News Flash

नोकरीची संधी

नोकरीची संधी

नोकरीची संधी

सुहास पाटील

suhassitaram@yahoo.com

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी, निम्नस्तर कृषी शिक्षण विद्याशाखा अंतर्गत ‘बागकाम तंत्रज्ञान’ प्रमाणपत्र अभ्यासक्रमास (मराठी माध्यम) किमान ९ वी उत्तीर्ण उमेदवारांना पुढील संस्थांमध्ये शैक्षणिक वर्ष सन २०२१-२२ साठी प्रवेश उपलब्ध आहेत.

(१) उद्यानविद्या महाविद्यालय, दापोली, जि. रत्नागिरी. (घटक) प्रवेश क्षमता – ३० + १० (रायगड, रत्नागिरी जिल्ह्य़ांसाठी, १० जागा पाणलोट क्षेत्रातील उमेदवारांकरिता राखीव आहेत.) भ्रमणध्वनी क्र. ९४२३२९६०००.

(२) कृषी संशोधन केंद्र, पालघर, जि. पालघर (घटक) प्रवेश क्षमता – २५ (ठाणे, पालघर, मुंबई उपनगर व मुंबई शहर जिल्ह्य़ांसाठी). दूरध्वनी क्र. ०२५२५ – २४१०४८.

(३) प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुल्रे, जि. सिंधुदुर्ग. प्रवेश क्षमता – ४० (सिंधुदुर्ग जिल्ह्य़ासाठी). दूरध्वनी क्र. ०२३६६ – २६२२३४.

संबंधित जिल्ह्य़ांतील उमेदवार उपलब्ध नसल्यास विद्यापीठ कार्यक्षेत्रातील आणि इतर जिल्ह्य़ांतील उमेदवारांना प्रवेश देण्यात येईल.

महिलांसाठी ३०%जागा आरक्षित आहेत. अजा/अज/इमाव/विजा/भज/ईडब्ल्यूएस्/एसईबीसी इत्यादींसाठी नियमानुसार जागा राखीव.

पात्रता – किमान ९ वी उत्तीर्ण. वयोमर्यादा – प्रवेश घेतेवेळी उमेदवाराचे वय १४ ते ४५ वष्रे असावे.

प्रवेश अर्ज शुल्क – खुला प्रवर्ग रु. ५०/-, आरक्षित प्रवर्ग रु. २५/-.

वसतीगृह निवास – सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये मर्यादित प्रमाणात विद्यार्थ्यांकरिता वसतीगृह निवास उपलब्ध आहे.

अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक शुल्क – रु. ९६१/- वसतीगृह भाडे व देखभाल प्रति वर्ष रु. ४००/- व भोजनगृहाकरिता आगाऊ रक्कम रु. ३००, एकूण रु. १,६६१/- प्रवेश घेतेवेळी भरावे लागेल.

प्रवेश प्रक्रिया – संबंधित अभ्यासक्रमाकरिता गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येईल. संबंधित संस्थेच्या सूचना फलकावर तसेच विद्यापीठ कार्यालयाच्या सूचना फलकावर तात्पुरती निवड झालेल्या आणि प्रतीक्षा सूचीवरील उमेदवारांची गुणवत्ता सूची दि. २७ सप्टेंबर २०२१ रोजी जाहीर केली जाईल.

निवड सूचीनुसार नाव नोंदणी दि. १ ऑक्टोबर २०२१ रोजी करता येईल.

प्रतीक्षा सूचीवरील उमेदवारांची नाव नोंदणी दि. ५ ऑक्टोबर २०२१ रोजी.

रिक्त जागा भरण्याची अंतिम मुदत ११ ऑक्टोबर २०२१.

वर्ग सुरू होण्याचा दिनांक १८ ऑक्टोबर २०२१.

सहामाही परीक्षा – मार्च २०२२; वार्षकि परीक्षा (प्रात्यक्षिक व लेखी) – ऑक्टोबर, २०२२.

वैद्यकीय प्रमाणपत्र – निवडलेल्या विद्यार्थ्यांना शारीरिकदृष्टय़ा सुदृढ सक्षम असल्याचे शासकीय मान्यताप्राप्त सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र सही शिक्क्यानिशी प्रवेश घेतेवेळी सादर करावे लागेल.

प्रवेश घेण्यासाठी उमेदवाराने स्वत: हजर राहिले पाहिजे. प्रवेश घेण्यासाठी हजर राहताना उमेदवाराने प्रवेश शुल्काची पूर्ण रक्कम व अर्जासोबत जोडलेल्या सर्व प्रमाणपत्रांच्या मूळ प्रति सादर करणे आवश्यक.

