एमपीएससी मंत्र : फारुक नाईकवाडे

अंकगणित, तर्कक्षमता आणि बुद्धिमत्ता या तीन उपघटकांमधील प्रश्नांचे पुन्हा खूप वेगवेगळे प्रकार आहेत. आयोगाने यापूर्वी राज्यसेवा परीक्षेमध्ये विचारलेल्या प्रश्नांचे प्रकार आणि त्यांचे स्वरूप यावर मागील लेखामध्ये चर्चा करण्यात आली. या लेखामध्ये त्यांच्या तयारी व सरावाबाबत चर्चा करण्यात येत आहे. तयारी करताना घटकनिहाय लक्षात घ्यायचे मुद्दे

Dhananjay Chandrachud
‘एआय’मुळे नैतिक, कायदेशीर, व्यावहारिक प्रश्न! आधुनिक प्रक्रियांबरोबर होणाऱ्या एकत्रीकरणाकडे सरन्यायाधीशांचा इशारा
All information about OpenAI GPT 4 Vision in marathi
प्रतिमा, मजकूर आणि ध्वनी अशा तिन्ही गोष्टींवर करणार प्रक्रिया; GPT- 4 Vision नक्की काय आहे?
changes in temperature and inflation marathi news, temperature change impact on inflation marathi news
विश्लेषण : उष्णतेच्या झळांमुळे अन्नधान्य महागाई? नवीन संशोधनामध्ये कोणते गंभीर इशारे?
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : भारतीय राज्यव्यवस्था मूलभूत संकल्पना, परिशिष्टे आणि सरनामा

पुढीलप्रमाणे – अंकगणित सर्वसाधारणपणे या उपघटकामध्ये गणिती क्रियांवर ६ ते ८ प्रश्न आणि संख्यामालिकेवर २ ते ५ प्रश्न विचारण्यात येतात.

  •     पायाभूत गणिती सूत्रे तसेच परिमिती, क्षेत्रफळ आणि घनफळ यांबाबतची सूत्रे आणि १ ते ३० पर्यंत पाढे पाठ असतील तर ही गणिते कमी वेळात आणि आत्मविश्वासाने सोडविता येतात.
  • संख्यामालिका, आकृतीमधील गणिती प्रक्रिया सोडविण्यासाठी १ ते ३० पर्यंतचे पाढे, १ ते २० पर्यंतचे वर्ग आणि १ ते १५ पर्यंतचे घन पाठ असतील तर सर्वसाधारण गणिती प्रक्रिया करून हे प्रश्न सोडविण्यातही आत्मविश्वास मिळवता येतो. या मूलभूत गोष्टींबरोबर अंकाक्षर मालिकाही विचारण्यात येत आहेत.
  •  शेकडेवारी, व्याज, नफातोटा, भागीदारी, गुणोत्तर प्रमाण, समीकरणे, काळ काम वेग अंतर, माहिती विश्लेषण आणि संभाव्यता हे घटक विशेष महत्त्वाचे आहेत. यामध्ये पहिले पाच घटक एकत्रितपणे अभ्यासावेत.
  •  नफ्याचे गुणोत्तर किंवा टक्केवारी, व्याजातील फरकाचे प्रमाण अशा प्रकारे यांच्या एकत्रित उपयोजनाचे प्रश्न विचारण्यावर आयोगाचा भर दिसतो. सूत्रे पाठ असावीतच, पण हे घटक सोडविताना का आणि कसे हे नेमकेपणाने समजून घेऊन सराव केल्यास कशाही प्रकारे प्रश्न विचारला तरी नेमकी कोणती प्रक्रिया करायला हवी हे लक्षात येते.
  •   तर्कक्षमतेच्या प्रश्नांमध्ये डेटा सफिशिएन्सीचे उपयोजन करण्यासारखे प्रश्नही विचारण्यात येत आहेत.

 

