केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयातर्फे अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते.  विदेशातील शैक्षणिक व संशोधन संस्थांमध्ये विविध विषयातील पदव्युत्तर पदवी व संशोधनपर पीएचडी करण्यासाठी देण्यात येणाऱ्या शैक्षणिक शिष्यवृत्तीसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थी – उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

उपलब्ध शिष्यवृत्तींची संख्या – उपलब्ध शिष्यवृत्तींची संख्या १०० असून त्यापैकी ९० शिष्यवृत्ती अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना ६ शिष्यवृत्ती अनुसूचित जातीच्या तर ४ शिष्यवृत्ती भूमिहीन शेतमजूर व परंपरागत कारागीर प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आहेत.

nashik municipal corporation schools marathi news, 1000 rupees saree nashik teachers marathi news
नाशिक मनपा शाळांमध्ये पोषाख संहितेची तयारी, शिक्षिकांकडून प्रतिसाडी एक हजार रुपयांचे संकलन
Dissatisfaction among students over delay in Maharashtra Public Service Commission exams results interviews
‘एमपीएससी’च्या परीक्षा, निकालांची प्रतीक्षाच; अनेक परीक्षांचे अभ्यासक्रम प्रलंबित, विद्यार्थ्यांमध्ये नाराजी
Concession for students to attend school due to highest temperature in state
विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्याबाबत सवलत… काय आहे शालेय शिक्षण विभागाचा निर्णय?
Selection list of eligible students for NMMMS scholarship announced Pune
 ‘एनएमएमएमएस’ शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर… किती विद्यार्थ्यांना मिळाली शिष्यवृत्ती?

उपलब्ध शिष्यवृत्तींचा विषयवार तपशील – वर नमूद केलेल्या शिष्यवृत्तींमध्ये अभियांत्रिकी व व्यवस्थापन १२, विज्ञान १७, कृषी विज्ञान व वैद्यकशास्त्र १७, अतरराष्ट्रीय वाणिज्य, अकाउंटिक व फायनान्स १७, सामाजिक विज्ञान, मानवशास्त्र व कला १७ याप्रमाणे विषयवार शिष्यवृत्तींचा समावेश आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता- अर्जदार विद्यार्थी खालीलप्रमाणे पात्रताधारक असावेत-

 संशोधनपर पीएचडीसाठी- अर्जदार विद्यार्थ्यांनी संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी परीक्षा कमीतकमी ५५% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असायला हवा.

पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी- अर्जदार विद्यार्थ्यांनी संबंधित विषयातील पदवी कमीतकमी ५५% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असावा.

विशेष सूचना- अर्जदार विद्यार्थ्यांच्या घरातील सर्वाचे वार्षिक एकत्रित उत्पन्न ६ लाख रुपयांहून अधिक नसावे.

वयोमर्यादा- उमेदवारांचे वय १ एप्रिल २०१७ रोजी ३५ वर्षांहून अधिक नसावे.

शिष्यवृत्तीचा कालावधी- संशोधनपर पीएचडीसाठीचा कालावधी ४ वर्षे तर पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठीचा कालावधी ३ वर्षांचा असेल.

शिष्यवृत्तीची रक्कम व तपशील- विद्यार्थ्यांना त्यांच्या संशोधन काळात अमेरिका व इतर देशांमध्ये असल्यास वार्षिक १५,४०० अमेरिकी डॉलर्स तर इंग्लंडमध्ये असल्यास वार्षिक ९९०० ब्रिटिश पाउंड्स शिष्यवृत्ती स्वरूपात देण्यात येतील.

वरील शिष्यवृत्तीशिवाय त्यांना शैक्षणिक शुल्क, निवास शुल्क अथवा व्यवस्था, प्रवास खर्च, स्थानिक प्रवास, वैद्यकीय खर्च इ. सुविधासुद्धा देय असतील.

अर्जाचा नमुना व तपशिलासाठी संपर्क- अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २२ ते २८ जुलै २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाची जाहिरात पहावी अथवा मंत्रालयाच्या www.socialjustice.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख : विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील व कागदपत्रांसह असणारे अर्ज डायरेक्टर, एसीडी- व्ही सेक्शन, मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टीस अ‍ॅण्ड एम्पॉवरमेंट, डिपार्टमेंट ऑफ सोशल जस्टीस अ‍ॅण्ड एम्पॉवरमेंट, रूम नं. २११, डी विंग, शास्त्री भवन, डॉ. राजेंद्र प्रसाद मार्ग, नवी दिल्ली- ११०००१ या पत्त्यावर ३१ मार्च २०१८ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.

dattatraya.ambulkar@gmail.com