*   एअर इंडिया एक्सप्रेस लि. कंत्राटी पद्धतीने भरती.

(१) डेप्युटी मॅनेजर (फायनान्स) – ३ पदे.

Job opportunity in CBI apply immediately
सीबीआयमध्ये नोकरी करण्याची संधी, त्वरित अर्ज करा…
sarkari naukri nhpc recruitment 2024
NHPC Recruitment 2024 :कोणत्याही परीक्षेशिवाय मिळवा सरकारी नोकरी; ‘या’ पदांसाठी भरती सुरू; ३० एप्रिलपूर्वी करा अर्ज
Air India Air Transport Services Limited jobs 2024
AIATSL recruitment 2024 : एअर इंडिया एअर ट्रान्स्पोर्ट सर्व्हिसेसमध्ये मोठी भरती; पाहा नोकरीची माहिती….
world's first self-driven electric
एप्रिल फुल नव्हे, खरचं चालकाशिवाय धावतेय ही दुचाकी! भाविश अग्रवालने केली Ola Soloची घोषणा, पाहा Video

पात्रता – सीए/ आयसीडब्ल्यूए.  १ वर्षांचा अनुभव.

(२) ऑफिसर फायनान्स – ५ पदे.

पात्रता – एमबीए/(फायनान्स).  २ वर्षांचा अनुभव.

(३) सिनियर असिस्टंट फायनान्स/कॅशियर –

५ पदे.

पात्रता – पदवी उत्तीर्ण.  १ वर्षांचा अनुभव.

(४) स्टोअर इन्स्पेक्टर – ३ पदे.

पात्रता – १२ वी उत्तीर्ण  मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/एअरोनॉटिकल/इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग डिप्लोमा. १ वर्षांचा अनुभव.

(५) ऑफिसर मटेरियल मॅनेजमेंट – २ पदे.

पात्रता – एमबीए/पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन मटेरियल्स मॅनेजमेंट. २ वर्षांचा अनुभव.

(६) स्टोअर कीपर – २२ पदे.

पात्रता – पदवी उत्तीर्ण. १ वर्षांचा एव्हिएशन स्टोअर्सचा अनुभव.

वयोमर्यादा – पद क्र. (१), (४) आणि (६) साठी ३५ वर्षेपर्यंत. पद क्र. (२) साठी ३० वर्षेपर्यंत. पद क्र. (३) साठी २५ वर्षे. पद क्र. (५) साठी

४० वर्षेपर्यंत.

ऑनलाइन अर्ज http://www.airindiaexpress.in  वर दि. २८ ऑक्टोबर, २०१७ पर्यंत करावेत.

*   दी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., ठाणे – पुढील पदांची भरती.

(१) ज्युनियर बँकिंग असिस्टंट – १६० पदे.

पात्रता – पदवी  एमएससीआयटी कोर्स उत्तीर्ण.

(२) सिनियर बँकिंग असिस्टंट – १९ पदे.

पात्रता – पदवी किमान ५०% गुण वाणिज्य शाखा किंवा ५५% गुणांसह इतर शाखेतील पदवी. एमएससीआयटी कोर्स.

(३) शिपाई – २० पदे,

(४) वॉचमन – ३ पदे.

पद क्र. (३) व (४) साठी पात्रता – ८ वी उत्तीर्ण किंवा १० वी पर्यंत.

(५) अधिकारी जेएम – ३ पदे.

पात्रता – वाणिज्य शाखेतील पदवी किमान ५५% गुणांसह, इतर शाखेतील पदवी किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण एमएससीआयटी कोर्स.

वयोमर्यादा – दि. ३० सप्टेंबर, २०१७ रोजी ३८ वर्षेपर्यंत (अपंग/प्रकल्पग्रस्त-४५ वर्षेपर्यंत).

प्रोबेशन कालावधी १ वर्षांचा असेल.

निवड कार्यपद्धती –

(१) सर्व पदांसाठी लेखी परीक्षा ९० गुणांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची (बँकिंग, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० व नियम १९६१), (इंग्रजी भाषा, सामान्यज्ञान व बौद्धिक चाचणी). माध्यम मराठी व इंग्रजी. परीक्षा

दि. २६ नोव्हेंबर ते १ डिसेंबर, २०१७ दरम्यान आयोजित करण्यात येईल.

(२) कागदपत्र पडताळणी.

(३) १० गुणांसाठी मुलाखत.

ऑनलाइन अर्ज http://www.thanedistrictbank.com  या संकेतस्थळावर भरण्यापूर्वी दी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नजिकच्या शाखेत परीक्षा शुल्क भरावयाचे आहे. अर्ज करण्याचा अंतिम दि. ३० ऑक्टोबर, २०१७ आहे.

*   माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड, मुंबईमध्ये तांत्रिक पदांच्या ९८५ पदांची कंत्राटी पद्धतीने दोन वर्षांसाठी भरती.

(१) कांपोझिट वेल्डर – २४० जागा,

(२) स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर – २९१ जागा,

(३) फिटर – ३१ जागा,

(४) पाइप फिटर – ५८ जागा,

(५) इलेक्ट्रिशियन – ३५ जागा,

(६) रिगर – ५० जागा,

(७) पेंटर – २७ जागा,

(८) मिलराइट मेकॅनिक – १७ जागा,

(९) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक – १५ जागा,

(१०) ड्राफ्ट्समन मेकॅनिकल – १५ जागा,

(११) ब्रास फिनिशर – १० जागा,

(१२) चिपर ग्राइंडर – ६५ जागा,

(१३) युटिलिटी हँड – ४२ जागा,

(१४) फायर फायटर – १३ जागा इ. जागांवर भरती.

पात्रता – संबंधित ट्रेडमधील नॅशनल अ‍ॅप्रेंटिसशिप परीक्षा उत्तीर्ण. मशिनिस्ट आणि प्लंबर या ट्रेडमधील नॅशनल अ‍ॅप्रेंटिसशिप परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना ट्रेनी पदावर भरती होता येईल.

वयोमर्यादा – १८-३३ वर्षे. दि. १ सप्टेंबर, २०१७ रोजी (इमाव – ३६ वर्षे, अजा/अज – ३८ वर्षेपर्यंत विकलांग – ४३/४६/४८ वर्षेपर्यंत).

निवड पद्धती – लेखी परीक्षा ३०%  भार + अनुभव ३०% भार + ट्रेड टेस्ट – ५०% भार.

स्टायपेंड दरमहा – रु. ६०००/-  इतर भत्ते ते ८,०००/-  इतर भत्ते.

परीक्षा शुल्क – रु. १४०/-

(अजा/अज/विकलांग यांना फी माफ).

ऑनलाइन अर्ज http://www.mazdock.com  या संकेतस्थळावर दि. २९ ऑक्टोबर, २०१७ पर्यंत करावेत.