तर्कक्षमता

  • तर्कक्षमतेमध्ये विधानांवर आधारित निष्कर्ष पद्धती, नातेसंबंध, बठकव्यवस्था हे मुद्दे समाविष्ट होतात. प्रथमदर्शनी क्लिष्ट वाटणाऱ्या या प्रश्नांचा सराव केल्यास आणि त्यांच्यामगचे नेमके तर्क समजून घेतल्यास हेही प्रश्न वेळेच्या मर्यादेत सोडविणे शक्य होते.
  •  निष्कर्ष पद्धतीमध्ये दिलेली विधाने खरी मानून ती वेन आकृत्यांमध्ये मांडून प्रश्न सोडवावेत.
  •  नातेसंबंधांवरील प्रश्नांसाठी त्यातील एका पात्राच्या जागी स्वत:स कल्पून ते प्रश्न सोडवावेत. मागील काही वर्षांपासून दिलेली माहिती नातेसंबंध प्रस्थापित करण्यासाठी पर्याप्त आहे किंवा कसे अशा प्रकारचे प्रश्नही विचारण्यात आले आहेत. त्यामुळे डेटा सफिशिएन्सी आणि नातेसंबंध यांची सांगड घालता येणे आवश्यक आहे.
  •   बठक व्यवस्थेचे प्रश्न सोडविताना डावी आणि उजवी बाजू कटाक्षाने लक्षात घ्यावी.
  •  घडय़ाळातील काटय़ांचे कोन, आरशातील प्रतिमा, कॅलेंडरमधील लीप इअरचा विचार या बाबी सरावाने सोप्या होतील.
  •   दिशांबाबतच्या प्रश्नांमध्ये सरळ सांगितलेल्या मार्गाचे आरेखन करत गेल्यास योग्य उत्तर लवकर सापडते.

 

बुद्धिमत्ता चाचणी

  •  व्यक्तींच्या माहितीच्या संयोजनावरील प्रश्न सोडविताना कोष्टकामध्ये माहिती भरत गेल्यास अचूक उत्तर व कॉम्बिनेशन्स सापडतात.
  •   आकृती मालिकांवरील प्रश्न सोडविताना निरीक्षणशक्ती आणि विश्लेषणक्षमता यांचा वापर आवश्यक ठरतो. यामध्ये घडय़ाळाच्या काटय़ाच्या किंवा उलटय़ा दिशेने ठरावीक कोनांतून बदलणारे स्थान किंवा दोन आकृत्यांच्या बेरीज वा ठरावीक स्थानांवरील घटकांची वजाबाकी अशा प्रक्रियांच्या आधारे उत्तरे शोधता येतात.
  •  अक्षरमालिका आणि अंकाक्षर मालिका सोडविण्यासाठी इंग्रजी वर्णमाला एकाखाली एक सरळ आणि उलटय़ा क्रमाने लिहावी आणि त्यांना त्याच क्रमाने आकडे द्यावेत. या आधारे अक्षरमालिका, अंकाक्षर मालिका आणि आकृतीमधील अक्षरांचे प्रश्न सोडवावेत.
  •    सांकेतिक भाषेवरील प्रश्नांसाठी एलिमिनेशन पद्धतीने शब्द व त्यांचे संकेत शोधावेत.
  •     इनपूट आउटपुट प्रश्नांसाठी दिलेल्या शब्द / संख्यांना क्रमांक देऊन त्यांचे क्रम कशा प्रकारे बदलत जातात त्यांचे नियम शोधावेत.

 

यातील जास्तीत जास्त व शक्य असल्यास सगळ्याच प्रकारचे प्रश्न सोडविण्याचा सराव करत राहिल्यास आपोआप रस वाटू लागतो. एकदा या प्रश्नांसाठीची सूत्रे, युक्त्या-प्रयुक्त्या समजल्या की त्या सरावाने लक्षात ठेवणेही सोपे होते. जे उमेदवार या घटकांमध्ये किमान पन्नास ते साठ टक्के प्रश्न सोडवितात ते नक्कीच चांगले गुण मिळवून उत्तीर्ण होतात हे गेल्या चार वर्षांतील उत्तीर्ण उमेदवारांच्या गुणांच्या विश्लेषणवरून लक्षात येते. त्यामुळे या मुद्दय़ांचा बारकाईने अभ्यास व सराव केल्यास २५ ते ३५ गुण निश्चितपणे मिळवता येतात.

हे सर्व घटक दहावीपर्यंतच्या अभ्यासाच्या आधारावर सोडविता येतात. या घटकाच्या तयारीसाठी आणि सरावासाठी बाजारात मोठय़ा संख्येने पुस्तके उपलब्ध आहेत. त्यातील काही निवडक पुस्तकांची यादी पुढे दिलेली आहे. प्रत्यक्ष पुस्तक पाहून सोयीचे आणि उपयुक्त वाटेल असे पुस्तक उमेदवारांनी निवडायला हवे.

 

संदर्भ ग्रंथ

  •    चौथी व सातवी स्कॉलरशिपची गाइड्स
  •    आठवी, नववी, दहावीची प्रज्ञा शोध परीक्षेची गाइड्स
  •  आर. एस. अगरवाल यांचे पुस्तक
  •    क्लृप्त्या आणि सूत्रे – पंढरीनाथ राणे
  • बुद्धिमत्ता चाचणी – सचिन ढवळे
  •   बुद्धिमत्ता चाचणी – ज्ञान दीप अकॅडमी