पुणे विद्यापीठाच्या एम्. एस्सी. बायोडायव्हर्सटिी या दोन वर्षांचा पूर्णवेळ  अभ्यासक्रमात पर्यावरणशास्त्र आणि वन्यजीवशास्त्र याची उत्तम सांगड घातली जाते. एम्. एस्सी.- बायोडायव्हर्सटिी या अभ्यासक्रमात निसर्गनिरीक्षण आणि संवर्धन, एखाद्या प्रजातीवर प्रयोगशाळेत संशोधन करण्याचा, त्याच्या जनुकीय वैविध्यतेचा व गुणांचा अभ्यास केला जातो. वनस्पतीशास्त्रातील व प्राणीशास्त्रातील विविधतेचे निरीक्षण, त्यांच्यातील उत्क्रांतीचा अभ्यास, त्यांच्यातील तरल संबंधांचा अभ्यास यात केला जातो. पर्यावरणशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र आणि रसायनशास्त्र आणि संवर्धनशास्त्र अशा भिन्न विषयांची सांगड घालणारा असा हा अभ्यासक्रम आहे.
प्रत्यक्ष निसर्गात जाऊन प्रात्याक्षिके करण्याची संधी या अभ्यासक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना मिळते. त्याचबरोबर आवडेल त्या विषयात प्रकल्प करण्याची रचनाही यात अंतर्भूत आहे. अशा नावीन्यपूर्ण रचनेमुळेच असेल कदाचित, हा अभ्यासक्रम केलेले काही विद्यार्थी एम्. एस्सी. करताना अंटाíक्टका मोहीम, केम्ब्रिज विद्यापीठामध्ये प्रकल्पाचे सादरीकरण, प्रतिष्ठेची अशी डार्वनि स्कॉलरशिप, हार्वर्ड युनिव्हर्सटिीचा बोíनओ कोर्स आणि नॅशनल जिओग्राफिक सोसायटीच्या फोटोग्राफी स्पध्रेत यश अशी वेगवेगळी शिखरे पादाक्रांत करू शकली. कर्करोगावरील उपयुक्त वनस्पतींचे संशोधन, आरएस – जीआयएससारख्या नवीन गोष्टी शिकून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर पारितोषिके मिळवू शकली. काही अग्रगण्य शैक्षणिक संस्थांमधून (उदा. आयआयएससी, बंगळुरू व आयआयएसईआर, पुणे आदी.) नावीन्यपूर्ण संशोधन करत आहेत व त्यांनी स्वत:चे असे वेगळे स्थान निर्माण केले आहे. जैवविविधता विभागाला पुणे विद्यापीठाकडून पर्यावरणशास्त्र विषयाच्या पीएच.डी.साठी संशोधन केंद्र म्हणून मान्यता
मिळाली आहे. या विभागात वेगवेगळ्या विषयांवर संशोधनदेखील सुरू आहे.
या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा द्यावी लागते. अर्हता – कुठल्याही विज्ञान शाखेची पदवी.
(उदा. बी.एस्सी. लाइफ सायन्सेस, मायक्रोबायोलोजी, बॉटनी, झुलॉजी, बायोटेक्नोलोजी, पर्यावरणशास्त्र, फोरेस्ट्री, फिजिक्स, केमिस्ट्री, जिओग्राफी, अॅग्रीकल्चर, फिशरीज, फार्मसी, मेडिसिन, इंजिनीअिरग कुठलीही शाखा). प्रवेश परीक्षा १२ जून २०१४ रोजी दुपारी २ ते ४ या वेळेत गरवारे महाविद्यालयात होईल. अधिक माहितीसाठी http://www.mesbiodiversity.in  या संकेतस्थळाला भेट द्या किंवा ४१०३८२३६/३७ या दूरध्वनी क्रमांकावर स. ११ ते सायं. ४ या वेळेत संपर्क साधावा.