मी २७ वर्षांचा तरुण आहे. सध्या नोकरी करतो आहे. मी बी.कॉम.पर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. आता अर्धवेळ एमबीए करत आहे. मला मानसशास्त्राविषयी कुतूहल आहे. ते शिकण्याची इच्छा आहे. त्यासाठी मी काय करू शकतो?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुजय सोनार

सुजय तुला, ज्ञानार्जन करण्याची इच्छा असल्याचे समजून अतिशय आनंद झाला. हे ज्ञानार्जन तू सध्याचे कामकाज सांभाळून केल्यास त्याचा आनंद द्विगुणित होईल. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या स्कूल ऑफ सोशल सायन्सेसच्या वतीने एम.एम. इन सॉयकालॉजी हा अभ्यासक्रम चालवला जातो. तो कोणत्याही विषयातील पदवीधराला करता येतो. या अभ्यासक्रमाची फी १३ हजार रुपये आहे. हा अभ्यासक्रम करण्यासाठी कोणतीही वयोमर्यादा नाही.

हा अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा कालावधी दोन वर्षांचा असला तरी तो पाच वर्षांच्या कालावधीपर्यंत पूर्ण करता येतो.

संपर्क- स्कूल ऑफ सोशल सायन्सेस, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, मैदान घारी, न्यू दिल्ली-११००६८,

दूरध्वनी-०११-२९५३४३३६,

ईमेल- sos@ignou.ac.in,

संकेतस्थळ- http://www.ignou.ac.in

अभ्यासक्रम अथवा करिअरसंबंधीचे प्रश्न career.vruttant@expressindia.com या पत्त्यावर पाठवा.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Career guidance
First published on: 25-02-2017 at 00:51 IST