मानसशास्त्रानुसार, तुमच्या आत्म-सन्मानाची पातळी तुमच्या आनंदाची पातळी ठरवते. आत्मसन्मानाची व्याख्या तुम्ही स्वत:ला किती आवडता यावरून केली जाते. तुमचा आत्मसन्मान हा तुमच्या आत्मप्रतिमेने ठरवला जातो. तुम्ही तुमच्या इतरांबरोबरच्या दैनंदिन देवाणघेवाणीतून स्वत:कडे कसे बघता आणि स्वत:बद्दल जो विचार करता ती तुमची आत्मप्रतिमा असते. तुमची आत्मप्रतिमा ही तुमच्या स्वआदर्शाने ठरत असते. तुमचा स्वआदर्श हा तुमचे सद्गुण, मूल्ये, ध्येये, आशा, स्वप्ने आणि आकांक्षा यांनी बदललेला असतो. मानसशास्त्रज्ञांनी असा शोध लावला आहे : तुम्हाला तुमचे आदर्श वागणे जसे असावे असे वाटते, त्याच्याशी तुमचे या क्षणीचे वागणे हे जितके सुसंगत असेल तितके तुम्ही स्वत:ला जास्त आवडता, स्वत:चा आदर करता आणि जास्त आनंदी असता.
जेव्हा तुम्ही तुमच्या सवरेत्कृष्ट वागणुकीच्या आदर्शाशी विसंगत असे वागता, तेव्हा तुम्ही नकारात्मक आत्मप्रतिमा अनुभवता. तुम्हा तुम्ही तुमच्या सवरेत्कृष्ट पातळीपेक्षा खालच्या पातळीवरची- तुम्हाला खरोखर जे करण्याची आकांक्षा आहे, त्यापेक्षा खालच्या स्तरावरती कामगिरी करत आहेत, असे वाटते. याचा परिणाम म्हणून तुमचा आत्मसन्मान आणि आनंदाची पातळी कमी होते.
‘गोल्स’- ब्रायन ट्रेसी, अनुवाद- गीतांजली गीते, साकेत प्रकाशन, पृष्ठे- २५६, किंमत- २२५ रु.