अ‍ॅडव्हान्स्ड मटेरियल अ‍ॅण्ड प्रोसेस रिसर्च इन्स्टिटय़ूट, भोपाळ येथे संशोधकांच्या पाच जागा-

अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १३ ते १९ मे २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली सीएसआयआरची जाहिरात पाहावी अथवा www.ampri.res.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ जून २०१७.

नॅशनल काऊंसिल फॉर को-ऑपरेटिव्ह ट्रेनिंगमध्ये बहुविध कर्मचाऱ्यांच्या १३ जागा-

अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली नॅशनल काऊंसिल फॉर को-ऑपरेटिव्हज ट्रेनिंगची जाहिरात पाहावी अथवा काऊंसिलच्या www.ncct.ac.in अथवा www.recruitment.portal.in या संकेतस्थळांना भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्तळांवर अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ जून २०१७.

केंद्रीय कायदा व न्याय विभागात व्यक्तिगत साहाय्यक (मराठी) साठी संधी-

अर्जदार बारावी उत्तीर्ण असावेत व त्यांनी लघुलेखनाची १०० शब्द प्रतिमिनिट, संगणकीय पद्धतीने मराठी ट्रान्सक्रिप्शनची ५५ मिनिटे पात्रता व इंग्रजी टंकलेखनाची ३५ शब्द प्रतिमिनिटे पात्रता पूर्ण केलेली असावी. वयोमर्यादा ३० वर्षे. अर्जाच्या नमुन्यासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १५ ते २१ एप्रिल २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय कायदा व न्याय विभागाची जाहिरात पाहावी. संपूर्णपणे भरलेले अर्ज लेजिस्लेटिव्ह डिपार्टमेंट, मिनिस्ट्री ऑफ लॉ अ‍ॅण्ड जस्टिस, ४१२ ए, ४ था मजला, शास्त्री भवन, डॉ. राजेंद्र प्रसाद मार्ग, नवी दिल्ली- ११०००१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १३ जून २०१७.

नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ इलेक्ट्रॉनिक अ‍ॅण्ड इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये वैज्ञानिकांच्या २७ जागा-

अधिक माहिती व तपशिलासाठी नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीच्या http://recruitment-delhi.nielit.gov.in अथवा http://www.nielit.gov.in या संकेतस्थळांना भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ जून २०१७.

एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटीमध्ये असिस्टंट (एचआर) च्या १३ जागा-

अर्जदार पदवीधर असावेत. त्यांनी संगणकीय पद्धतीने टंकलेखनाची ४० शब्द प्रतिमिनिट पात्रता पूर्ण केलेली असावी व त्यांना संबंधित कामाचा दोन वर्षांचा अनुभव असायला हवा. वयोमर्यादा ३० वर्षे.

अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २० ते २६ मे २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाची जाहिरात पाहावी अथवा http://www.aai.aero/employment_news/careers.jsp या संकेतस्थळाला

भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ जून २०१६.

हवाईदलात नोकरीच्या संधी

भारतीय वायुसेनेत पुणे येथे सुपिरटेंडंट (स्टोअर्स) च्या ९ जागा-

अर्जदार पदवीधर असावेत व त्यांना स्टोअर्सविषयक कामाचा अनुभव असायला हवा. विहित नमुन्यातील अर्ज पाठविण्याचा पत्ता- एअर ऑफिसर कमांडिंग, बेस रिपेअर डेपो एअरफोर्स, चंदननगर, डी’मेलो पेट्रोलपंपासमोर, नगर रोड, चंदननगर, पुणे- ४११०१४.

भारतीय वायुसेनेत ओझर (नाशिक) येथे स्टोअरकीपरसाठी संधी-

अर्जदार १२ वी उत्तीर्ण असावेत व त्यांना अकाऊंट्ससह स्टोअर्सविषयक कामाचा अनुभव असायला हवा.विहित नमुन्यातील अर्ज पाठविण्याचा पत्ता- एअर ऑफिसर कमांडिंग- बेस एअर डेपो, एअर फोर्स स्टेशन, ओझर (नाशिक)- ४२२२२१.

भारतीय वायुसेनेत देवळाली (नाशिक) येथे स्टेनोग्राफर म्हणून संधी-

अर्जदार बारावी उत्तीर्ण असावेत व त्यांनी मराठी ट्रान्सक्रिप्शनची १० मिनिटात ८० शब्द, इंग्रजी ट्रान्सक्रिप्शनची ६५ शब्द, हिंदी ट्रान्सक्रिप्शनची ७५ शब्द व संगणकीय टंकलेखनाची ५० शब्द (इंग्रजी) व ६५ शब्द (हिंदी) पात्रता पूर्ण केलेली असावी. विहित नमुन्यातील अर्ज पाठविण्याचा पत्ता- एअर ऑफिसर कमांडिंग, एअर फोर्स- एअर फोर्स स्टेशन, देवळाली (नाशिक)- ४२२५०१.

वायुसेनेतील वरील पदांच्या संदर्भात व अर्जाच्या नमुन्यासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १३ ते १९ मे २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली भारतीय वायुसेनेची जाहिरात पाहावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज संबंधित पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १२ जून २०१७.