खेळाडूंसाठी वायुदलात संधी-

उमेदवार बारावी उत्तीर्ण व शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत व त्यांनी विविध क्रीडाक्षेत्रात विशेष कामगिरी बजावलेली असावी. वयोमर्यादा २१ वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २४ ते ३० जून २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली वायुदलाची जाहिरात पहावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज सेक्रेटरी, एअरफोर्स स्पोर्टस कंट्रोल बोर्ड, एअरफोर्स स्टेशन, नवी दिल्ली रेसकोर्स, नवी दिल्ली ११०००३ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १५ जुलै २०१७.

संरक्षण मंत्रालयांतर्गत संरक्षण संशोधन व विकास विभागात संशोधक म्हणून १२ जागा-

अर्जदारांनी इंजिनीअरिंगमधील पदवी प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांना संशोधनविषयक कामाचा १५ वर्षांचा अनुभव असायला हवा. पदव्युत्तर पात्रताधारक वा पीएचडी असणाऱ्यांना प्राधान्य.

अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २४ ते ३० जून २०१७ च्या अंकातील संरक्षण मंत्रालयाची जाहिरात पहावी अथवा डीआरडीओ http://rac.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जुलै २०१७.

* भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनमध्ये कोची येथे कुशल कामगारांच्या ३४ जागा-

उमेदवारांनी केमिकल इंजिनीअरिंग वा टेक्नॉलॉजीमधील पदविका अभ्यासक्रम ६०% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १७ ते २३ जून २०१७ च्या अंकातील भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनची जाहिरात पहावी अथवा बीपीसीएलच्या http://www.bharatpetroleum.com   या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ जुलै २०१७.

भाभा- अणु संशोधन केंद्र, मुंबई येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ७ जागा-

अर्जदारांनी एमबीबीएस, डीएसबी, एमडी एमएस यांसारखी पात्रता पूर्ण केली असावी.

अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली भाभा-अणु संशोधन केंद्र, मुंबईची जाहिरात पाहावी अथवा बीएआरसीच्या http://www.barc.gov.in अथवा http://recruit.barc.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ जुलै २०१७.

नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅबियॉटिक स्ट्रेस मॅनेजमेंट, माळेगाव- बारामती येथे सीनिअर रिसर्च फेलोशिपच्या ३ जागांसाठी थेट मुलाखत-

अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली सीएसआयआर- नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅबियॉटिक स्ट्रेस मॅनेजमेंट, बारामतीची जाहिरात पहावी अथवा इन्स्टिटय़ूटच्या http://www.niam.res.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. तपशीलवार अर्ज व कागदपत्रांसह थेट मुलाखतीसाठी संपर्क- असिस्टंट अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅबियॉटिक स्ट्रेस मॅनेजमेंट, माळेगाव- बारामती- ४१३११५ (जि. पुणे) येथे १९ जुलै २०१७ रोजी

सकाळी ११ वा.