मुंबईच्या नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्थेमधील विशेष अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत. अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहेत –
मास्टर ऑफ लेबर स्टडीज : कालावधी- दोन वर्षे. अर्हता- कुठल्याही विषयातील पदवीधर. अथवा पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेला बसलेले असावेत.
कामगार संघटना व औद्योगिक संबंध पदविका अभ्यासक्रम : कालावधी- नऊ महिने. अर्हता- बारावीची परीक्षा उत्तीर्ण. कामगार संघटनेत सक्रियपणे काम करणाऱ्या निवडक सात उमेदवारांना १५० रु. दरमहा
पाठय़वृत्ती देण्यात येईल.
निवड पद्धती : लेखी परीक्षा आणि त्यानंतर  समूह चर्चेसाठी बोलावण्यात येऊन त्याआधारे मूल्यांकन करून अभ्यासक्रमाला  प्रवेश देण्यात येईल.
अर्ज व माहितीपत्रक : अर्ज व माहितीपत्रक घरपोच मिळण्यासाठी २५० रु. मनीऑर्डरने संस्थेला पाठवावेत.
अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क : संस्थेच्या mils@mtnl.net.in या ई-मेलवर संपर्क साधावा.
अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख :  आवश्यक तो तपशील व कागदपत्रांसह असणारे प्रवेश अर्ज प्रबंधक, नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था, दादाभाई चमारबागवाला मार्ग, परळ, मुंबई- ४०००१२ या पत्त्यावर १६ जून २०१४ पर्यंत पोहोचणे अपेक्षित आहे.