एमपीएससी मंत्र : रोहिणी शहो

indian economy marathi news (1)
“भारत ७ टक्के विकासदर गाठेल, पण तो पुरेसा नाही कारण…”, RBI च्या चलनविषयक समितीच्या सदस्यांची ठाम भूमिका!
IITM Pune Bharti 2024
Pune Jobs : IITM पुणे येथे नोकरीची संधी, आजच अर्ज करा, एवढा मिळणार पगार
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : भारतीय राज्यव्यवस्था – मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्ये
Professor arrested for taking bribe to accept PhD thesis
विद्येच्या माहेर घरात शिक्षणाचा बाजार! पीएचडीचा प्रबंध मान्य करण्यासाठी लाच घेणारी प्राध्यापिका अटकेत

राज्य सेवा मुख्य परीक्षा पेपर ३ च्या अभ्यासक्रमाची अभ्यासाच्या सोयीसाठी विभागणी कशा प्रकारे करता येईल याबाबत या लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे.

भारतातील मानव संसाधन विकास

संकल्पनात्मक: आधुनिक समाजातील मानव संसाधनाचे महत्त्व आणि आवश्यकता, मानव संसाधन नियोजनामध्ये अंतर्भूत तत्त्वे आणि घटक, भारतातील बेरोजगारीची समस्या, स्वरूप आणि प्रकार

पारंपरिक: मानव संसाधन व शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था: यूजीसी, एआयसीटीई, एनसीटीई, रुसा, आयटीआय, एनसीव्हीटी, आयएमसी, एनसीईआरटी, एनआयईए, आयटीआय, आयआयएम इत्यादी

लोकसंख्याविषयक धोरण आणि २०५० पर्यंतच्या योजना, शासनाचे नोकरीविषयक धोरण, बेरोजगारी कमी करण्यासाठी शासनाचे धोरण व विविध योजना

तथ्यात्मक: भारतातील लोकसंख्येची सद्यस्थिती – संख्यात्मक स्वरूप (आकारमान आणि वृद्धी, वृद्धीदर,  लिंग, वय, ग्रामीण आणि नागरी लोकसंख्या, जन्म दर आणि मृत्यू दर) आणि गुणात्मक स्वरूप (शिक्षण व आरोग्यविषयक), बेरोजगारीचे प्रकारनिहाय प्रमाण, रोजगार क्षेत्राचा कल, विभिन्न विभागांतील व क्षेत्रातील कुशल कामगारांचे  मागणी  दर.

शिक्षण

संकल्पनात्मक: मानव संसाधन विकासाचे आणि सामाजिक बदलाचे साधन म्हणून शिक्षणाचा विचार, भारतातील शिक्षण प्रणाली (पूर्व प्राथमिक ते उच्च शिक्षण), मुलींकरिता शिक्षण, सामाजिकदृष्टया व आर्थिकदृष्टया गरीब वर्ग, अधू, अल्पसंख्य, कौशल्य शोध इत्यादी, शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण, शिक्षणाचे व्यावसायिकीकरण, दर्जावाढ, गळतीचे प्रमाण इत्यादी समस्या आणि प्रश्न, ई-अध्ययन, जागतिकीकरण आणि खासगीकरण याचा भारतीय शिक्षणावरील

परिणाम.

पारंपरिक: राष्ट्रीय ज्ञान आयोग, राष्ट्रीय उच्च शिक्षण व संशोधन आयोग, आयआयटी, आयआयएम, एनआयटी, अनौपचारिक, औपचारिक आणि प्रौढ शिक्षणाचा प्रसार विनियमन आणि सनियंत्रण करणाऱ्या शासकीय व स्वयंसेवी संस्था, शासनाची शैक्षणिक धोरणे, योजना व कार्यक्रम, शिक्षणाचा हक्क-२००९ आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०१९.

व्यावसायिक शिक्षण

संकल्पनात्मक: मानव संसाधन विकासाचे साधन म्हणून व्यावसायिक शिक्षणाचा विचार, समस्या, प्रश्न व त्यावर मात करण्यासाठी प्रयत्न, स्वत:चा उद्योग स्थिरस्थावर करणे.