उमेदवारांनी अर्जासोबत पुढील प्रमाणपत्रांच्या साक्षांकित सत्यप्रती/छायांकित प्रती जोडाव्यात. (१) किमान शैक्षणिक अर्हता परीक्षा (इ. ९ वी) उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र व गुणपत्रक. (२) शाळेचा/महाविद्यालयाचा संस्था सोडल्याचा दाखला किंवा अन्यत्र प्रवेश घेतला असल्यास बोनाफाईड सर्टििफकेट. (एखाद्या उमेदवाराचा मूळ शाळा सोडल्याचा दाखला हरवला असल्यास, अशा उमेदवाराने प्रवेश अर्जासोबत शाळा सोडल्याचा डुप्लिकेट दाखला व सोबत रु. १००/- च्या मुद्रांकावर तहसीलदार यांच्यासमोर केलेले शपथपत्र सादर करावे.) (३) जातीचा दाखला. महसूल खात्याचा सक्षम अधिकारी यांचा दाखला. (४) डोमिसाईल सर्टििफकेट. (५) विजा-अ, भज-ब, भज-क, भज-ड, इमाव, विमाप्र, एस्ईबीसी यांनी तहसीलदार उपविभागीय अधिकारी यांचे क्रिमिलेयर लागू नसल्याचे प्रमाणपत्र. (६) ७/१२ चा उतारा २०१९-२० किंवा २०२०-२१. (७) वैद्यकीय प्रमाणपत्र.

www.dbskkv.org या संकेतस्थळावरील Admission या टॅबवर क्लिक करून बागकाम तंत्रज्ञान माहिती प्रमाणपत्र अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया २०२१-२२ या फाइलमधून माहिती पुस्तिका व प्रवेश अर्ज डाऊनलोड करून अ४ पेपरवर िपट्र काढून स्वत:च्या हस्ताक्षरात भरावा.

अर्हताधारक उमेदवारांनी त्यांचे विहित नमुन्यातील प्रवेश अर्ज सहयोगी अधिष्ठाता, कृषी महाविद्यालय, दापोली/कृषी संशोधन केंद्र, पालघर, जि. पालघर/सहयोगी संशोधन संचालक, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुल्रे यांचे कार्यालयात पोहोच घेऊन दि. २० सप्टेंबर २०२१ पर्यंत सादर करावा.

स्पोर्ट्स अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया (SAI) (मिनिस्ट्री ऑफ यूथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स अंतर्गत एक स्वायत्त संस्था), नवी दिल्ली.

पुढील खेळांसाठी २२० ‘असिस्टंट कोच’ पदांवर करार पद्धतीने सुरुवातीला ४ वर्षांकरिता भरती.

(१) आर्चरी – १३

(२) अ‍ॅथलॅटिक्स – २०

(३) बास्केटबॉल – ३

(४) बॉिक्सग – १३

(५) सायकलिंग – १३

(६) फेिन्सग – १३

(७) फुटबॉल – १०

(८) जिम्नॅस्टिक्स – ६

(९) हँडबॉल – ३

(१०) हॉकी – १३

(११) ज्युडो – १३

(१२) कबड्डी – ५

(१३) कराटे – ४

(१४) कयाकिंग अँड कॅनाइंग – ६

(१५) खो-खो – २

(१६) रोिवग – १३

(१७) सेपक टक्राव – ५

(१८) शूटिंग – ३

(१९) सॉफ्टबॉल – १

(२०) स्वीमिंग – ७

(२१) टेबल टेनिस – ७

(२२) तायक्वांदो- ६

(२३) व्हॉलीबॉल – ६

(२४) वेटलिफ्टिंग – १३

(२५) रेसिलग – १३ (२६) वुशु – ६

(अजा – ३३, इमाव – ५९, ईडब्ल्यूएस – २२, अज – १६, खुला – ९०, एकूण २२०)

पात्रता – SAI, NS, NIS, कडील कोचिंग डिप्लोमा उत्तीर्ण किंवा ऑलिम्पिक/आंतरराष्ट्रीय स्पर्धामधील सहभाग

किंवा द्रोणाचार्य पुरस्कार विजेता.

वयोमर्यादा – दि. १० ऑक्टोबर २०२१ रोजी ४० वष्रेपर्यंत.

वेतन – वेतन श्रेणी (रु. ४१,४२०/- – १,१२,४००/-) अनुभव, सर्टििफकेशन आणि द्रोणाचार्य पुरस्कार असलेल्या खेळाडूंसाठी १ ते ३ वेतन वाढ देण्यात येतील.

निवड पद्धती –  मुलाखत (ज्यात क्रीडा प्रकाराशी संबंधित ज्ञानाची तोंडी परीक्षा याचा समावेश असेल.)  प्राप्त अर्जाची संख्या रिक्त पदांच्या ५ पटींपेक्षा जास्त असल्यास उमेदवारांचे प्रशिक्षण प्रमाणपत्र, शैक्षणिक अर्हता, खेळाडू म्हणून कामगिरी, प्रशिक्षणामधील अनुभव आणि प्रशिक्षक म्हणून केलेली कामगिरी याकरिता एकूण ५० गुण देवून उमेदवार  मुलाखतीसाठी शॉर्टलिस्ट केले जातील. मुलाखतीसाठी एकूण ५० गुण असतील. अंतिम निवड एकूण १०० गुणांमधील गुणवत्तेनुसार केली जाईल.

ऑनलाईन अर्ज https://sportsauthorityofindia.nic.in/saijobs या संकेतस्थळावर दि. १० ऑक्टोबर २०२१ (१७.०० वाजे)पर्यंत करावेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2021 2:30 am

Web Title: job opportunities dr balasaheb sawant konkan agricultural university ssh 93
Next Stories
1 नीतिनियमविषयक विचारसरणीची चौकट 
2 BHEL Recruitment 2021: अभियंता आणि पर्यवेक्षक या पदांसाठी मोठी भरती, जाणून घ्या अधिक माहिती
3 नोकरीची संधी
Just Now!
X