अर्जदारांनी आधुनिक भारतीय इतिहास या विषयातील पदव्युत्तर पात्रता पूर्ण केलेली असावी. पुरातत्त्व विषयातील पदविकाधारकांना प्राधान्य देण्यात येईल. वयोमर्यादा ४० वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २९ मार्च ते ४ एप्रिलच्या अंकात प्रकाशित झालेली राष्ट्रीय पुरातत्त्व विभागाची जाहिरात पाहावी अथवा विभागाच्या http://www.infibnet.ac.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक कागदपत्रांसह असणारे अर्ज अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर (पीए अ‍ॅण्ड एफ), आर्किऑलॉजिकल सव्‍‌र्हे ऑफ इंडिया, जनपथ, नवी दिल्ली ११० ००१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २२ एप्रिल २०१४.

संरक्षण मंत्रालयांतर्गत ज्युनिअर रिसर्च फेलोशिपच्या ६ जागा
उमेदवारांनी गणित विषयातील एमएस्सी पात्रता कमीत कमी प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांना संगणकाचे ज्ञान असायला हवे. वयोमर्यादा २८ वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २९ मार्च ते ४ एप्रिल २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली ‘डीआरडीओ’ची जाहिरात पाहावी अथवा ‘डीआरडीओ’च्या http://rac.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले, आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज डायरेक्टर, सायन्टिफिक अ‍ॅनलॅसिस ग्रुप, ‘डीआरडीओ’, मेटॅकाफ हाऊस, दिल्ली ११० ०५४ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २४ एप्रिल २०१४.

आयुध निर्माणी-खडकी येथे मल्टी स्टाफ कर्मचाऱ्यांच्या १३ जागा
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण झालेले असावेत व त्यांना वाहन चालवणे व त्यांची निगराणी राखणे अशा कामाचा अनुभव असायला हवा. वयोमर्यादा ३२ वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २९ मार्च ते ४ एप्रिल २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली आयुध निर्माणी- खडकीची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज दि जनरल मॅनेजर, हाय एक्स्प्लोझिव्हज् फॅक्टरी, खडकी, पुणे ४११ ००३ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख
२५ एप्रिल २०१४.

 संरक्षण उत्पादन विभाग-कानपूर येथे कर्मचाऱ्यांच्या १३ जागा
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण झालेले असावेत. त्यांना संगणकीय ज्ञानासह कार्यालयीन कामकाजाची माहिती असावी. ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असणे अत्यावश्यक आहे.
अर्जाचा नमुना व अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २९ मार्च ते ४ एप्रिल २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली संरक्षण उत्पादन विभागाची जाहिरात पाहावी अथवा संरक्षण उत्पादन विभागाच्या http://www.oefkanpur.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले, आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज जनरल मॅनेजर, ऑर्डनन्स इक्विपमेंट फॅक्टरी, कानपूर २०८ ००१, उत्तर प्रदेश या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख
२५ एप्रिल २०१४.

विस्फोटक फॅक्टरी, खडकी येथे कुशल कामगारांसाठी ११ जागा
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण झालेले असावेत. त्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची अटेंडंट ऑपरेटर-केमिकल प्लँट ही पात्रता पूर्ण केलेली असावी. वयोमर्यादा ३२ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २९ मार्च ते ४ एप्रिल २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली विस्फोटक फॅक्टरी, खडकीची जाहिरात पाहावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले, आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज जनरल मॅनेजर, हाय एक्स्प्लोझिव्हज फॅक्टरी, खडकी, पुणे ४११ ००३ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख
२६ एप्रिल २०१४.