पारंपरिक: राष्ट्रीय कौशल्य विकास कार्यक्रम उद्योग संस्था भागीदारी (अंतर्वासिता आणि शिकाऊ उमेदवारी) (internship & apprenticeship), शिक्षणप्रणाली व प्रशिक्षण, व्यावसायिक आणि तंत्र शिक्षणाचा प्रसार, विनियमन करणाऱ्या आणि अधिस्वीकृती देणाऱ्या संस्था, NSDC, शासकीय धोरणे, योजना व कार्यक्रम.

तथ्यात्मक: व्यावसायिक / तंत्र शिक्षण – भारतातील, विशेषत: महाराष्ट्रातील सद्यस्थिती, व्यावसायिक शिक्षणाशी संबंधित सरकारी कार्यक्रम, शिक्षणाच्या राष्ट्रीय धोरणातील व्यावसायिक शिक्षणाच्या तरतुदी.

गतिमान मुद्दे: ग्रामीण भागात व्यावसायिक शिक्षण प्रसारासाठी कार्यनिती, रोजगाराच्या क्षेत्रनिहाय संधी, लहान वयात व्यावसायिक शिक्षणाचा परिचय (प्राथमिक शिक्षण वयोगटानंतर १४+), सेवा क्षेत्रातील व्यावसायिक शिक्षण (आतिथ्य, रुग्णालये,  paramedics इ.), महिला सबलीकरणासाठी व्यावसायिक शिक्षण.

आरोग्य

संकल्पनात्मक: भारतामध्ये आरोग्याशीविषयक घटक आणि समस्या (कुपोषण, माता मृत्यू दर)

पारंपरिक: जागतिक आरोग्य संघटना – उद्देश, रचना, कार्ये व कार्यक्रम भारतामध्ये आरोग्यविषयक धोरणे, योजना आणि कार्यक्रम, भारतातील आरोग्य सेवा यंत्रणा, शासनाची आरोग्यविषयक, जननी – बाल सुरक्षा योजना, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना (PMSSY).

तथ्यात्मक: भारतातील आरोग्यविषयक महत्त्वाची आकडेवारी ग्रामीण विकास

संकल्पनात्मक: पंचायत राज व्यवस्था सक्षमीकरण, ग्राम पंचायतीची विकासातील भूमिका, ग्रामविकासामध्ये सहकारी संस्थांची भूमिका.

पारंपरिक: जमीन सुधारणा व विकास, ग्रामविकासामध्ये अंतर्भूत असणाऱ्या वित्तीय संस्था (SHG, सूक्ष्मवित्त) ग्रामीण रोजगार योजना, ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता कार्यक्रम, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, मिशन अंत्योदय, ग्राम स्वराज अभियान

तथ्यात्मक: ग्रामीण क्षेत्रातील पायाभूत विकास उदा. ऊर्जा, परिवहन, गृहनिर्माण व दळणवळण.

मानवी हक्क

संकल्पनात्मक: लोकशाही चौकटीत मानवी हक्क आणि मानवी सभ्यतेचे पालन करण्यासाठी प्रशिक्षण देण्याची गरज,

मूल्ये नीतितत्त्वे आणि प्रमाणके: कुटुंब, धर्म, शिक्षण, प्रसारमाध्यमे इत्यादी यांसारख्या औपचारिक व अनौपचारिक संस्थांमार्फत सामाजिक मानके, मूल्ये, नीतितत्त्वे यांची जोपासना करणे.

पारंपरिक: जागतिक मानवी हक्क प्रतिज्ञापत्र (यूडीएचआर १९४८), मानवी हक्काची आंतरराष्ट्रीय मानके, त्याचे भारताच्या संविधानातील प्रतिबिंब, भारतातील मानवी हक्क चळवळ, भारतात मानवी हक्क राबविण्याची आणि त्याचे संरक्षण करण्याची यंत्रणा.

