फॅक्टरी अ‍ॅडव्हाइस सव्‍‌र्हिस अ‍ॅण्ड लेबर इन्स्टिटय़ूट, मुंबई येथे उपसंचालक म्हणून संधी-

अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १३ ते १९ मे २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय लोकसेवा आयोगाची जाहिरात पाहावी अथवा आयोगाच्या http://www.upsc.gov.in अथवा http://www.upsconline.nic.in या संकेतस्थळांना भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १ जून २०१७.

 नॅशनल फर्टिलायझर्स लि.मध्ये मार्केटिंग रिप्रेझेंटेटिव्हजच्या ३५ जागा-

अर्जदार कृषी विषयातील पदवीधर असावेत. वयोमर्यादा ३० वर्षे.

अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १३ ते १९ मे २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेडची जाहिरात पहावी अथवा  http://www.nationalfertilizers.com/ या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १ जून २०१७.

प्रादेशिक सेवेत पुण्यासह विविध ठिकाणी अधिकारी म्हणून संधी-

अर्जदार पदवीधर व सेवारत असून शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत. वयोमर्यादा ४२ वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १३ ते १९ मे २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली प्रादेशिक सेवेची जाहिरात पहावी अथवा प्रादेशिक सेवेच्या www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १ जून २०१७.

इन्स्टिटय़ूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, मुंबई येथे अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह कम अकाऊंटस् ऑफिसर म्हणून संधी- अधिक माहिती व तपशिलासाठी इन्स्टिटय़ूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, मुंबईच्या दूरध्वनी क्र. ०२२- २४४५६२४१ वर संपर्क साधावा अथवा इन्स्टिटय़ूटच्या http://www.ihmctan.edu/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.

संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २ जून २०१७.

नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशनमध्ये स्टेनोग्राफर्सच्या ४ जागा-

अर्जदार पदवीधर व इंग्रजी लघुलेखनाची ८० शब्द प्रतिमिनिट व संगणकीय पद्धतीने इंग्रजी टंकलेखनाची ३० शब्द प्रतिमिनिट पात्रताधारक असायला हवेत व त्यांना संबंधित कामाचा किमान २ वर्षांचा अनुभव असायला हवा. वयोमर्यादा २७ वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ४ ते १० मार्च २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशनची जाहिरात पहावी अथवा बोर्डाच्या https://www.natboard.edu.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ जून २०१७.

संरक्षण मंत्रालयांतर्गत सेंट्रल ऑर्डनन्स डेपो मुंबई येथे कनिष्ठ कारकुनांच्या ५ जागा-

अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १३ ते १९ मे २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली ऑर्डनन्स डेपो मुंबईची जाहिरात पहावी अथवा संरक्षण मंत्रालयाच्या www.indianarmy.nic.in अथवा www.ncs.gov.in या संकेतस्थळांना भेट द्यावी.

संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ जून २०१७.