समाजसेवेच्या पेशाचे स्वतचे असे एक शास्त्र आहे. त्याला मर्यादा, तत्त्वे, मूल्ये, कार्यपद्धती, अधिकार, सरकारमान्यता तसेच राष्ट्रीय स्तरावरील शिक्षणक्रमही आहेत. समाजसेवेत करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी या क्षेत्राची सविस्तर माहिती 

निरनिराळ्या कार्यक्षेत्रातील करिअर संधी चाचपून पाहताना जर तुम्ही अर्थपूर्ण, क्रियाशील,  विविधांगी आणि मनाला समाधान देणाऱ्या करिअर क्षेत्राच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ‘समाजसेवा’ क्षेत्रातील करिअर हा एक पर्याय ठरू शकतो.

The nine judge bench of the Supreme Court
सर्वोच्च न्यायालयाचे नऊ न्यायाधीशांचे खंडपीठ कोणत्या प्रकरणांवर सुनावणी करणार?
Violation of Right to Information by Regional Psychiatric Hospital in Nagpur
नागपुरातील प्रादेशिक मनोरुग्णालयाकडून माहिती अधिकाराचा भंग, सामाजिक कार्यकर्ते म्हणतात…
Government Initiatives For Women's Safety
महिलांनो, तुमच्या सुरक्षेसाठी सरकारचे ‘हे’ उपक्रम ठरतात फायदेशीर; आपत्कालीन परिस्थितीत ही यादी जवळ ठेवाच!
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : भारतीय राज्यव्यवस्था – मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्ये

समाजसेवा म्हणजे इतरांना जगणे सुसह्य़ करण्यासाठी मदत करणे किंवा त्यांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणे.

समाजसेवक गरजवंताच्या, संकटात असलेल्यांच्या भूमिकेत शिरून त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न करतात. उदा. एखाद्या पालकावर दुर्दैवाने एकटय़ाने पाल्याचा सांभाळ करण्याची जबाबदारी येऊन पडली आहे. नोकरी करून आपल्या अपत्याकडे लक्ष देण्यास त्याला वेळ मिळत नसल्याने ती पालक व्यक्ती मनाने दुखी झाली आहे. अशा वेळी  समाजसेवक त्या व्यक्तीला कामाच्या वेळेत योग्य बदल करून घेण्याचे सुचवतात. जेणेकरून पाल्याकडे लक्ष देण्यास त्याला अधिक वेळ मिळेल. इतकेच नव्हे, तर त्या पालकाच्या मनावर आलेला ताण दूर करण्यासाठी समाजसेवक काही विशिष्ट उपचारपद्धतीचा वापर करतात.

बरेच सामाजिक कार्यकत्रे समाजसुधारणा घडवून आणण्याचे काम करतात. उदाहरणार्थ- बहुतेकदा अन्यायाचा बळी ठरलेली व्यक्ती, समाजसेवकांच्या साहाय्याने संकटातून बाहेर पडते व आसपास कोठेही अन्याय घडत असेल तर त्याचा प्रतिकार करण्यास सक्षम बनते. किंवा आजारपणात झालेल्या अतिखर्चामुळे एखाद्याचे कुटुंब आíथक विवंचनेत सापडले आहे, त्यांच्यासाठी सर्व पातळ्यांवर मदत मिळवताना, कदाचित देशाच्या आरोग्यसेवा अधिक लोकाभिमुख किंवा योग्य दरात सहज उपलब्ध होण्याचे सत्कार्यही उचित व योग्य दिशेने झालेल्या समाजकार्यातून होऊ शकते.

समाजसेवेच्या पेशाचे स्वत:चे असे एक शास्त्र आहे. मर्यादा, तत्त्व, मूल्य, कार्यपद्धती, अधिकार, सरकारमान्यता आणि राष्ट्रीय स्तरावरील शिक्षणक्रमही आहेत. कोणाच्याही मदतीला धावून जाण्याची मनापासून इच्छा असणाऱ्या व्यक्तींना योग्य प्रशिक्षण, वागणुकीची तंत्रे, आवश्यक तत्त्व यांचे ज्ञान देऊन सुयोग्य समाजसेवक घडवण्याचे काम या शिक्षणक्रमाद्वारे केले जाते.  

समाजसेवा क्षेत्रात प्रगतीसाठी खूप संधी उपलब्ध आहेत. सरकारी आस्थापने, खासगी उद्योग, रुग्णालये, दवाखाने, शाळा, शुश्रूषागृहे, पोलीस खाते, न्यायालये अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत समाजसेवेची संधी इच्छुक व्यक्तींना मिळू शकते.