आंतरराष्ट्रीय व प्रादेशिक संघटना: संयुक्त राष्ट्रे आणि तिची विशेषीकृत अभिकरणे – यूएनसीटीएडी, यूएनडीपी, आयसीजे, आयएलओ, युनिसेफ, युनेस्को, यूएनसीएचआर, इयू, अ‍ॅपेक, एशियन, ओपेक, ओएयू, सार्क, नाम, राष्ट्रकुल राष्ट्रे (कॉमनवेल्थ ऑफ नेशन्स) आणि युरोपियन युनियन, साफ्ता, नाफ्ता, ब्रिक्स आणि RCEP बालमजुरी प्रतिबंध आणि नियमन कायदा, लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा आणि एकात्मिक बाल विकास प्रकल्प

कौशल्य विकास व उद्योजकतेसाठीचे राष्ट्रीय धोरण आणि राष्ट्रीय युवा धोरण, वन हक्कविषयक कायदा.

लोकांचे पुनर्वसन: कार्यतंत्र धोरण व कार्यक्रम – कायदेविषयक तरतुदी – आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक, मानसशास्त्रीय इत्यादी निरनिराळया पैलूंचा विचार, रोजगार व पुनर्वसन यामधील आंतरराष्ट्रीय संस्था, स्वयंसेवी संघटनांची भूमिका.

ग्राहक संरक्षण: विद्यमान अधिनियमाची ठळक वैशिट्ये – ग्राहकांचे हक्क – ग्राहक विवाद व निवारण यंत्रणा, मंचाचे निरनिराळे प्रकार – उद्दिष्टे, अधिकार, कार्ये, कार्यपद्धती, ग्राहक कल्याण निधी.

तथ्यात्मक:  मानवी विकास निर्देशांक, बालमृत्यू प्रमाण, लिंग गुणोत्तर.

विश्लेषणात्मक

मानवी हक्कापासून वंचित असलेल्यांच्या समस्या जसे गरिबी, निरक्षरता, बेरोजगारी, सामाजिक – सांस्कृतिक – धार्मिक प्रथा, हिंसा, भ्रष्टाचार, दहशतवाद, कामगारांचे शोषण, हवालातीतील गुन्हेगारी इत्यादी. जागतिकीकरण आणि त्याचा विभिन्न क्षेत्रांवरील परिणाम.

बाल विकास: समस्या – अर्भक मृत्युसंख्या, कुपोषण, बाल कामगार, मुलांचे शिक्षण इत्यादी.

महिला विकास: समस्य – स्त्री-पुरुष असमानता, महिलांविरोधी हिंसाचार, स्त्री अर्भक हत्या / स्त्रीभ्रूण हत्या, महिलांचे सबलीकरण इत्यादी –  सबलीकरणासाठीच्या योजना व कार्यक्रम, आशा.

युवकांचा विकास: समस्या – बेरोजगारी, असंतोष, अंमली पदार्थांचे व्यसन इत्यादी.

आदिवासी विकास: समस्या – कुपोषण, अलिप्तता, एकात्मीकरण व विकास इत्यादी आदिवासी चळवळ .

अ.जा., अ.ज., वि.जा/ भ.ज, इतर मागासवर्ग इत्यादी सामाजिकदृष्टया वंचित वर्गाचा विकास: समस्या, संधीतील असमानता इत्यादी.

वयोवृद्ध लोकांचे कल्याण: समस्या – वयोवृद्धांच्या विकासासाठी सामूहिक सहभाग, विकासविषयक कार्यक्रमांमध्ये त्यांच्या सेवांचे उपयोजन.

कामगार कल्याण: समस्या – कामाची स्थिती, मजुरी, आरोग्य आणि संघटित व असंघटित क्षेत्रांशी संबंधित समस्या, साधन संपत्ती संघटित करून कामी लावणे.

विकलांग व्यक्तींचे कल्याण: समस्या – शैक्षणिक व रोजगार संधी यांमधील असमानता इत्यादी.