News Flash

महिला संशोधकांसाठी योजना

केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे महिला संशोधकांच्या बौद्धिक संपदा हक्क योजनेंतर्गत विशेष प्रशिक्षण योजना उपलब्ध आहे.

| July 6, 2015 01:05 am

केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे महिला संशोधकांच्या बौद्धिक संपदा हक्क योजनेंतर्गत विशेष प्रशिक्षण योजना उपलब्ध आहे.
योजनेचा तपशील : या योजनेचा मुख्य उद्देश ‘किरण आयपीआर’ प्रशिक्षण योजनेंतर्गत महिला संशोधकांना बौद्धिक संपदा हक्क विषयाशी संबंधित सरावासह प्रशिक्षण देणे हा आहे.
शैक्षणिक अर्हता : अभियांत्रिकी वा तंत्रज्ञान विषयातील पदवी अथवा विज्ञान विषयातील पदव्युत्तर पदवी चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी.
रसायनशास्त्र, औषधे, खाद्यान्न, बायोमेडिकल इंजिनीअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रमेंटेशन, इंडस्ट्रियल इंजिनीअरिंगमधील शैक्षणिक संशोधनपर कामाचा संगणकीय अनुभव ही अतिरिक्त पात्रता समजण्यात येईल.
वयोमर्यादा : उमेदवारांचे वय २६ ते ४५ वर्षांच्या दरम्यान असावे.
निवड पद्धती : अर्जदारांपैकी पात्र उमेदवारांना लेखी निवड परीक्षा व मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांची अंतिम निवड करण्यात येईल.
निवड झालेल्या उमेदवारांना सुरुवातीला नवी दिल्ली येथे सुरुवातीला दोन महिने प्रशिक्षण देण्यात येऊन त्यानंतर त्यांना दिल्ली, पुणे, चेन्नई, खरगपूर यांसारख्या ठिकाणी संशोधन कामाच्या बौद्धिक संपदा हक्क संरक्षणविषयक कामाचे प्रत्यक्ष सरावासह प्रशिक्षण देण्यात येईल.
शिष्यवृत्तीचा तपशील : योजनेंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या प्रशिक्षण कालावधीत ते एमएस्सी, बीटेक, एमबीबीएस, बीफार्म असल्यास दरमहा २०,००० रु. तर एमटेक, एमएस्सी, एमफार्म वा पीएचडी असल्यास दरमहा ३०,००० रु. संशोधनपर शिष्यवृत्ती स्वरूपात देण्यात येतील.
अधिक माहिती : योजनेच्या संदर्भात अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २० ते २६ जून २०१५च्या अंकात प्रकाशित झालेली विज्ञान-तंत्रज्ञान मंत्रालयाची किरण-आयपीआर योजनेची जाहिरात पाहावी अथवा मंत्रालयाच्या www.tifac.org.in किंवा www.pfc.org.in या संकेतस्थळांना भेट द्यावी.
अर्ज करण्याची मुदत : संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळांवर अर्हताप्राप्त महिलांनी १९ जुलै २०१५ पर्यंत अर्ज करावेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 6, 2015 1:05 am

Web Title: plans for women researchers
Next Stories
1 राष्ट्रीय संरक्षण अकादमी व नौदल अकादमी प्रवेश परीक्षा
2 बारावी उत्तीर्णासाठी संधी
3 न्यूझीलंडमध्ये पीएच.डी.साठी आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्ती
Just Now!
X