विचारांमध्ये महत्त्वाचे तत्त्व समाविष्ट असते, कारण ते या विश्वाच्या निर्मितीचे, सृजनाचे तत्त्व आहे आणि त्याच्या अंगभूत स्वभावानुसार तो विचार इतर तत्सम विचारांशी जोडला जात असतो.
वाढ होणे जीवनाचे एक उद्दिष्ट आहे. त्यामुळे अस्तित्वाच्या मुळाशी असलेल्या तत्त्वांचे योगदान आयुष्याच्या वाढीसाठी आवश्यक आहे. त्यामुळेच विचार हा आकार धारण करतो आणि नंतर साहजिकच वाढीचा, विकासाचा नियम प्रत्यक्ष प्रत्ययास येतो.
आपण कोणता विचार करायचा, हे निवडण्याचे स्वातंत्र्य तुम्हांला आहे, परंतु त्या विचाराचा परिणाम मात्र त्या व्यक्तीच्या स्वभाव, आरोग्य आणि परिस्थितीवर निश्चितपणे होतो. अवांछित परिणाम देणारे आपले विचार बाजूला सारून त्याऐवजी विधायक, सकारात्मक विचार करण्यासाठी योग्य पद्धती शोधून स्वत:ला तशी सवय लावणे, हे अत्यंत महत्त्वाचे आहे.
असे करणे हे मुळीच सोपे नाही, हे आपणा सर्वानाच माहीत आहे. मनाला लागलेल्या सवयींवर अंकुश ठेवणे फार कठीण असते, तरीही आपण हे करू शकतो आणि आपल्या विध्वंसक विचारांऐवजी सकारात्मक विचार मनात स्थिर करायला सुरुवात केल्यास ते शक्य होते. प्रत्येक विचाराचे विश्लेषण करण्याची सवय स्वत:ला लावा.
यशस्वितेचे नियम (द मास्टर की सिस्टीम), चार्ल्स एफ. हॅनेल, अनुवाद- डॉ. शकुंतला कोलारकर, साकेत प्रकाशन, पृष्ठे – २८०,  मूल्य – २४५ रु.

Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
Loksatta samorchya bakavarun Congress bjp Declaration Important to the people Purpose of the issues
समोरच्या बाकावरून: माझे मत त्याच उमेदवाराला, जो…
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…