कन्झॉर्टिअम ऑफ मेडिकल अ‍ॅण्ड डेन्टल कॉलेजेसतर्फे घेतली जाते. अधिक माहितीसाठी  www.comedk.org या वेबसाइटला भेट द्या.

९. एएसएसओ-सीईटी :

ही प्रवेश परीक्षा राज्यातील खासगी वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयातील प्रवेशासाठी घेतली जाते. अधिक माहितीसाठी www.amupmdc.org या वेबसाइटला भेट द्या.

हेही नमूद करायला हवे की, कुठल्याही वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशासाठी बारावीचे गुण विचारात घेतले जाणार नाहीत आणि वर नमूद केलेल्या प्रवेशपरीक्षांमध्ये मिळालेले गुण आणि गुणांक कुठल्याही वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशासाठी ग्राह्य़ मानण्यात येईल. परीक्षेचे अर्ज गेल्या डिसेंबरपासून ऑनलाइनरीत्या उपलब्ध आहेत आणि विद्यार्थ्यांनी हव्या त्या विशिष्ट वेबसाइटवरील सूचना आणि अंतिम मुदत लक्षात घ्यावी.

परीक्षेचा पॅटर्न आणि साऱ्या परीक्षांची काठिण्यपातळी ही वेगवेगळी असल्याने वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी अकरावी आणि बारावीच्या अभ्यासक्रमांच्या आधारे ‘एआयआयएमएस’ परीक्षेच्या काठिण्यपातळीच्या स्तराइतपत प्रत्येक पाठाची तयारी करावी. त्यानंतर वेगवेगळ्या परीक्षांच्या वेगवेगळ्या पॅटर्नच्या सरावासाठी  चाचणी परीक्षा देणे आवश्यक ठरते. जीवशास्त्राची ‘एमएच-सीईटी’ देण्यासाठी विद्यार्थ्यांना बारावीच्या क्रमिक पुस्तकातील प्रत्येक ओळन्ओळ सखोल अभ्यासणे उत्तम गुण मिळण्यासाठी क्रमप्राप्त आहे.

आणखी एक बाब नमूद करायला हवी, ती म्हणजे वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी गणिताकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. पदार्थविज्ञानशास्त्राचे आणि रसायनशास्त्राचे अनेक पाठ समजण्यासाठी गणिताच्या काही महत्त्वाच्या संकल्पनांचे ज्ञान आवश्यक असते. Logarithms, Quadratic equations, Trigonometry, Functions & Graphs, Differentiation, Maxima-Minima, Integration, Differential Equations, Straight Line and Circle या पाठांचे मूलभूत ज्ञान वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशेच्छु विद्यार्थ्यांना असणे आवश्यक आहे.

जे विद्यार्थी जीवशास्त्राचा सुव्यवस्थित अभ्यास करतात आणि पदार्थविज्ञानशास्त्र आणि रसायनशास्त्राच्या संकल्पना समजून घेण्यावर लक्ष केंद्रित करतात आणि भरपूर सरावचाचण्यांना सामोरे जातात, त्यांना वैद्यकीय प्रवेशपरीक्षांमध्ये यश मिळवणे नक्कीच शक्य होते.

mdurgesh@yahoo.com