• ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डस्, नवी दिल्ली आपल्या मुंबई, पुणे, नागपूर, अहमदाबाद, बंगलोर, हैदराबाद, नवी दिल्ली, रायपूर, भोपाळ इ. आस्थापनांवर ‘ट्रेनी’पदांची भरती.

१) ग्रॅज्युएट इंजिनीअर ट्रेनी – ४३ पदे (इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड आयटी – १७ पदे (दिल्ली), इलेक्ट्रिकल – १५ पदे, सिव्हिल – २ पदे, वॉटर रिसोस्रेस – २)

पात्रता – संबंधित विषयातील बीटेक / बीई पदवी.

२) सायन्स ग्रॅज्युएट ट्रेनी – २२ पदे

(मुंबई – २, पुणे/अहमदाबाद/हैदराबाद प्रत्येकी – १ इ.)

पात्रता – बीएससी (केमिस्ट्री/मायक्रोबायोलॉजी)

३) डिप्लोमा ट्रेनी – ३८ पदे (मेकॅनिकल) – २०, मुंबई/नागपूर/ अहमदाबाद/बंगलोर इ. प्रत्येकी – १ पद, सिव्हिल – १ पद (पुणे), इलेक्ट्रिकल – १३ पदे (नवी दिल्ली – ४, मुंबई/ अहमदाबाद इ. प्रत्येकी १ पद), मेटॅलर्जी – ४ पदे)

पात्रता – संबंधित विषयातील इंजिनीअरिंग डिप्लोमा.

ट्रेनिंग कालावधी – २ वर्षे.

स्टायपेंड – पद क्र. १ व २ साठी रु. ३५,०००/- दरमहा. पद क्र. ३ साठी रु. ३०,०००/- दरमहा.

वयोमर्यादा – दि. १ जानेवारी २०१८ रोजी ३५ वर्षेपर्यंत.

१ वर्ष पूर्ण व्हायच्या आत ट्रेनिंग सोडून दिल्यास उमेदवारांना कामाचे सर्टिफिकेट दिले जाणार नाही.

ऑनलाइन अर्ज http://www.bis.gov.in/ या संकेतस्थळावर दि. २५ एप्रिल २०१८ पर्यंत करावेत.

 

  • इंडियन स्पेस अ‍ॅण्ड रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो), इस्रो सेंट्रलाईज्ड् रिक्रूटमेंट बोर्डामार्फत देशभरातील इस्रोच्या विविध केंद्रांवर ज्युनियर पर्सोनल असिस्टंट आणि स्टेनोग्राफर्स पदांची भरती.

१) ज्युनियर पर्सोनल असिस्टंट – १६६ पदे (अहमदाबाद – १९, बंगलोर – ६१, हैदराबाद – १६, श्रीहरिकोटा – २५, तिरूअनंतपुरम् – ४४, नवी दिल्ली – १)

२) स्टेनोग्राफर्स – ५ पदे (डिपार्टमेंट ऑफ स्पेस) (खुला – ४, इमाव – १)

पात्रता – दोन्ही पदांसाठी – आर्ट्स/ कॉमर्स/सायन्स/मॅनेजमेंट/कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशनमधील पदवी किमान प्रथम वर्गासह उत्तीर्ण आणि स्टेनोग्राफीचा वेग किमान

८० श.प्र.मि. किंवा डिप्लोमा इन कमíशयल/सेक्रेटरियल प्रॅक्टिस किमान प्रथम वर्गासह उत्तीर्ण आणि १ वर्षांचा अनुभव तसेच स्टेनोग्राफी स्पीड ८० श.प्र.मि.

वयोमर्यादा – दि. ३० एप्रिल २०१८ रोजी १८ ते २६ वर्षे (इमाव – २९ वर्षे, अजा/अज – ३१ वर्षे, परित्यक्ता/विधवा महिला – ३५/३८/४० वर्षेपर्यंत)

अर्जाचे शुल्क – रु. १००/- (अजा/अज/महिला/माजी सनिक/विकलांग यांना फी माफ आहे.)

निवड पद्धती –  लेखी परीक्षेसाठी उमेदवारांना शॉर्ट लिस्ट केले जाईल. लेखी परीक्षा

दि. १२ ऑगस्ट २०१८ रोजी अहमदाबाद, बंगलोर, भोपाळ, चंदिगढ, चेन्नई, देहरादून, गुवाहाटी, हैदराबाद, लखनऊ, नवी दिल्ली अणि तिरूअनंतपुरम् येथे घेतली जाईल. स्किल टेस्ट – इंग्रजी स्टेनोग्राफी टेस्ट ८० श.प्र.मि. वेतन – रु. २५,५००/- अधिक घरभाडे भत्ता, प्रवास भत्ता इ. (पे मॅट्रिक्स लेवल-४) ऑनलाइन अर्ज www.isro.gov.in या संकेतस्थळावर दि. ३० एप्रिल २०१८ पर्यंत करावेत.

 

– सुहास पाटील

suhassitaram@yahoo.com