तीन वर्षे कालावधीच्या बीएस्सी – हॉस्पिटॅलिटी अ‍ॅण्ड हॉटेल अ‍ॅडमिनिस्ट्रेशन या पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश देण्यासाठी नॅशनल कौन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट अ‍ॅण्ड कॅटरिंग टेक्नॉलॉजी आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एनसीएचएम- जेईई : २०१५’ ही प्रवेश परीक्षा घेण्यात येते.
शैक्षणिक पात्रता
अर्जदारांनी १०+२ शैक्षणिक अभ्यासक्रमांतर्गत बारावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी अथवा ते बारावीच्या परीक्षेला बसलेले असावेत.
निवड पद्धती
अर्जदारांपैकी पात्र उमेदवारांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलावण्यात येईल. राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणारी ही निवड परीक्षा देशांतर्गत निवडक ३३ शहरांमधील परीक्षा केंद्रांवर घेण्यात येईल.
उमेदवारांची बारावीच्या परीक्षेतील गुणांची टक्केवारी व लेखी परीक्षेतील गुणांकाच्या आधारे त्यांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येऊन त्याआधारे त्यांना बीएस्सी इन हॉस्पिटॅलिटी अ‍ॅण्ड हॉटेल अ‍ॅडमिनिस्ट्रेशन अभ्यासक्रमाला प्रवेश देण्यात येईल.
अर्ज व माहितीपत्रक
अर्ज व माहितीपत्रक घरपोच हवे असल्यास सर्वसाधारण गटाच्या उमेदवारांनी ९०० रुपयांचा (राखीव गटातील उमेदवारांनी ४५० रुपयांचा) डिमांड ड्राफ्ट विनंतीअर्जासह नॅशनल कौन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट अ‍ॅण्ड कॅटरिंग टेक्नॉलॉजी, मिनिस्ट्री ऑफ टुरिझम, ए-३४, सेक्टर-६२, नोएडा (उत्तर प्रदेश) २०१३०९ या पत्त्यावर पाठवावा.
अधिक माहिती
 अभ्यासक्रमाची अधिक माहिती http://www.nchm.gov.in, http://www.nchm.nic.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.
अर्ज पाठविण्याची मुदत
अर्ज तपशील आणि कागदपत्रांसह वरील पत्त्यावर पाठवावेत अथवा संगणकीय पद्धतीने भरलेले प्रवेश अर्ज नॅशनल कौन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट अ‍ॅण्ड कॅटरिंग टेक्नॉलॉजीच्या hhhttps.//applyadmission.net/nchmjee या संकेतस्थळावर ६ एप्रिल २०१५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.