25 March 2019

News Flash

नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिटय़ूटचा अभ्यासक्रम

नागपूरच्या नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिटय़ूटमध्ये उपलब्ध असणाऱ्या ट्रान्समिशन अ‍ॅण्ड डिस्ट्रिब्युशन सिस्टीम्स या विशेष अभ्यासक्रमामध्ये प्रवेश देण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत

| September 29, 2014 07:14 am

नागपूरच्या नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिटय़ूटमध्ये उपलब्ध असणाऱ्या ट्रान्समिशन अ‍ॅण्ड डिस्ट्रिब्युशन सिस्टीम्स या विशेष अभ्यासक्रमामध्ये प्रवेश देण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत-
जागांची संख्या व तपशील : या अभ्यासक्रमासाठी उपलब्ध असणाऱ्या जागांची संख्या ६० असून यापैकी काही जागा सरकारी नियमांनुसार राखीव आहेत.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवारांनी इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रिकल अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक अथवा इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड पॉवर यांसारख्या विषयातील पदवी परीक्षा उत्तम टक्केवारीसह उत्तीर्ण केलेली असावी.
निवड पद्धती : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना त्यांच्या पदवी परीक्षेतील गुणांच्या आधारे या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश देण्यात येईल.
अभ्यासक्रमाचा कालावधी : या अभ्यासक्रमाचा कालावधी
२६ आठवडय़ांचा असेल. अभ्यासक्रमादरम्यान गरजू विद्यार्थ्यांसाठी निवासस्थानाची सोय करून देण्यात येईल.
अर्जासह भरायचे शुल्क : अर्जासह भरायचे शुल्क म्हणून ९०० रु.चा ‘एनपीटीआय’च्या नावे असणारा व नागपूर येथे देय असणारा डिमांड ड्राफ्ट पाठविणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहितीसाठी नॅशनल पॉवर
ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट, नागपूरच्या www.nptinagpur.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख : विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले आणि आवश्यक तो तपशील, कागदपत्रांसह असणारे प्रवेश अर्ज दि प्रिन्सिपल-डायरेक्टर, नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट, ‘व्हीएनआयटी’समोर, गोपाळनगर, दक्षिण अंबाझरी मार्ग, नागपूर ४४००२२ या पत्त्यावर १३ ऑक्टोबर २०१४ पर्यंत पाठवावेत.

First Published on September 29, 2014 7:14 am

Web Title: national power training institute syllabus