सामान्यांच्या व्यथा, कौटुंबिक संकटे आणि समाजाला भेडसावणाऱ्या अडचणी सोडविण्यास समाजसेवी कार्यकर्त्यांची मदत होते. उत्तम व्यवस्थापक, प्रशासक, शैक्षणिक कार्यकत्रे काही वेळा उत्तम राजकारणी नेतेही यांतूनच तयार होतात. 

 

मान्यताप्राप्त समाजसेवक होण्यासाठी एखाद्या महाविद्यालयातून, विद्यापीठातून समाजशिक्षणातील पदवी मिळवणे गरजेचे असते. उदाहरणार्थ, बॅचलर ऑफ सोशल वर्क, मास्टर ऑफ सोशल वर्क, पीएच.डी, एम. एस. डब्ल्यू. वगरे.

या शिक्षणक्रमांतून पुस्तकी अभ्यासाबरोबरच प्रत्यक्ष कामाचा अनुभवही आवश्यक असतो. बी.एस.डब्ल्यू. या पदवी शिक्षणाद्वारे समाजसेवेतील सामान्य, मूलभूत ज्ञानाची ओळख होते, तर पदव्युत्तर शिक्षणाद्वारे समाजसेवेतील सखोल अभ्यासाची ओळख होते.

समाजसेवेतून आíथक प्राप्ती किती होते, हे ठरवणे जरा अवघड गोष्ट आहे, पण समाजसेवेची व्याप्ती व गरज दिवसेंदिवस वाढत आहे, हे मात्र निश्चित.

समाजसेवेचे बव्हंशी चोखाळले जाणारे पाच मार्ग

लोकांचे आयुष्य सकारात्मकरीत्या बदलवून टाकण्याचे काम समाजसेवेतून घडत असते. समाजसेवेतील पदव्युत्तर शिक्षण या क्षेत्रातील अनेक वेगवेगळ्या मार्गाची ओळख करून देते, तसेच समाजसेवेसाठी आवश्यक असलेले ज्ञान, पात्रता, पदवी यांबरोबरच निष्ठा, चिकाटी, कामाची निस्सीम ओढ हे सर्व काही आपल्या ठायी असल्याची खात्री इतरांना करून देते. एम.एस.डब्ल्यू.ची पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पदांवर काम करण्याची संधी मिळते. त्यातील प्रमुख पाच खालीलप्रमाणे-

आरोग्यसेवा क्षेत्र

आरोग्य सेवा क्षेत्रात समाजसेवकांची नेहमीच गरज असते. २०१८ सालापर्यंत या क्षेत्रातील समाजसेवकांची मागणी २२ टक्क्यांनी वाढणार असल्याचा अंदाज या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून वर्तवला जात आहे. रुग्णालयातील रुग्णांची काळजी घेणे, त्यांची शुश्रूषा करणे, मोठय़ा आजारातून बरे होण्यासाठी मानसिक, शारीरिकदृष्टय़ा त्यांना मदत करणे, रोगी व्यक्तींची काळजी घेणाऱ्या माणसांना मार्गदर्शन करणे, आजारी व्यक्तींच्या कठीण काळात त्यांना जगणे सुसह्य़ व्हावे यासाठी तसेच त्यांच्या हक्काच्या सुविधा त्यांना मिळवून देण्यासाठी मदत करणे. या सर्व गोष्टींचा यात अंतर्भाव होतो.

व्यसनमुक्ती

या क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या समाजसेवकांची पुनर्वसन केंद्र, तुरुंग प्रशासन, खासगी संस्था, स्वयंसेवी संस्था, बालसुधारगृह अशा निरनिराळ्या आस्थापनांतून नेमणूक होऊ शकते. व्यसनाधीन व्यक्तींना हाताळण्यासाठी संवेदनाशील कार्यकर्त्यांंची गरज असते. व्यसनमुक्ती कार्यात खूप संयमाची, सहानुभूतीची, तसेच रुग्णाचा सतत बदलणारा मूड, राग सांभाळण्यासाठी चिकाटीची जरुरी असते. देशाच्या

कायदे पद्धतीत व्यसनमुक्ती पुनर्वसन कार्याला प्राधान्यक्रम दिला गेला आहे. तज्ज्ञांच्या आकडेवारीनुसार, २०१८ सालापर्यंत या कार्यक्षेत्रातील समाजसेवकांसाठीच्या नोकऱ्यांच्या संधींमध्ये दरवर्षी मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे.

