|| सुहास पाटील
suhassitaram@yahoo.com

४१ फिल्ड अम्युनिशन डेपो C/o , APO  (FAD ५६ vw APO) आणि २५५ (आय) एबीओयू (२५५(१) ABOU), संरक्षण मंत्रालय, भारत सरकार (Advt. No.. ०१/४१/२०२१). ट्रेड्समनमेट, ज्युनियर ऑफिस असिस्टंट इ. ४५८ पदांची भरती.

FAD  / ५६ APO मधील रिक्त पदे –

(१) ट्रेड्समन मेट (पूर्वीचे मजदूर पदे) – ३३० पदे (अजा – ३९, अज – २५, इमाव – ८९, ईडब्ल्यूएस – ३३, खुला – १३४) (१३ पदे दिव्यांग उमेदवारांसाठी राखीव. एचएच – ५, व्हीएच – ४, ओएच – ४).

पात्रता – १० वी उत्तीर्ण.

(२) मल्टि टास् किंग टास्क (एमटीएस) – ११ पदे (अजा – १, अज – १, इमाव – ३, ईडब्ल्यूएस – १, खुला – ५) (१ पद दिव्यांग व्हीएचसाठी राखीव).

पात्रता – १० वी उत्तीर्ण.

(३) फायरमन – ६४ पदे (अजा – १०, अज – ५, इमाव – १७, ईडब्ल्यूएस – ६, खुला – २६) (२ पदे दिव्यांग एचएचसाठी कॅटेगरीसाठी राखीव).

पात्रता – १० वी उत्तीर्ण.

(४) ज्युनियर ऑफिस असिस्टंट (FÐE) (पूर्वीचे एलडीसी पद) – २० पदे (अजा – ३, अज – १, इमाव – ५, ईडब्ल्यूएस – २, खुला – ९) (१ पद दिव्यांग ओएचसाठी राखीव).

पात्रता – १२ वी उत्तीर्ण.

(५) मटेरियल असिस्टंट (एम्ए) – १९ पदे (अजा – ३, अज – १, इमाव – ५, ईडब्ल्यूएस – २, खुला – ८).

पात्रता – पदवी (कोणतीही शाखा) किंवा मटेरियल मॅनेजमेंट डिप्लोमा उत्तीर्ण.

फायरमन पदासाठी दिव्यांग एचएच कॅटेगरीतील १००% अक्षमता असलेले उमेदवार पात्र नाहीत.

ट्रेड्समन मेटसाठी १६ पदे; फायरमनसाठी ३ पदे; जेओएसाठी १ पद; एम्एसाठी १ पद गुणवान खेळाडूंसाठी राखीव आहेत.

२५५(क) ABOU  मधील रिक्त पदे –

ट्रेड्समनमेट (पूर्वीचे मजदूर पदे) – १४ पदे (अजा – २, अज – १, इमाव – ४, ईडब्ल्यूएस – १, खुला – ६). पात्रता – १० वी उत्तीर्ण.

वयोमर्यादा – (दि. ७ ऑगस्ट २०२१ रोजी) पद क्र. १ ते ४ साठी १८ ते २५ वष्रे.

मटेरियल असिस्टंट पदासाठी १८ ते २७ वष्रे.

वयोमर्यादेत सूट – इमाव ३ वष्रे; अजा/अज/ गुणवान खेळाडू – ५ वष्रे; (दिव्यांग – खुला – १० वष्रे; इमाव – १३ वष्रे; अजा/ अज – १५ वष्रे).

फायरमन (फक्त पुरुष) पदासाठी – शारीरिक मापदंड – उंची – १६५ सें.मी. (अजसाठी उंची – १६२.५ सें.मी.); छाती – ८१.५ सें.मी. – ८५ सें.मी.; वजन – ५० कि.ग्रॅ.

