आजच्या लेखात यूपीएससी पूर्वपरीक्षेकरिता पर्यावरण परिस्थितिकी, जैवविविधता या घटकांच्या तयारीविषयी चर्चा करणार आहोत. २०११ मध्ये हा घटक अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केल्यानंतर सद्य:स्थितीमध्ये एक महत्त्वाचा विषय गणला जातो. या घटकाला पूर्वपरीक्षेमध्ये असणारे वेटेज याचे महत्त्व अधोरेखित करते. या अभ्यासघटकामध्ये अधिकाधिक गुण प्राप्त केल्यास पूर्वपरीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्याची संधी मिळू शकते. या घटकावर २०११ ते २०१७ पर्यंत सुमारे २०% पेक्षा जास्त प्रश्न विचारले गेले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पर्यावरण परिस्थितिकी हा आंतरशाखीय विषय आहे. ज्यामध्ये जीवशास्त्र, परिस्थितिकी, भूगोल या विषयांचा समावेश होतो. या घटकावर विचारलेल्या प्रश्नांचे विश्लेषण केल्यास या विषयांची परस्परव्याप्ती असल्याचे दिसून येते. या अभ्यासघटकातील काही भाग पारंपरिक व स्थिर (static)  स्वरूपाचा आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने पर्यावरण व परिस्थितिकीशी संबंधित मूलभूत संकल्पनांचा समावेश होतो. बहुतांश वेळा या पारंपरिक घटकांवरही प्रश्न विचारण्यात आले आहेत. उदा. २०१५ मध्ये परिसंस्था (ecosystem)  काय आहे? २०१३ मधील अन्नसाखळीवर तसेची ecological niche या संकल्पनेवर विचारण्यात आलेल्या प्रश्नांवरून पारंपरिक तथा स्थिर (static) घटकांचे महत्त्व अधोरेखित होते.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Environmental ecology upsc exam
First published on: 22-05-2018 at 02:07 IST