संरक्षण उत्पादन व संशोधन विभाग डीआरडीओअंतर्गत इंजिनीअर्ससाठी २३ जागा-

अर्जदारांनी संगणक विज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड कम्युनिकेशन, मेकॅनिकल, इंस्ट्रमेंटेशन इंजिनीअरिंग, सिव्हिल इंजिनीअरिंग अथवा नेव्हल इंजिनीअरिंग यासारख्या विषयांतील पदवी परीक्षा कमीत कमी ६०% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा ३१ वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २९ एप्रिल-५ मे २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली संरक्षण उत्पादन व संशोधन विभागाची जाहिरात पाहावी अथवा डीआरडीओच्या http://rac.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणक पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ मे २०१७.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशनमध्ये ज्युनिअर इंजिनीअरिंग असिस्टंटच्या ७४ जागा-

उमेदवारांनी केमिकल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इन्स्ट्रमेंटेशन इंजिनीअरिंग उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा २६ वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २९ एप्रिल- ५ मे २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली इंडियन ऑइल कॉर्पोरेशनची जाहिरात पाहावी. तसेच कॉर्पोरेशनच्या https://www.iocl.com/ या संकेतस्थळाला भेट द्यावी. त्यामधील टूल्स मेन्यूमधील, करिअर्स आणि लेटेस्ट जॉब ओपनिंग्ज या विभागात जाऊन अधिक माहिती घ्यावी.  संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ मे २०१७.

पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये सीनिअर इंजिनीअर्सच्या ५ जागा-

अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २२ ते २८ एप्रिल २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची जाहिरात पाहावी अथवा पॉवर ग्रीडच्या http://apps.powergridindia.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.

संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ मे २०१७.

इंडियन फार्माकोपिया कमिशनमध्ये जिल्हा स्तरावर फवारीकरण व रुग्ण सुरक्षाविषयक कर्मचाऱ्यांच्या ४० जागा-

वयोमर्यादा ३० वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २९ एप्रिल-५ मे २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली इंडियन फार्माकोपिया कमिशनची जाहिरात पाहावी अथवा कमिशनच्या www.ipc.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संपूर्णपणे भरलेले अर्ज अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर- इनचार्ज इंडियन फार्माकोपिया कमिशन, सेक्टर- २३, राजनगर, गाझियाबाद २०१००२ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १८ मे २०१७.