शारीरिक क्षमता चाचणी – फक्त पात्रता स्वरूपाची असेल. फायरमन (फक्त पुरुष) पदांसाठी – (i) १.६ कि.मी. अंतर ६ मि. ३० सेकंदांत धावणे. (i) २.७ मीटर लांबीचा खंदक उडी मारून दोन्ही पायांवर उतरून पार करणे. (ii) ६३.५ कि.ग्रॅ. वजनाचा माणूस उचलून १८३ मीटर अंतर ९६ सेकंदांत पार करणे. (i५) हाता-पायाचा वापर करून ३ मीटर उंचीच्या दोरखंडावर चढणे.

ट्रेड्समनमेट पदांसाठी – (i) १.६ कि.मी. अंतर ६ मि. ३० सेकंदांत धावणे. (i) ५० कि.ग्रॅ. वजन घेऊन २०० मीटर अंतर १०० सेकंदांत पार करणे.

स्किल टेस्ट (फक्त पात्रता स्वरूपाची) जेओए पदासाठी – कॉम्प्युटरवर टाइप करणे – इंग्लिश ३५ श.प्र.मि. किंवा हिंदी ३० श.प्र.मि.

महिला उमेदवारांसाठी शारीरिक क्षमता चाचणीच्या अटी आयोजक ठरवतील.

दिव्यांग कॅटेगरी ओएच आणि व्हीएच उमेदवारांना शारीरिक क्षमता चाचणी माफ असेल.

(२) लेखी परीक्षा – ऑब्जेक्टिव्ह टाइप (इंग्रजी/हिंदी भाषेत) (जनरल इंटेलिजन्स अँड रिझिनग – २५ प्रश्न; न्यूमरिकल अॅवप्टिट्यूड – २५ प्रश्न; जनरल इंग्लिश – ५० प्रश्न; जनरल अवेअरनेस – ५० प्रश्न; प्रत्येक प्रश्नास १ गुण असेल.)

लेखी परीक्षेचा स्तर – ट्रेड्समनमेट, एमटीएस, फायरमन पदांसाठी लेखी परीक्षा १० वीच्या स्तरावर असेल. जेओए पदासाठी १२ वीच्या स्तरावर; एमए पदांसाठी पदवी स्तरावर असेल. ट्रेड्समन मेट, जेओए आणि फायरमन पदांसाठी १:७५ प्रमाणात व एमटीएस आणि एमए पदांसाठी १:५० प्रमाणात पात्रता परीक्षेतील गुणवत्तेनुसार उमेदवार निवड प्रक्रियेसाठी शॉर्टलिस्ट केले जातील.

अंतिम निवड लेखी परीक्षेतील गुणवत्तेनुसार केली जाईल. उमेदवारांना नेमणुकीनंतर २ वर्षांचा प्रोबेशन कालावधी असेल.

अर्जासोबत उमेदवारांना जाहिरातीमध्ये दिलेल्या अपेंडिक्स-बीप्रमाणे मँडेटरी अंडरटेकिंग द्यावी लागेल.

विस्तृत माहिती, अर्जाचा नमुना, अंडरटेकिंग आणि फॉम्र्स www.indianarmy.nic.in आणि www.ncs.gov.in संकेतस्थळांवर उपलब्ध आहेत.

विहित नमुन्यातील पूर्ण भरलेला अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह, फिजिकल फिटनेस सर्टिफकेट मेडिकल प्रॅक्टिशनरकडील आणि २ अधिकच्या छायाचित्रांसह Commandant, ४१ FAD PIN – – ९०९ ७४१, co ५६ APO’ या पत्त्यावर साध्या/रजिस्टर्ड/स्पीड पोस्टाने दि. ३० जुलै २०२१ पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत.

फक्त एकाच पदासाठी उमेदवाराने अर्ज करावयाचा आहे. अर्जाच्या लिफाफ्यावर  Application for the Post of Tradesman Mate/JoA/MA/Fireman/MTS आणि UR/OBC/SC/ ST/EWS/Ex-Serviceman/PH/MSP  असा स्पष्ट उल्लेख असावा. (लागू नसेल ते खोडावे.)