मानसिक आरोग्यसेवा क्षेत्र

मानसिक आरोग्य सेवेतील समाजकार्य करण्यासाठी पदव्युत्तर शिक्षणाची गरज असते. कारण या क्षेत्रात मानसिक रुग्णांवर विशिष्ट उपचारपद्धतीचा वापर करावा लागतो, ज्यासाठी रीतसर शिक्षण जरुरी असते. एखाद्या खासगी किंवा सरकारी रुग्णालयाच्या मानसिक रुग्ण विभागात, वैयक्तिकरीत्या चालविण्यात येणाऱ्या दवाखान्यात, मनोरुग्णांच्या इस्पितळात किंवा शाळांमधून या प्रकारच्या शिक्षण घेतलेल्या व्यक्ती काम करू शकतात. आपल्याकडे आलेल्या मनोरुग्ण व्यक्तीचे निरीक्षण, अवलोकन करून, त्याच्याशी संवाद साधून त्याच्यातील मानसिक असंतुलनाचे कारण शोधणे, त्याचे निराकरण करण्यासाठी उपचारपद्धतीची आखणी करणे आणि रुग्णाला नेहमीप्रमाणे दैनंदिन आयुष्य जगण्यास मदत करणे. अशा स्वरूपाच्या सेवांचा या क्षेत्रात समावेश होतो.

बालकल्याण, संगोपन, काळजी

या कार्यक्षेत्रात काम करणारे समाजसेवक मनाने संवेदनाशील, प्रेमळ असणे महत्त्वाचे आहे. त्यांना लहान मुलांची आवड असणे गरजेचे आहे. बालसंगोपन क्षेत्रात काम करणारे सामाजिक कार्यकत्रे गरीब कुटुंबातील मुख्यत: आईवडिलांकडून नाकारल्या गेलेल्या, दुर्लक्षिलेल्या लहान मुलांची काळजी घेण्याचे काम करतात. यांपकी काही कार्यकत्रे बाल संरक्षणासाठी काम करणाऱ्या संस्थांना आवश्यक असणारी माहिती मिळवण्याचे काम करतात. अशा कार्यकर्त्यांंना रोजच्या रोज मुलांना भेटावे लागते, त्यांच्या घरातील वातावरणाचे निरीक्षण करून, जेव्हा संबंधित लहान मूल अडचणीत असेल तेव्हा त्याची सुटका करण्यासाठी योग्य पावले उचलावी लागतात. तज्ज्ञांच्या आकडेवारीवरून २०१८ सालापर्यंत बालकल्याण क्षेत्रातील सेवेच्या संधी मोठय़ा प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.

शाळांशी निगडित समाजकार्य

समाजसेवेच्या क्षेत्रात, शाळांतील समाजकार्य वेगवेगळ्या उद्दिष्टांसाठी केले जाते. असे कार्यकत्रे सामान्यत: पालक आणि शाळा यांच्यातील समन्वयक असतात. एक समुपदेशक म्हणून तसेच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेतील कामात मदतही करू शकतात. मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी आवश्यक असणाऱ्या बऱ्याच शिक्षणेतर शालेय कामांत समाजसेवक खूप मोठी भूमिका बजावतात. उदाहरणार्थ, वर्तनविषयक सुधारणा, अभ्यासावरील लक्ष विचलित होण्यापासून विद्यार्थ्यांना वाचवणे, लंगिक शिक्षणाची ओळख, शारीरिक स्वच्छता व आरोग्य, पालक, शिक्षक, विद्यार्थी यांच्यातील सुसंवाद वगरे.

मित्रमत्रिणींनो, २०-२५ वर्षांंपूर्वीपर्यंत समाजसेवा ही फक्त उच्च मध्यमवर्गीयांनी किंवा श्रीमंतानी फावल्यावेळी करण्याची गोष्ट मानली जात होती. या क्षेत्राला करिअरचा दर्जा तर दूर, पण याकडे उपहासात्मक नजरेतून पाहिले जात असे. मात्र, आता लोकांची विचारशैली बदलत आहे. माणसाचे श्रम, मानसिक दुख: यांकडे सहानुभूतीने पाहिले जात आहे. सर्वत्र शिक्षणाचा प्रसार झाल्याने आणि जागतिक उदारीकरणामुळे जीवनस्तर उंचावला, फक्त स्वतचे स्वास्थ्य महत्त्वाचे नसून आजूबाजूच्या समाजातील अन्य घटकांचे जगणे सुसह्य़ करण्याकडे व्यक्तींचा कल वाढतो आहे. तसेच जागतिक बाजारपेठेतील व्यापाराच्या संधी मिळवण्यासाठी, औद्योगिक धोरणे आखताना, देशातील उद्योजकांना समाजातील दुर्बल घटकांची (अपंग,अंध, वगरे) दखल घेणे, सामाजिक उन्नतीचा दृष्टिकोन बाळगणे अनिवार्य ठरत आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे याही क्षेत्रात वर्तमानात आणि भविष्यात प्रगतीला भरपूर वाव आहे. ल्ल

अनुवाद – गीता सोनी