बंगळुरू येथील इंडियन प्लायवूड इंडस्ट्रीज रिसर्च अ‍ॅण्ड ट्रेनिंग इन्स्टिटय़ूटमध्ये ‘वूड अ‍ॅण्ड पॅनेल प्रॉडक्टस् टेक्नॉलॉजी’ या नोव्हेंबर २०१५ मध्ये सुरू होणाऱ्या पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे.
आवश्यक शैक्षणिक अर्हता- प्रवेशेच्छु अर्जदारांनी कृषी, कृषी विज्ञान, विज्ञान, अभियांत्रिकी यांसारख्या विषयातील पदवी उत्तम शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी.
वयोमर्यादा – उमेदवारांचे वय १ नोव्हेंबर २०१५ रोजी २८ वर्षांहून अधिक नसावे. वयोमर्यादेची अट राखीव गटातील उमेदवारांसाठी सरकारी नियमांनुसार शिथिलक्षम आहे.
निवड पद्धती- उमेदवारांची निवड त्यांच्या पात्रता परीक्षेतील गुणांची टक्केवारी आणि शैक्षणिक आलेख याआधारे करण्यात येईल. त्यांना एक वर्ष कालावधीच्या वूड अ‍ॅण्ड पॅनल प्रॉडक्टस् टेक्नॉलॉजी या विषयातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्यात येईल.
करिअर संधी- अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना सरकारी, सहकारी अथवा खासगी क्षेत्रातील लाकूड प्रक्रिया उद्योग व संबंधित उत्पादन क्षेत्रात प्रक्रिया, दर्जा नियंत्रण, मार्केटिंग, व्यवस्थापन यांसारख्या क्षेत्रात नोकरीच्या उत्तम संधी उपलब्ध असतात.
अर्जासह पाठवायचे शुल्क – अर्जासह पाठवायचे शुल्क म्हणून २५० रु.चा बंगळुरु येथे देय असणारा डिमांड ड्राफ्ट डायरेक्टर, आयपीआयआरटीआय यांच्या नावे पाठवणे आवश्यक आहे.
अधिक माहिती – अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ४ ते १० जुलै २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली इंडियन प्लायवूड इंडस्ट्रीज रिसर्च अ‍ॅण्ड ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट, बंगळुरुची जाहिरात पाहावी अथवा http://www.ipirti.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज पाठविण्याची मुदत- विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले आणि आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे प्रवेश अर्ज अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, इंडियन प्लायवूड इंडस्ट्रीज रिसर्च अ‍ॅण्ड ट्रेिनग इन्स्टिटय़ूट, पिन्या मेट्रो स्टेशन, एचएमटी लिंक रोड, ऑफ तुमकूर रोड, यशवंतपूर, बंगळुरु- ५६००२२ या पत्त्यावर ४ सप्टेंबर २०१५ पर्यंत पाठवावेत. ल्ल ल्ल