मी बीबीएच्या दुसऱ्या वर्षांला आहे. मला इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंटमधून एमबीए करायचे आहे. मला तेथील प्रवेशाबद्दल व शुल्काबद्दल संपूर्ण माहिती मिळेल का?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 – धरमराज सुराडकर

इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंटमधील प्रवेशासाठी कॉमन एन्ट्रन्स टेस्ट म्हणजेच कॅट परीक्षा घेण्यात येते. या संस्थांमधील प्रवेशासाठी काही लाख विद्यार्थी बसत असतात. पदवी प्राप्त केलेले किंवा पदवीच्या अंतिम वर्षांला असलेले विद्यार्थी या परीक्षेला बसू शकतात. या परीक्षेची काठीण्यपातळी वरच्या श्रेणीची असते. उमेदवारांची ताक क्षमता, अंकगणितीय क्षमता, इंग्रजी भाषा कौशल्य जाणून घेण्यासाठी विविध प्रकारचे प्रश्न विचारले जातात. निगेटिव्ह मार्किंग आहे. या परीक्षेच्या पेपरमध्ये तीन सेक्शन असतात. त्या तीनही सेक्शनसाठी स्वतंत्र कट ऑफ मार्क असतात. त्यामुळे तुम्हास नव्याण्णव पर्सेटाईल मिळवूनही जर तुम्ही कट ऑफ गुण पार करू शकला नाहीत तर एक-दोन आयआयएम वगळता कुणीही मुलाखत व समूह चर्चेच्या फेरीसाठी निवड करत नाही. आयआयएममधील प्रवेशासाठी पुढील बाबी ध्यानात ठेवणे आवश्यक आहे.

(१)    कॅट परीक्षेत किमान पंचावन्न ते सत्याण्णव पर्सेटाइल मिळवणे आवश्यक आहे.

(२)    तीनही सेक्शनमध्ये कट ऑफ पार करणाऱ्या उमदेवारांनाच मुलाखत व समूह चर्चेसाठी बोलावले जाते.

(३)    अंतिम निवडीसाठी कॅट परीक्षेतील गुण, समूह चर्चा व मुलाखतीमधील गुण एकत्रितरीत्या ग्राह्य़ धरले जातात.

(४)    पदवी परीक्षेतील गुण, ज्ञानशाखा, कार्यानुभव, लिंग (स्त्री/पुरुष) यासाठीही काही आयआयएम स्वतंत्र वेटेज देतात.

नागपूर, शिरमौर आयआयएम यांनी यंदा केवळ कॅट परीक्षेत मिळालेल्या गुणांवर आधारित उमदेवारांची निवड केली आहे. आयआयएमचे शुल्क हे साधारणत: सोळा ते चौदा लाख रुपयांच्या दरम्यान असते.

करिअरसंबंधीचे प्रश्न पाठवा career.vruttant@expressindia.com

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Career guidance career option
First published on: 09-09-2017 at 01:52 IST